ख्रिस्ती जीवन
शरीरात काटा असूनही तुम्ही यशस्वी होऊ शकता!
या कठीण काळात देवाचे सर्वच सेवक काट्यांसारख्या समस्यांनी त्रासलेले आहेत. (२ती ३:१) अशा वेळी आपण यहोवावर कसं विसंबून राहू शकतो आणि या समस्यांचा यशस्वी रीत्या सामना कसा करू शकतो? याबाबतीत तलिता अलनाशी आणि तिच्या आईवडिलांनी काय केलं हे पाहण्यासाठी आंधळ्यांचे डोळे उघडतील हा व्हिडिओ पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
तलितासाठी कोणती गोष्ट तिच्या शरीरातला काटा होती?
-
बायबलमधल्या कोणत्या अभिवचनांमुळे तलिता आणि तिच्या आईवडिलांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला मदत झाली?
-
तलिताच्या शस्त्रक्रियेनंतर लगेचच तिच्या आईवडिलांनी यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवलं?
-
तलिताच्या आईवडिलांनी तिच्या मनात देवाबद्दल प्रेम रुजवण्यासाठी संघटनेने पुरवलेल्या माध्यमांचा कसा वापर केला?
-
“शरीरात एक काटा” असूनही तलिताने आध्यात्मिक प्रगती करत असल्याचं कसं दाखवून दिलं?
-
तलिताच्या उदाहरणामुळे तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं?