नमुना सादरीकरणं
कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पत्रिका शेवटचं पान)
प्रश्न: आपलं कुटुंब सुखी असावं असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी कशाची गरज आहे? कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपली भूमिका कशी पार पाडू शकतो? पवित्र शास्त्रात कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे. ते मी तुम्हाला दाखवू शकतो का?
वचन: इफि ५:१, २ किंवा कल ३:१८-२१
सादरता: कुटुंब आनंदी बनवण्यासाठी पवित्र शास्त्रात दिलेली तत्त्वं आपल्याला कशी मदत करू शकतात, याबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे.
सत्य शिकवा
तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
प्रस्तावना: आम्ही सर्वांना कुटुंबासाठी असलेला एक लहान व्हिडिओ दाखवत आहोत. [तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते हा प्रस्तावना व्हिडिओ दाखवा.]
सादरता: व्हिडिओमध्ये दाखवलेलं माहितीपत्रक वाचण्याची तुमची इच्छा असेल, तर मी तुम्हाला त्याची एक प्रत देऊ शकतो किंवा वेबसाईटवरून ते कसं डाउनलोड करता येईल, ते दाखवू शकतो.
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.