२ योहान १–१३; ३ योहान १–१४–यहूदा १–२५
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं |सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे
येशूने म्हटलं: “अरुंद दारातून आत जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.” (लूक १३:२४) येशूच्या शब्दांवरून कळतं की देवाची स्वीकृती मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे, खूप मेहनत घेतली पाहिजे. येशूचा भाऊ, यहूदा यानेही देवाच्या प्रेरणेने असाच सल्ला दिला: “विश्वासाचे रक्षण करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करावा.” पुढील गोष्टी करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याची गरज आहे:
-
लैंगिक अनैतिकतेचा विरोध करण्यासाठी.—यहू ६, ७
-
अधिकारपदावर असणाऱ्यांचा आदर करण्यासाठी.—यहू ८, ९
-
“परमपवित्र विश्वासावर” म्हणजे ख्रिस्ती शिकवणींवर भरवसा दृढ करण्यासाठी.—यहू २०, २१