२-८ नोव्हेंबर
निर्गम ३९-४०
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मोशेने सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं”: (१० मि.)
निर्ग ३९:३२—उपासना मंडप बांधताना यहोवाने दिलेल्या सूचनांचं मोशेने काटेकोरपणे पालन केलं (टेहळणी बुरूज११ ९/१५ पृ. २७-२८ परि. १३)
निर्ग ३९:४३—उपासना मंडप बनवून झाल्यावर मोशेने त्याची स्वतः पाहणी केली
निर्ग ४०:१, २, १६—यहोवाने दिलेल्या सूचनांप्रमाणे मोशेने उपासना मंडपाची रचना केली (टेहळणी बुरूज०५ ८/१ पृ. १८-१९ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ३९:३४—उपासना मंडपासाठी इस्राएली लोकांना तहशाची कातडी कुठून मिळाली असेल? (इन्साइट-२ पृ. ८८४ परि. ३)
निर्ग ४०:३४—भेटमंडपावर ढग यायचा तेव्हा तो कशाला सूचित करायचा? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. २१ परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३९:१-२१ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये जेव्हा-जेव्हा प्रश्न येतात तेव्हा-तेव्हा व्हिडिओ थांबवा आणि ते प्रश्न श्रोत्यांना विचारा. एखाद्या घरमालकाला राजकीय किंवा सामाजिक मुद्यांवर आपल्याशी चर्चा करायची असते तेव्हा आपण तटस्थ कसं राहायचं हे श्रोत्यांना विचारा.
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक राजकीय नेत्यांबद्दल किंवा राजकीय विषयांबद्दल तुमचं मत विचारतो तेव्हा त्याला उत्तर द्या. (शिकवणे अभ्यास १२)
भाषण: (५ मि.किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०४ पृ. २९ परि. ८-१०—विषय: विचार करताना आणि लोकांशी बोलताना आपण तटस्थ कसं राहू शकतो? (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
लक्ष देऊन ऐका (मत्त १३:१६): (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेले प्रश्न विचारा: लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे? मार्क ४:२३, २४ या वचनांचा काय अर्थ होतो? कोणतं उदाहरण देऊन इब्री लोकांना २:१ हे वचन समजवण्यात आलं आहे? आपण लक्ष देऊन ऐकतो हे आपण कसं दाखवू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या! पाठ १०२
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत १६ आणि प्रार्थना