स्तोत्रं ९८:१-९
-
यहोवा, तारण करणारा आणि नीतिमान न्यायाधीश
-
यहोवाने केलेलं तारण प्रकट (२, ३)
-
गीत.
९८ यहोवासाठी एक नवीन गीत गा,+कारण त्याने अद्भुत गोष्टी केल्या आहेत.+
त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण केलंय.*+
२ यहोवाने तारण करण्याचं त्याचं सामर्थ्य प्रकट केलंय;+त्याने राष्ट्रांसमोर आपलं नीतिमत्त्व जाहीर केलंय.+
३ इस्राएल घराण्यावरच्या आपल्या एकनिष्ठ प्रेमाची आणि विश्वासूपणाची त्याने आठवण केली आहे.+
आपल्या देवाने केलेलं तारण* सबंध पृथ्वीने पाहिलंय.+
४ पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांनो, यहोवाचा जयजयकार करा!
आनंदित व्हा, जल्लोष करा आणि त्याचं गुणगान करा!*+
५ वीणेवर* यहोवाची स्तुती गा,*वीणा* वाजवून आणि सुरेल गीत गाऊन;
६ कर्णे आणि शिंग फुंकून+आपल्या राजासमोर, यहोवासमोर जयजयकार करा!
७ समुद्र आणि त्यातलं सर्वकाही;पृथ्वी आणि तिच्यावर राहणारे सर्व लोक जल्लोष करोत.
८ नद्यांनो, टाळ्या वाजवा;पर्वतांनो, तुम्ही सर्व मिळून जल्लोष करा!+
९ यहोवासमोर जल्लोष करा, कारण तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.*
तो सबंध पृथ्वीचा नीतिमत्त्वाने+आणि सर्व लोकांचा विश्वासूपणे न्याय करेल.+
तळटीपा
^ किंवा “त्याला विजय मिळवून दिला आहे.”
^ किंवा “आपल्या देवाला मिळालेला विजय.”
^ किंवा “संगीत रचा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “यहोवासाठी संगीत रचा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “आला आहे.”