होशेय ११:१-१२
११ “इस्राएल लहान मुलगा होता, तेव्हा मी त्याच्यावर प्रेम केलं,+मी माझ्या मुलाला इजिप्तमधून बोलावलं.+
२ त्यांनी* त्यांना जितकं जास्त बोलावलं,तितकेच ते दूर गेले.+
ते बआलच्या मूर्तींना बलिदानं देत राहिले+आणि कोरलेल्या मूर्तींपुढे अर्पणं करत राहिले.+
३ मीच एफ्राईमला चालायला शिकवलं,+ आणि त्यांना उचलून घेतलं;+पण मी त्यांना बरं केलं, हे त्यांनी ओळखलं नाही.
४ मी त्यांना दयेने आणि प्रेमाने आपल्याजवळ ओढून घेतलं;*+मी त्यांच्या मानेवरून* जू* काढलं,आणि प्रेमाने प्रत्येकाला अन्न आणून दिलं.
५ ते इजिप्तला परत जाणार नाहीत, पण अश्शूर त्यांचा राजा होईल,+कारण ते माझ्याकडे परत यायला तयार झाले नाहीत.+
६ एफ्राईमच्या शहरांविरुद्ध तलवार फिरेल,+आणि ती त्याचे अडसर तोडून त्यांचा नाश करेल, कारण त्यांनी दुष्ट योजना केल्या आहेत.+
७ माझ्या लोकांनी माझ्याशी अविश्वासूपणे वागण्याचा निश्चय केला आहे.+
त्यांनी त्यांना वर बोलावलं,* पण कोणी उठून आलं नाही.
८ हे एफ्राईम, मी तुला कसं सोडून देईन?+
हे इस्राएल, मी तुला शत्रूंच्या हाती कसा देईन?
मी तुझ्याशी अदमासारखा कसा वागीन?
मी तुला सबोईमसारखं कसं करीन?+
माझं मन बदललं आहे;आणि त्याच वेळी माझ्या हृदयात कालवाकालव झाली आहे.+
९ मी माझ्या क्रोधाचा अग्नी भडकू देणार नाही.
मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही,+कारण मी माणूस नाही, तर देव आहे,मी तुमच्यासोबत असणारा पवित्र देव आहे;आणि मी संतापाच्या भरात तुमच्याकडे येणार नाही.
१० ते यहोवामागे चालतील आणि तो सिंहासारखा गरजेल;+तो गर्जना करेल, तेव्हा त्याची मुलं पश्चिमेकडून थरथर कापत येतील.+
११ ते इजिप्तमधून पक्ष्यांसारखे,आणि अश्शूरमधून कबुतरासारखे थरथर कापत येतील;+आणि मी त्यांना त्यांच्या घरी परत आणीन,” असं यहोवा म्हणतो.+
१२ “एफ्राईमने मला खोटेपणानेआणि इस्राएलच्या घराण्याने मला फसवणुकीने घेरलं आहे.+
पण यहूदा अजूनही देवासोबत फिरतो,*आणि तो परमपवित्र देवाला विश्वासू आहे.”+
तळटीपा
^ म्हणजे, इस्राएलला शिकवण्यासाठी पाठवलेल्या संदेष्ट्यांनी आणि इतरांनी.
^ शब्दशः “माणसाच्या आणि प्रेमाच्या दोऱ्यांनी मी त्यांना ओढत राहिलो.”
^ शब्दशः “जबड्यांतून.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, उच्च दर्जाच्या उपासनेकडे.
^ किंवा “चालतो.”