व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सुवार्ता सांगण्यात आनंद मिळवा

सुवार्ता सांगण्यात आनंद मिळवा

तुम्हाला प्रचार करणं कठीण वाटतं का? आपल्यापैकी बरेच जण कदाचित या प्रश्‍नाचं “हो” असं उत्तर देतील. पण का? कारण कित्येकदा आपल्याला असे लोक भेटतात जे सुवार्तेबद्दल आवड दाखवत नाहीत. कधीकधी आपल्याला विरोधाचा सामना करावा लागतो, तर कधी अनोळखी लोकांशी बोलताना भीतीही वाटते. अशा गोष्टींमुळे आपला आनंद कमी होऊ शकतो. पण आपण आनंदी देवाची उपासना करत असल्यामुळे त्याची इच्छा आहे, की आपण त्याची सेवा आनंदाने करावी. (स्तो १००:२; १ती १:११) आनंदाने प्रचारकार्य करण्याची तीन कारणं खाली दिली आहेत.

पहिलं कारण, आपण लोकांना आशेचा संदेश सांगतो. आज बरेच लोक निराश आहेत. पण आपण आनंदाचा संदेश सांगून त्यांच्या मनात आशा उत्पन्न करू शकतो. (यश ५२:७) पण देवाच्या राज्याच्या सुवार्तेमुळे फक्त त्यांचाच नाही, तर आपलासुद्धा आनंद वाढतो. त्यामुळे प्रचाराला जाण्याआधी देवाच्या राज्यामुळे या पृथ्वीवर कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यावर मनन करा.

दुसरं कारण, प्रचार केल्यामुळे लोकांना शारीरिक आणि आध्यात्मिक फायदे होतात. ते हानिकारक सवयी सोडायला शिकतात आणि त्यामुळे त्यांना सर्वकाळच्या जीवनाची आशा मिळते. (यश ४८:१७, १८; रोम १:१६) आपण जणू काही बचावकार्यच करत आहोत, असा आपण विचार करू शकतो. जरी काही लोक मदत स्वीकारण्यास तयार नसले, तरी आपण अशा लोकांना शोधत राहिलं पाहिजे ज्यांना मदतीची गरज आहे.—मत्त १०:११-१४.

तिसरं आणि सर्वात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, आपण प्रचारकार्य केल्यामुळे यहोवाचा आदर होतो. आपण जे साक्ष देण्याचं काम करतो त्याची यहोवा खूप कदर करतो. (यश ४३:१०; इब्री ६:१०) इतकंच काय, तर हे काम पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला उदारतेने त्याचा पवित्र आत्मासुद्धा देतो. म्हणून आपण यहोवाकडे आनंद मिळवण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे; जो पवित्र आत्म्याचा एक पैलू आहे. (गल ५:२२) यहोवाच्या मदतीमुळे आपण आपल्या चिंतांवर मात करू शकतो आणि धैर्याने प्रचार करू शकतो. (प्रेका ४:३१) तेव्हा, आपल्या क्षेत्रात आपल्याला चांगला प्रतिसाद मिळो किंवा वाईट, आपली जबाबदारी पार पाडण्यात आपल्याला आनंदच मिळेल.—यहे ३:३.

सेवाकार्याबद्दल तुम्हाला कोणती मनोवृत्ती बाळगायला आवडेल? तुमचा आनंद तुम्ही कसा दाखवू शकता?

अभ्यास आणि मनन करण्याद्वारे आपला आनंद पुन्हा मिळवा, हा व्हिडिओ पाहा. त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:

  • आपण जरी बरेच तास प्रचार करत असलो, तरी वैयक्तिक अभ्यास करणं का गरजेचं आहे?

  • आपण कोणत्या बाबतीत मरीयाचं अनुकरण केलं पाहिजे?

  • देवाच्या वचनावर मनन करण्यासाठी तुम्ही कोणती वेळ ठरवली आहे?

  • सुवार्तेचा प्रचार करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?