व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

वयस्कर स्त्रियांना आई आणि तरुण स्त्रियांना बहीण समजून त्यांच्याशी वागा

वयस्कर स्त्रियांना आई आणि तरुण स्त्रियांना बहीण समजून त्यांच्याशी वागा

मंडळीतल्या वयस्कर भाऊ-बहिणींना आपल्या आई-वडिलांसारखं आणि तरुणांना आपल्या भाऊ-बहिणींसारखं समजून त्यांच्याशी वागा, असं बायबल आपल्याला सांगतं. (१ तीमथ्य ५:१, २ वाचा.) बांधवांनी खासकरून बहिणींसोबत आदराने वागलं पाहिजे.

मंडळीतल्या बहिणींना अवघडल्यासारखं वाटेल असं बांधवांनी त्यांच्यासोबत वागू नये. त्यांनी त्यांच्याशी इष्कबाजी किंवा फ्लर्ट करू नये. (ईयो ३१:१) अविवाहित बांधवाचा जर एखाद्या बहिणीशी लग्न करायचा विचार नसेल तर त्याने तिच्याशी रोमँटिकपणे वागून तिच्या भावनांशी खेळू नये.

मंडळीतल्या एखाद्या बहिणीने जर वडिलांना आदराने काही विचारलं किंवा एखादी गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली, तर त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. वडिलांनी खासकरून अशा बहिणींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, ज्यांना त्यांच्या पतीचा आधार नाही.—रूथ २:८, ९.

मंडळीत कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा—विधवा आणि अनाथ यांच्याबद्दल’   हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • मिंट नावाच्या एका बहिणीला मंडळीतल्या भाऊ-बहिणींनी कशी प्रेमळपणे मदत केली?

  • भाऊ-बहिणींनी दाखवलेल्या प्रेमामुळे गावातल्या लोकांना कशी चांगली साक्ष मिळाली?

  • भाऊ-बहिणींनी दाखवलेल्या प्रेमामुळे त्या बहिणीच्या मुलींवर चांगला परिणाम कसा झाला?

मंडळीतल्या बहिणींबद्दल तुम्हाला काळजी आहे, हे तुम्ही कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी दाखवू शकता?