व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम २३-२४

लोकांचं अनुकरण करू नका

लोकांचं अनुकरण करू नका

२३:१-३

ही ताकीद यहोवाने साक्ष देणाऱ्‍यांना आणि न्यायाधीशांना दिली होती. त्यांनी न्यायिक खटल्यांमध्ये लोकांच्या प्रभावाखाली येऊन खोटी साक्ष देऊ नये किंवा चुकीचा न्याय करू नये, असं यहोवाने त्यांना सांगितलं होतं. पण हे तत्त्व जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्येही लागू होतं. कारण, या जगातल्या लोकांच्या अधार्मिक विचारसरणीचं आणि वागणुकीचं अनुकरण करण्याचा ख्रिश्‍चनांवर सतत दबाव येत असतो.—रोम १२:२.

खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये आपण लोकांचं अनुकरण का करू नये?

  • कोणताही आधार नसलेली एखादी अफवा किंवा बातमी आपण ऐकतो तेव्हा.

  • कपडे, हेअरस्टाईल किंवा मनोरंजन निवडताना.

  • वेगळ्या वंशाच्या, संस्कृतीच्या किंवा आपल्यापेक्षा श्रीमंत किंवा गरीब असलेल्या लोकांबद्दल विचार करताना आणि त्यांच्याशी वागताना.