व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा!

स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा!
  1. १. वादळी वाऱ्‍यात जगाच्या

    आशेची वात, ती मिणमिणते,

    पण साद ती कानी पडे,

    “तो काळ दूर ना” जी म्हणे.

    (कोरस)

    स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा,

    ते तारुण्य कधीही ना सरे.

    संगे पाखरे गाती गोड गाणी,

    गाऊ आभार आनंदाने, त्या नव्या जगी!

  2. २. सूर ना कधीही ऐकले,

    डोळे माझे थकून गेले,

    गाणी मधूर ऐकू तेव्हा,

    रंगल्या त्या साऱ्‍या दिशा!

    (कोरस)

    स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा,

    ते तारुण्य कधीही ना सरे,

    संगे पाखरे गाती गोड गाणी,

    गाऊ आभार आनंदाने, त्या नव्या जगी!

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    ही पावले जरीही अडखळती,

    पण तेव्हा त्यां रोखे ना कोणी!

    (कोरस)

    स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा,

    ते तारुण्य कधीही ना सरे,

    मग वाऱ्‍यासवे धावू डोंगरांमध्ये,

    आनंद कधी ना मावळे!

    (कोरस)

    स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा,

    ते तारुण्य कधीही ना सरे,

    संगे पाखरे गाती गोड गाणी,

    गाऊ आभार, त्या नव्या जगी!