ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रश्नांचा प्रभावीपणे वापर करा
हे का महत्त्वाचं: जर “मनुष्याच्या मनांतील मसलत खोल पाण्यासारखी असते” तर ‘प्रश्न’ हे पाणी काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यासारखे असते. (नीत २०:५) प्रश्न विचारल्यामुळे समोरची व्यक्ती फक्त ऐकतच नाही, तर तीसुद्धा संभाषणात सहभाग घेते. विचारपूर्वक प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती त्या विषयाबद्दल काय विचार करते हे कळतं. येशूने प्रश्नांचा प्रभावीपणे वापर केला. याबाबतीत आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?
हे कसं करावं:
-
मत जाणून घेणारे प्रश्न विचारा. येशूने आपल्या शिष्यांचं मत जाणून घेण्यासाठी एकापाठोपाठ एक असे अनेक प्रश्न विचारले. (मत्त १६:१३-१६; सेवा स्कूल पृ. २३८ परि. ३-५) तुम्ही समोरच्या व्यक्तीचे मत जाणून घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारू शकता?
-
योग्य निष्कर्षावर पोहोचण्यासाठी मदत करणारे प्रश्न विचारा. पेत्रची विचारसरणी सुधारण्यासाठी येशूने प्रश्न विचारले आणि त्यांचे संभवनीय उत्तरंसुद्धा सुचवले, त्यामुळे पेत्र योग्य निष्कर्षावर पोहचू शकला. (मत्त १७:२४-२६) योग्य निष्कर्षावर पोहोचण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही कोणते काही प्रश्न विचारू शकता?
-
ऐकणाऱ्याची प्रशंसा करा. शास्त्र्याने “सुज्ञपणे दिलेले उत्तर” ऐकून येशूने त्याची प्रशंसा केली. (मार्क १२:३४) विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर तुम्ही त्यांची प्रशंसा कशी करू शकता?
येशूनं जसं केलं तसं तुम्हीही करा—शिकवा या व्हिडिओचा पहिला भाग पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
या उदाहरणात माहिती जरी अचूक सांगितली असली, तरी शिकवण्याबाबतीत हे चांगलं उदाहरण का नाही?
-
दिलेली माहिती फक्त समजवून सांगणच का पुरेसं नाही?
व्हिडिओचा दुसरा भाग पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
या बांधवाने प्रश्नांचा प्रभावीपणे कसा वापर केला?
-
या बांधवाने जसं शिकवलं त्याच्या आणखीन कोणत्या पैलूंचं आपण अनुकरण करू शकतो?