“यहोवा मला साहाय्य करतो”
स्तोत्रे १२० ते १३४ यांना आरोहण स्तोत्रे म्हणून ओळखले जाते. इस्राएली उपासकांनी आनंदाने ही स्तोत्रे जेरुसलेमला प्रवास करताना गायली असावीत, असं अनेक लोक मानतात. जेरूसलेम हे यहूदाच्या उंच डोंगरांमध्ये असल्यामुळे, त्यांना वार्षिक सण साजरा करण्यासाठी तिथं आरोहण करून म्हणजेच चढून जावं लागायचं.
यहोवा आपल्याला देत असलेल्या संरक्षणाची तुलना पुढील उदाहरणं देऊन केली आहे
-
जागृत मेंढपाळ
-
उन्हापासून वाचण्यासाठी सावलीचं ठिकाण
-
एकनिष्ठ सैनिक