गीत ११७
चांगुलपणा दाखवू या
१. हे य-हो-वा दि-लेस आ-म्हा,
तू ह-जा-रो आ-शी-र्वाद.
तू प-वि-त्र, ए-क-नि-ष्ठ,
आ-हेस कि-ती चां-ग-ला.
तु-झी कृ-पा, तु-झी द-या,
ना आ-म्ही ला-यक त्यां-च्या.
दे-व आम-चा तू य-हो-वा,
क-रू तु-झी-च से-वा.
२. तु-झ्या लो-कां-म-ध्ये दि-से,
जो तु-झा चां-गुल-प-णा.
दिस-ती त्यां-च्यात गु-ण तु-झे,
दे-ती सं-दे-श स-र्वां.
तु-झ्या आ-ज्ञा, तु-झे मेंढ-पाळ,
दि-ले तू आ-म्हा-कर-ता,
क-रू आ-म्ही भ-ली का-मं,
दे-व आम-चा तू भ-ला.
३. भ-लं कर-ण्या रा-हू त-यार,
सा-ऱ्या लो-कां-चं आ-म्ही.
प-री त्या-हून खा-स आ-म्हा,
आम-चे भा-ऊ-ब-हि-णी.
घ-री-दा-री वा शे-जा-री,
अ-सो आ-म्ही कु-ठे-ही.
क-रू का-मं चां-ग-ली ती,
दे तु-झी आ-म्हा श-क्ती.
(स्तो. १०३:१०; मार्क १०:१८; गलती. ५:२२; इफिस. ५:९ ही वचनंसुद्धा पाहा.)