गीत १६
देवराज्याचा आश्रय घ्या!
१. नम्र जनांनो, यहोवाला शोधा!
शोधा याहाची नीती, नम्रता!
राज्य ख्रिस्ताचे आरंभिले स्वर्गी,
जवळ आला दिन याहाचा!
(कोरस)
राज्य देवाचे आशा एकमेव,
भाव ठेवा यावरी!
दुर्ग अजिंक्य यहोवाचे नाव,
धावुनी या शरणी!
२. का आसू गाळिता, का होता व्याकूळ,
नीती सत्याच्या तृषेने तुम्ही?
होउनी अंकित ख्रिस्तशासना,
झुगारा बेडी जुल्माची!
(कोरस)
राज्य देवाचे आशा एकमेव,
भाव ठेवा यावरी!
दुर्ग अजिंक्य यहोवाचे नाव,
धावुनी या शरणी!
३. मान उंचावू या हर्षोल्लासाने,
आहे समीप तारण आता!
दाखवी याह प्रकाशाची वाट,
चला, त्यावरी चालू या!
(कोरस)
राज्य देवाचे आशा एकमेव,
भाव ठेवा यावरी!
दुर्ग अजिंक्य यहोवाचे नाव,
धावुनी या शरणी!
(स्तो. ५९:१६; नीति. १८:१०; १ करिंथ. १६:१३ देखील पाहा.)