थेस्सलनीकाकर यांना दुसरं पत्र ३:१-१८
३ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो की आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.+ हे यासाठी, की यहोवाच्या* वचनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत राहावा+ आणि जसं तुमच्यामध्ये ते गौरवलं जात आहे, तसंच पुढेही ते गौरवलं जावं;
२ आणि वाईट व दुष्ट माणसांपासून आपलं संरक्षण व्हावं,+ कारण सर्वांजवळच विश्वास असतो असं नाही.+
३ पण, प्रभू विश्वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल.
४ शिवाय, प्रभूमध्ये तुमच्याबद्दल आम्हाला हा भरवसा आहे, की आम्ही दिलेल्या सूचनांचं तुम्ही पालन करत आहात आणि पुढेही करत राहाल.
५ तुम्ही देवावर प्रेम करावं+ आणि ख्रिस्तामध्ये धीर धरावा+ म्हणून प्रभूने तुमच्या मनाला योग्य दिशा दाखवावी, हीच आमची प्रार्थना आहे.
६ आता बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही सूचना देतो, की अशा बांधवापासून दूर राहा जो तुम्हाला* दिलेल्या शिकवणीप्रमाणे* चालत नाही,+ तर अव्यवस्थितपणे वागतो.+
७ आमचं अनुकरण कसं करावं+ हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे. कारण तुमच्यामध्ये असताना आम्ही अव्यवस्थितपणे वागलो नाही,
८ किंवा कोणाचं अन्न फुकट* खाल्लं नाही.+ उलट, तुम्हाला खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू नये, म्हणून आम्ही रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट करत होतो.+
९ अर्थात, आम्हाला तो अधिकार नाही असं नाही,+ पण तुम्ही आमचं अनुकरण करावं म्हणून तुमच्यासमोर स्वतःचं उदाहरण ठेवायची आमची इच्छा होती.+
१० खरंतर, तुमच्यामध्ये असताना आम्ही नेहमी तुम्हाला असा आदेश द्यायचो: “जर कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने खाऊसुद्धा नये.”+
११ कारण आम्ही असं ऐकलं आहे, की तुमच्यापैकी काही जण अव्यवस्थितपणे वागत आहेत.+ ते काहीच काम करत नाहीत, तर दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करतात.+
१२ अशांना, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही ही आज्ञा आणि सल्ला देतो, की त्यांनी शांतपणे आपलं काम करावं आणि स्वतः कमवून खावं.+
१३ बांधवांनो, तुम्ही मात्र चांगलं ते करायचं सोडू नका.
१४ पण, या पत्राद्वारे आम्ही जे सांगितलं त्याचं जर कोणी पालन करत नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्याबरोबर उठणं-बसणं सोडून द्या.+
१५ पण, त्याला शत्रू मानू नका, तर आपला बांधव म्हणून त्याला समजावत राहा.+
१६ आता, शांतीचा प्रभू स्वतः तुम्हाला नेहमी सर्व प्रकारे शांती देत राहो.+ प्रभू तुमच्या सगळ्यांसोबत असो.
१७ मी पौल स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.+ प्रत्येक पत्रात हीच माझी खूण आहे; मी अशाच पद्धतीने लिहितो.
१८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्या सर्वांवर असो.