व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

भाऊबहिणींची मदत घ्या

भाऊबहिणींची मदत घ्या

यहोवाने आपल्याला मदतीसाठी आपल्या भाऊ-बहिणींचा “संपूर्ण बंधुसमाज” दिला आहे. (१पेत्र ५:९) सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करण्यासाठी ते आपली मदत करू शकतात. उदाहरणार्थ, पौलला अक्विल्ला, प्रिस्किल्ला, सीला, तीमथ्य आणि इतरांकडून मदत मिळाली.—प्रेका १८:१-५.

आपले भाऊ-बहीण आपल्याला सेवाकार्यात कशी मदत करू शकतात? कदाचित ते तुम्हाला सेवाकार्यात घरमालकाने घेतलेल्या आक्षेपाला हाताळण्यासाठी, पुनर्भेट करण्यासाठी किंवा बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी व तो चांगल्या रितीने चालवण्यासाठी काही व्यावहारिक गोष्टी सुचवतील. तुमच्या मंडळीत तुम्हाला कोण मदत करू शकतं, याचा विचार करा आणि त्यांच्याकडे मदत मागा. तुम्हा दोघांनाही त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे तुमच्या दोघांच्याही आनंदात भर पडेल.—फिलि १:२५.

‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—आपल्या भाऊबहिणींकडून’  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—आपल्या भाऊबहिणींकडून’ या व्हिडिओतलं एक दृष्य. निता एका बहिणीसोबत जेडचा बायबल अभ्यास घेत आहे.

    जेडला मंडळीच्या सभांना येण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी निताने काय केलं?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—आपल्या भाऊबहिणींकडून’ या व्हिडिओतलं एक दृष्य. नितासोबत सिस्टर अबीगईल आहेत. त्या पूर्वी एका बँडमध्ये होत्या हे जेडला सांगत आहेत.

    बायबल अभ्यासासाठी आपण वेगवेगळ्या भाऊ-बहिणींना का घेऊन गेलं पाहिजे?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—यहोवा देत असलेली मदत स्वीकारा—आपल्या भाऊबहिणींकडून’ या व्हिडिओतलं एक दृष्य. निता नसताना सिस्टर अबीगईल जेडचा अभ्यास घेत आहेत.

    शिष्य बनवण्यासाठी संपूर्ण मंडळीच्या मदतीची गरज आहे

    जेड आणि अबीगईल या दोघींनाही कोणत्या गोष्टीत आवड होती?

  • सेवाकार्यातली कोणकोणती कौशल्यं तुम्ही भाऊ-बहिणींकडून शिकू शकता?