व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पत्रिका)

प्रश्न: भविष्यात तुम्हाला अशा एका जगात राहायला आवडेल का जिथे आपल्या सर्वांकडे एक समाधानी काम असेल, आपल्याला कोणताही आजार किंवा दुःख नसेल आणि आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नेहमीसाठी जगू शकू?

वचन: स्तो ३७:११, २९

सादरता: हे सर्व कसं शक्य होणार आहे, याबद्दल या पत्रिकेत अधिक माहिती दिली आहे.

सत्य शिकवा

प्रश्न: आज जगात इतकं दुःख का आहे?

वचन: १यो ५:१९

सत्य: सैतान या जगाचा अधिकारी आहे.

बायबल अभ्यास कसा चालवला जातो?

सादरता: आम्ही यहोवाचे साक्षीदार एका मोफत अभ्यास कार्यक्रमाद्वारे लोकांना काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळवायला मदत करत आहोत. जसं की, आज जगात इतकं दुःख का आहे? तुमचं कुटुंब आनंदी कसं होऊ शकतं? हा अभ्यास कार्यक्रम कसा चालवला जातो ते थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. [बायबल अभ्यास कसा चालवला जातो? हा व्हिडिओ दाखवा.] आपण या साहित्यातून चर्चा करू शकतो. [बायबल अभ्यासाचं एखादं साहित्य दाखवा आणि शक्य असल्यास बायबल अभ्यास कसा चालवला जातो तेसुद्धा थोडक्यात दाखवा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.