व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

दारासमोर उभे असताना चांगली वागणूक ठेवणे

दारासमोर उभे असताना चांगली वागणूक ठेवणे

आपण ख्रिस्ती या नात्याने जगापुढे, “रंगमंचावरील” कलाकारांप्रमाणे आहोत. त्यामुळे लोकांचं आपल्यावर नेहमी लक्ष असतं. (१कर ४:९) म्हणून, प्रचारकार्यात असताना काही घरमालक जेव्हा आपल्याला खिडकीतून पाहतात किंवा दाराआड उभे राहून आपलं बोलणं ऐकतात, तेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. दारावर येणाऱ्या व्यक्तीला पाहण्यासाठी, तिचं बोलणं ऐकण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी आजकाल काही घरांना कॅमेरा आणि मायक्रोफोन लावलेला असतो. त्यामुळे दारासमोर उभे असताना आपली वागणूक चांगली असली पाहिजे. याचे काही मार्ग पुढे दिले आहेत. —२कर ६:३.

आपल्या आचरणाद्वारे (फिलि १:२७):

  • घरमालकाचा आदर करा; घराच्या आत डोकावून पाहू नका. दारासमोर उभे असताना खाणं-पिणं, फोन करणं किंवा मेसेज पाठवणं अशा गोष्टी टाळा

आपल्या बोलण्याद्वारे (इफि ४:२९):

  • दारासमोर उभे असताना एकमेकांशी असं काहीही बोलू नका, जे घरमालकाला ऐकू गेल्यावर त्याला आवडणार नाही. काही प्रचारक घरमालकाशी बोलण्याआधी आपल्या सोबत्याशी बोलण्याचं पूर्णपणे थांबवतात. यामुळे घरमालकाशी काय बोलावं यावर विचार करायला त्यांना मदत होते

दारासमोर उभे असताना, तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी चांगली वागणूक ठेवू शकता?