करिंथकर यांना दुसरं पत्र ३:१-१८

  • शिफारसपत्रं (१-३)

  • नव्या कराराचे सेवक (४-६)

  • नव्या कराराचं तेज आणखी श्रेष्ठ (७-१८)

 आता आम्हाला पुन्हा स्वतःची शिफारस करावी लागणार आहे का? किंवा, काही माणसांप्रमाणे आम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रं लिहून घ्यायची गरज आहे का? २  तुम्ही स्वतःच आमचं शिफारसपत्र आहात.+ हे पत्र आमच्या हृदयावर लिहिलेलं आहे. आणि सगळ्यांना त्याबद्दल माहीत आहे आणि सगळे ते वाचत आहेत. ३  कारण तुम्ही ख्रिस्ताकडून असलेलं शिफारसपत्र आहात हे स्पष्टच आहे. आणि सेवक या नात्याने+ आम्ही हे पत्र लिहिलं आहे. आम्ही ते शाईने नाही, तर जिवंत देवाच्या पवित्र शक्‍तीने;* आणि दगडी पाट्यांवर नाही,+ तर हृदयांवर लिहिलं आहे.+ ४  ख्रिस्ताद्वारे आम्हाला देवासमोर आत्मविश्‍वास आहे. ५  खरंतर, स्वतःच्या बळावर कोणतंही कार्य करण्यासाठी आमच्याजवळ पुरेशी पात्रता नाही. पण स्वतः देव आम्हाला ही पात्रता देतो.+ ६  त्याने खरोखरच आम्हाला पुरेशी पात्रता दिली आहे. हे यासाठी, की आम्ही लेखी नियमांचे नाही,+ तर एका नवीन कराराचे+ आणि पवित्र शक्‍तीचे सेवक व्हावं. कारण लेखी नियम मृत्युदंडासाठी पात्र ठरवतात,+ पण पवित्र शक्‍ती जिवंत करते.+ ७  शिवाय, ज्यांद्वारे मृत्यू येतो आणि जे दगडांवर लिहिण्यात आले,+ ते लेखी नियम इतक्या गौरवी तेजासहित देण्यात आले, की मोशेच्या चेहऱ्‍यावरच्या तेजामुळे+ इस्राएली लोकांना त्याच्याकडे पाहणं शक्य नव्हतं. पण हे तेज पुढे नाहीसं होणार होतं. ८  तर मग, पवित्र शक्‍ती+ ही आणखी जास्त गौरवी तेजासहित दिली जाऊ नये का?+ ९  कारण जर दंडासाठी पात्र ठरवणारे नियम+ तेजस्वी होते,+ तर मग ज्याद्वारे नीतिमान ठरवलं जातं, ते आणखी किती तेजस्वी असेल!+ १०  खरंतर, ज्याला एकेकाळी गौरवी तेजाने समृद्ध करण्यात आलं होतं, त्याचं तेज काढून घेण्यात आलं आहे. कारण जे नंतर आलं ते त्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे.+ ११  जे नाहीसं होणार होतं, ते जर इतक्या गौरवी तेजाने आणण्यात आलं,+ तर मग जे टिकून राहतं त्याचं तेज कितीतरी पटीने जास्त असेल!+ १२  आपल्याला अशी आशा असल्यामुळे+ आपण अगदी मोकळेपणाने बोलतो १३  आणि मोशे जसं करायचा, तसं आपण करत नाही. जे नाहीसं होणार होतं त्याच्या तेजाकडे* इस्राएली लोकांनी एकसारखं पाहू नये, म्हणून तो आपला चेहरा पडद्याने झाकून घ्यायचा.+ १४  पण त्या लोकांची बुद्धी मंद झाली होती.+ खरं पाहिलं, तर आजपर्यंत जेव्हाही जुन्या कराराचं वाचन केलं जातं, तेव्हा त्यांचं हृदय पूर्वीसारखंच पडद्याने झाकलेलं असतं.+ कारण तो पडदा फक्‍त ख्रिस्ताद्वारे काढून टाकला जातो.+ १५  खरंतर, आजही जेव्हा जेव्हा मोशेची लिखाणं वाचली जातात,+ तेव्हा तेव्हा त्यांचं हृदय जणू पडद्याने झाकलेलं असतं.+ १६  पण, जेव्हा कोणी यहोवाकडे* वळतं तेव्हा हा पडदा काढून टाकला जातो.+ १७  यहोवा* अदृश्‍य व्यक्‍ती आहे+ आणि जिथे यहोवाची* पवित्र शक्‍ती आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.+ १८  आपले चेहरे पडद्याने झाकलेले नाहीत, तर आपण सगळे आरशांप्रमाणे यहोवाचं* तेज प्रतिबिंबित करतो. आणि असं करत असताना, आपलं स्वरूप देवासारखं बनत चाललं आहे. यहोवा,* जो अदृश्‍य आहे, तो* ज्याप्रमाणे आपलं रूपांतर घडवून आणत आहे, अगदी त्याचप्रमाणे आपण दिवसेंदिवस त्याचं तेज आणखी जास्त प्रतिबिंबित करत आहोत.+

तळटीपा

किंवा “परिणामाकडे; शेवटाकडे.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा कदाचित, “यहोवाची पवित्र शक्‍ती.”