स्तोत्रं ९:१-२०
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. मथ-लाबेन* याच्या चालीवर गायलं जावं.
א [आलेफ ]
९ हे यहोवा, मी अगदी पूर्ण मनाने तुझी स्तुती करीन;तू केलेल्या अद्भुत गोष्टींचं मी वर्णन करीन.+
२ मी तुझ्यामुळे आनंद करीन आणि हर्षित होईन;हे सर्वोच्च देवा, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.*+
ב [बेथ ]
३ माझे शत्रू माघार घेतील;+ते अडखळून पडतील आणि तुझ्यासमोरून नष्ट होतील.
४ कारण तू माझ्या हक्काचं समर्थन करतोस;तू आपल्या राजासनावर बसून नीतीने न्याय करतोस.+
ג [गिमेल ]
५ तू राष्ट्रांना शिक्षा केली आहेस;+ तू दुष्टांचा नाश केला आहेस.
तू सदासर्वकाळासाठी त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकलं आहेस.
६ शत्रूंचा कायमचा नाश झालाय;तू त्यांची शहरं उद्ध्वस्त केली आहेस,त्यांची आठवणही कोणाला राहणार नाही.+
ה [हे ]
७ पण यहोवा राजासनावर बसून सर्वकाळासाठी राज्य करेल;+त्याने न्यायासाठी आपलं राजासन स्थिर केलंय.+
८ तो सबंध पृथ्वीचा* नीतीने न्याय करेल;+तो नीतीने राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल;+
ו [वाव ]
९ अत्याचार सोसणाऱ्यांसाठी यहोवा सुरक्षित आश्रय* होईल,+संकटाच्या वेळी तो त्यांचा सुरक्षित आश्रय ठरेल.+
१० तुझं नाव जाणणारे तुझ्यावर भरवसा ठेवतील;+हे यहोवा, तुझा शोध घेणाऱ्यांना तू कधीही त्यागणार नाहीस.+
ז [झाइन ]
११ सीयोनमध्ये राहणाऱ्या यहोवाची स्तुती गा;त्याच्या कार्यांबद्दल सर्व लोकांना सांगा.+
१२ तो दुःखीकष्टी लोकांचा आक्रोश विसरणार नाही.+
त्यांच्या रक्ताचा सूड घेणारा देव त्यांची आठवण ठेवतो.+
ח [हेथ ]
१३ हे यहोवा, मरणाच्या दारातून मला परत आणणाऱ्या देवा,+माझ्यावर कृपा कर; माझा द्वेष करणारे मला कसे छळतात ते पाहा.
१४ म्हणजे मी सीयोनच्या मुलीच्या फाटकांजवळ, तुझी प्रशंसनीय कार्यं घोषित करीन;+तू केलेल्या तारणाच्या कृत्यांबद्दल मी आनंद करीन.+
ט [तेथ ]
१५ राष्ट्रांनी खोदलेल्या खड्ड्यात, ती स्वतःच पडली आहेत;त्यांनी लपवलेल्या जाळ्यात, त्यांचाच पाय अडकलाय.+
१६ यहोवाला त्याच्या न्यायदंडावरून ओळखलं जातं.+
दुष्ट स्वतःच्याच कृत्यांच्या पाशात सापडलाय.+
हिग्गायोन.* (सेला )
י [योद ]
१७ दुष्ट लोक आणि देवाला विसरणारी राष्ट्रंपरत कबरेकडे* जातील.
१८ पण गरिबांकडे कायम दुर्लक्ष केलं जाणार नाही;+दीनदुबळ्यांची आशा कधीच नाहीशी होणार नाही.+
כ [खाफ ]
१९ हे यहोवा, ऊठ! नाशवंत माणसाचा विजय होऊ देऊ नकोस.
राष्ट्रांचा तुझ्यादेखत न्याय होऊ दे.+
२० हे यहोवा, त्यांना घाबरवून सोड.+
राष्ट्रांना कळू दे, की ते केवळ मानव आहेत. (सेला )
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “संगीत रचीन.”
^ किंवा “उपजाऊ जमिनीचा.”
^ किंवा “उंच आश्रयस्थान.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.