गीत ४६
यहोवा राजा बनला आहे!
१. राजाधिराज प्रभू याहा,
किती थोर महान, पराक्रमी!
तुझ्या हस्तकृती आम्हा साक्ष देती,
तूच देव सर्वसमर्था!
(कोरस)
हर्षते हे गगन, नाचते ही धरा!
याह झाला आमुचा राजा!
हर्षते हे गगन, नाचते ही धरा!
याह झाला आमुचा राजा!
२. गाऊ याहाच्या गुणगाथा,
सांगू रात्रंदिनी सर्वांना जगी,
राजांचा तो राजा, धरणी स्वर्गाचा,
नीतिवान तो स्वामी विश्वाचा!
(कोरस)
हर्षते हे गगन, नाचते ही धरा!
याह झाला आमुचा राजा!
हर्षते हे गगन, नाचते ही धरा!
याह झाला आमुचा राजा!
३. केले याहाने पुरे मानस,
स्वर्गी स्थापिले ख्रिस्ता राजासनी!
नमवील याहा देवांना जगाच्या,
करील सिद्ध त्याची प्रभुता!
(कोरस)
हर्षते हे गगन, नाचते ही धरा!
याह झाला आमुचा राजा!
हर्षते हे गगन, नाचते ही धरा!
याह झाला आमुचा राजा!
(१ इति. १६:९; स्तो. ६८:२०; ९७:६, ७ देखील पाहा.)