व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

लोटच्या बायकोला लक्षात ठेवा

लोटच्या बायकोला लक्षात ठेवा

सदोम सोडून जात असताना लोटच्या बायकोने मागे वळून का पाहिलं? बायबल आपल्याला याचं कारण सांगत नाही. (उत्प १९:१७, २६) पण येशूने दिलेल्या इशाऱ्‍याच्या संदर्भावरून कळतं की मागे सोडून दिलेल्या गोष्टीत तिचं मन गुंतलेलं होतं. (लूक १७:३१, ३२) लोटच्या बायकोसारखं आपण यहोवाची पसंती गमावण्याचं कसं टाळू शकतो? आपण भौतिक गोष्टी मिळवण्याच्या आपल्या इच्छेला प्रथम स्थानी ठेवण्याचं टाळलं पाहिजे. (मत्त ६:३३) येशूने म्हटलं की आपण “देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” (मत्त ६:२४) पण जर आपल्याला दिसून आलं, की भौतिक गोष्टींमुळे आध्यात्मिक गोष्टींपासून आपलं लक्ष विचलित होत आहे तर आपण काय करू शकतो? यासाठी आपण यहोवाकडे समजबुद्धी मागू शकतो ज्यामुळे कुठे सुधारणा केली जाऊ शकते हे ओळखायला आपल्याला मदत होईल. तसंच, सुधारणा करण्यासाठी लागणारं धैर्य व शक्‍तीही आपण प्रार्थनेत मागू शकतो.

तीन भागांचा लोटच्या बायकोला लक्षात ठेवा हा व्हिडिओ आठवा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • मी आपल्या कार्यांतून कसं दाखवू शकतो की मी ‘लोटच्या बायकोला लक्षात ठेवलं’ आहे?

    जास्त पैसा मिळवण्याच्या दबावामुळे ग्लोरियाची विचारसरणी, बोलणं आणि कार्य यांवर कसा प्रभाव झाला?

  • लोटची बायको आपल्यासाठी इशारेवजा उदाहरण कशी आहे?

  • बायबलच्या तत्त्वांचं पालन केल्यामुळे जॉन आणि त्याच्या कुटुंबाला कशी मदत झाली?

  • सोबत काम करणाऱ्‍यांचा प्रभाव अॅनाच्या आध्यात्मिकतेवर कसा पडला?

  • पैशाला जीवनात पहिल्या स्थानी ठेवण्याच्या दबावाचा सामना करण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज का आहे?

  • ब्रायन आणि ग्लोरिया पुन्हा आध्यात्मिक गोष्टींना आपल्या जीवनात प्रथम स्थानी कसं ठेवतात?

  • या व्हिडिओत तुम्हाला कोणकोणती बायबल तत्त्वं लागू केल्याचं दिसून आलं?