व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“नव्या जगात!”

“नव्या जगात!”
  1. १. शाल आकाशी रंगली पाहा, आधी कधी न अशी.

    गाऊ त्या खाली, गाणी मिळुनी ती, प्रेमाची, आनंदाची.

    दऱ्‍या नि डोंगरांमध्ये, हिरवे गालीचे.

    वाऱ्‍यासंगे धावे पाहा, मन चोहीकडे.

    (प्री-कोरस)

    पण आता, पाहू वाट ठेवू धीर!

    (कोरस)

    येईल नवा दिन, अन्‌ संपेल दुःख नि काळ शेवटचा.

    हो! यहोवा पूर्ण करेल इच्छा साऱ्‍या मनाच्या.

    नव्या जगात!

  2. २. ऐकू येते, ती खळखळ नदीची; पैंजण जणू पायात.

    आनंदाने, मन गाई साऱ्‍यांचे, होते कसे बावरे.

    भावांच्या हाती हात देऊन, फुलवू या बाग.

    सुखाचं अंगण मिळालं जीवना, आता!

    (कोरस)

    येईल नवा दिन, अन्‌ संपेल दुःख नि काळ शेवटचा.

    हो! यहोवा पूर्ण करेल इच्छा साऱ्‍या मनाच्या.

    नव्या जगात!

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    पण आता, मी ठेवेन जपून हे चित्र मनात.

    येतील त्या जगी रंग सुखाचे जुळून.

    (कोरस)

    येईल नवा दिन अन्‌ संपेल दुखः नि काळ शेवटचा.

    हो! यहोवा पूर्ण करेल इच्छा साऱ्‍या मनाच्या.

    (कोरस)

    येईल नवा दिन अन्‌ संपेल दुःख नि काळ शेवटचा.

    हो! यहोवा पूर्ण करेल इच्छा साऱ्‍या मनाच्या.

    नव्या जगात!

    (शेवट)

    जगात त्या—जगात त्या

    जगात त्या—जगात त्या

    जगात त्या—जगात त्या

    जगात त्या—जगात त्या