जागे राहा!
२०२३ नव्या आशेचं वर्ष—बायबल काय म्हणतं?
२०२३ वर्ष सुरू झालं आहे. आपल्या सर्वांची इच्छा आहे की पुढे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं चांगलंच व्हावं. पण आपण अशी आशा का ठेवू शकतो?
बायबल आपल्याला आशा देतं
बायबल म्हणतं की आज आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतोय, त्या तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत आणि त्या लवकरच कायमच्या काढून टाकल्या जातील. खरंतर बायबलमधल्या गोष्टी “आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला मदत करतात आणि सांत्वन देतात.”—रोमकर १५:४.
बायबलमध्ये भविष्यासाठी जी आशा दिली आहे त्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी, “आनेवाला कल सुनहरा होगा!” हा हिंदीमधला लेख वाचा.
या आशेमुळे आजही आपल्याला मदत होऊ शकते
खवळलेल्या समुद्रात ज्याप्रमाणे नांगर जहाजाला स्थिर ठेवतं, त्याचप्रमाणे बायबलमध्ये दिलेली आशा “आपल्या जिवासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.” (इब्री लोकांना ६:१९) या आशेमुळे आपल्याला स्थिर राहायला मदत होते. तसंच, आपल्याला सध्याच्या समस्यांचा सामना करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला आणि खऱ्या अर्थाने आनंदी राहायलाही मदत होते. याची काही उदाहरणं पाहा:
दारूचं व्यसन असलेल्या एका माणसाला बायबलमधल्या आशेमुळे कशी मदत झाली याबद्दल जाणून घेण्यासाठी, मी अशा जगण्याला कंटाळलो हा व्हिडिओ पाहा.
आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा बायबलमुळे आपल्याला सांत्वन आणि आशा कशी मिळते यासाठी शोक करणाऱ्यांसाठी सांत्वन हा व्हिडिओ पाहा.
आपली आशा पक्की करा
बरेच लोक चांगल्या गोष्टींची आशा धरतात. पण त्या सर्व पूर्ण होतीलच याची खात्री त्यांना नसते. पण बायबलमध्ये भविष्यासाठी जी चांगली आशा दिली आहे त्याबाबतीत मात्र तसं नाही. आपण असं का म्हणू शकतो? कारण ही आशा स्वतः यहोवा a देवाने दिली आहे, “जो कधीही खोटं बोलू शकत नाही.” (तीत १:२) आणि दिलेलं वचन पूर्ण करण्याची ताकद फक्त यहोवा देवाकडेच आहे. कारण तो “आपल्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करतो.”—स्तोत्र १३५:५, ६.
आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो की तुम्ही बायबलमध्ये दिलेल्या आशेबद्दल आणखी जाणून घ्यावं. या आशेवर आपला भरवसा वाढवण्यासाठी तुम्ही ‘शास्त्रवचनांचं काळजीपूर्वक परीक्षण’ करू शकता. (प्रेषितांची कार्यं १७:११) यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत चर्चेतून बायबल अभ्यास करू शकता. हा अभ्यास मोफत आहे. अशा प्रकारे तुम्ही २०२३ सालाची सुरुवात एका खऱ्या आशेने करू शकता!
a बायबलमध्ये सांगितलं आहे की यहोवा हे देवाचं नाव आहे.—स्तोत्र ८३:१८.