व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जपूया एकता सर्वदा!

जपूया एकता सर्वदा!
  • (सुरवातीच्या ओळी)

    गाऊ या सारे एकसुरात,

    गीत हे बंधुप्रेमाचे!

  1. १. यहोवाच्या अंगणी

    फुले सुंदर असंख्य जशी.

    रंग निराळे जरी,

    गंध याहाच्या प्रीतीचा मनी.

    (प्री-कोरस)

    ना सोपे जगणे

    हे जीवन जरी,

    ना एकाकी आपण कधी.

    (कोरस)

    हा भावाबहिणींचा विशाल परिवार,

    भावांची बहिणींची ही एकमेकां साथ.

    मिळाली अमूल्य, याहाकडून ही देण

    एकच देव अन्‌ एक विश्‍वास, ही एकता, जपूया सर्वदा.

  2. २. आहोत भिन्‍न देशांचे,

    जणू धागे उभे-आडवे.

    आणून जवळ आम्हाला,

    याहाने विणला कशिदा सुरेख.

    (प्री-कोरस)

    ना वंशाचा भेद,

    ना भाषेचाही,

    खरे प्रेम ही ओळख आमची.

    (कोरस)

    हा भावाबहिणींचा विशाल परिवार,

    भावांची बहिणींची ही एकमेकां साथ.

    मिळाली अमूल्य, याहाकडून ही देण

    एकच देव अन्‌ एक विश्‍वास, ही एकता, जपूया सर्वदा.

    जपूया ही एकता, जपूया.

    (कोरस)

    हा भावाबहिणींचा विशाल परिवार,

    भावांची बहिणींची ही एकमेकां साथ.

    मिळाली अमूल्य, याहाकडून ही देण

    एकच देव अन्‌ एक विश्‍वास, ही एकता, जपूया सर्वदा.

    जपूया सर्वदा.

    जपूया सर्वदा.