ख्रिस्ती जीवन
धैर्य दाखवणं शक्य आहे
धैर्य दाखवणारी व्यक्ती खंबीर, धाडसी आणि शूर असते. पण याचा अर्थ असा नाही की ती कधीही घाबरत नाही. उलट, मनात भीती असतानाही ती पाऊल उचलायला मागेपुढे पाहात नाही. यहोवाच्या मदतीनेच आपण धैर्य दाखवू शकतो. (स्तो २८:७) आज तरूण मुलं कशा प्रकारे धैर्य दाखवू शकतात?
भित्र्या लोकांचं नाही, तर धैर्यवान लोकांचं अनुकरण करा! हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
अशा कोणकोणत्या परिस्थिती आहेत ज्यांमध्ये तरुणांना धैर्य दाखवावं लागतं?
-
बायबलच्या कोणत्या अहवालांमुळे आपल्याला धैर्य दाखवायचं प्रोत्साहन मिळतं?
-
धैर्य दाखवल्यामुळे आपल्याला आणि इतरांना कशा प्रकारे फायदा होतो?