ख्रिस्ती जीवन
प्रेम खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे—सत्याबद्दल आनंद माना
हे का महत्त्वाचं: येशूचं अनुकरण करून आपण देवाच्या उद्देशाबद्दल असलेलं सत्य सांगितलं पाहिजे. (योह १८:३७) तसंच, आपण सत्याबद्दल आनंदी असलं पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे. या खोट्या व दुष्ट जगात राहत असताना आपण सत्यानुसार वागलं पाहिजे.—१कर १३:६; फिलि ४:८.
हे कसं करावं:
-
तुम्ही हानीकारक गप्पा ऐकणार किंवा पसरवणार नाही असा ठाम निश्चय करा.—१थेस ४:११
-
इतरांना समस्येत पाहून आनंदी होऊ नका
-
सकारात्मक आणि उत्तेजन देणाऱ्या गोष्टींत आनंद माना
‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्या—अनीतीत आनंद मानू नका, तर सत्यासंबंधी आनंद माना हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
डायना कोणत्या अर्थाने अनीतीत आनंद मानत होती?
-
डायनासोबत बोलत असताना अॅलीसने कशा प्रकारे संभाषण सकारात्मक विषयाकडे वळवलं?
-
आपण कोणत्या काही चांगल्या गोष्टींबद्दल बोलू शकतो?