देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो
आपल्यावर खूप मोठं संकट कोसळलं आहे हे शौलला कळलं होतं (१शमु १३:५-७)
यहोवाच्या सूचनांचं पालन करण्याऐवजी शौलने गर्विष्ठ होऊन त्याची मर्यादा ओलांडली (१शमु १३:८, ९; टेहळणी बुरूज०० ८/१ १३ ¶१७)
यहोवाने शौलला ताडन दिलं (१शमु १३:१३, १४; टेहळणी बुरूज०७ ७/१ २० ¶८)
जेव्हा एखादी व्यक्ती गर्विष्ठ होऊन, विचार न करता आपल्या अधिकारात नसलेली गोष्ट करते, तेव्हा ती आपली मर्यादा ओलांडते. आपली मर्यादा ओलांडून गर्विष्ठपणा दाखवणं हे नम्रतेच्या विरोधात आहे. एखाद्याला गर्व होऊन आपली मर्यादा ओलांडण्याचा मोह होईल अशा कोणत्या परिस्थिती आहेत?