व्हिडिओ पाहण्यासाठी

जागतिक माहिती पत्रिका

यहोवाचे साक्षीदार आणि राजकीय निष्पक्षता

यहोवाचे साक्षीदार आणि राजकीय निष्पक्षता

यहोवाचे साक्षीदार बायबलच्या शिकवणींप्रमाणे चालत असल्यामुळे ते राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतात. जगातल्या बऱ्‍याच सरकारांच्या लक्षात आलंय, की साक्षीदारांच्या या तटस्टथ, निष्पक्ष भूमिकेमुळे समाजातली शांती वाढते. शिवाय, साक्षीदार हे कायद्याचं पालन करणारे, अधिकाऱ्‍यांचा आदर करणारे आणि त्यांना सहकार्य देणारे चांगले नागरिक आहेत, हेही ते मान्य करतात.