व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ४२-४५

शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात येईल!

शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात येईल!

यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्तामुळे बंदिवासातल्या शेष विश्वासू यहुदी लोकांना खात्री मिळाली, की शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यात येईल. तसंच, शुद्ध उपासनेबद्दल यहोवाचे जे उच्च स्तर आहेत, त्यांबद्दलही या दृष्टान्तामुळे त्यांना समजलं.

याजक यहोवाच्या स्तरांविषयी लोकांना शिकवणार होते

४४:२३

विश्वासू आणि बुद्धिमान दासाने आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध गोष्टींमधला फरक कसा शिकवला आहे, याची काही उदाहरणं खाली लिहा. (गॉड्‌स किंगडम रूल्स! पृ. ११०-११७)

पुढाकार घेणाऱ्यांना लोक साथ देतील

४५:१६

आपण कोणकोणत्या मार्गांनी मंडळीतल्या वडिलांना साथ देऊ शकतो?