स्तोत्रं ६५:१-१३

  • देव पृथ्वीची काळजी घेतो

    • प्रार्थना ऐकणारा देव ()

    • तू ज्याला निवडतोस तो सुखी ()

    • देवाचा विशाल चांगुलपणा (११)

दावीदचं गीत. स्तुतिगीत. संचालकासाठी. ६५  हे देवा, सीयोनमध्ये+ तुझी स्तुती होईल;आम्ही तुला केलेले नवस फेडू.+  २  हे प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.+  ३  माझ्या चुकांनी मला घेरलंय,+पण तू आमचे अपराध क्षमा करतोस.+  ४  तुझ्या अंगणांत राहण्यासाठी+तू ज्याला निवडतोस आणि आपल्याजवळ येऊ देतोस,तो माणूस सुखी आहे! तुझ्या मंदिराच्या,तुझ्या पवित्र मंदिराच्या+ उत्तम गोष्टींनी आम्ही तृप्त होऊ.+  ५  हे आमच्या तारण करणाऱ्‍या देवा,तू नीतीने विस्मयकारक गोष्टी करून आमच्या प्रार्थनांचं उत्तर देशील.+ तू सबंध पृथ्वीवरच्या लोकांचा आणिदूर समुद्रांपलीकडे राहणाऱ्‍यांचा भरवसा आहेस.+  ६  तू* आपल्या शक्‍तीने पर्वतांना स्थिर केलंस;तू* खूप सामर्थ्यशाली आहेस.+  ७  तू* खवळलेल्या समुद्राला शांत करतोस,+त्याच्या लाटांची गर्जना आणि राष्ट्रांचा गोंधळ तू शांत करतोस.+  ८  दूरदूरच्या ठिकाणी राहणारे तुझी चिन्हं पाहून विस्मित होतील;+सूर्य उगवतो तिथपासून, तो मावळतो तिथपर्यंत, तू सर्व लोकांना आनंदाने जल्लोष करायला लावशील.  ९  तू पृथ्वीची काळजी घेतोस,तिला सुपीक आणि फलदायी करतोस.*+ देवाची नदी पाण्याने भरून वाहत आहे;तू लोकांना अन्‍नधान्य पुरवतोस,+कारण तू पृथ्वीला फलदायी केलं आहेस. १०  तू तिच्या शेतांना पाणी पुरवतोस आणि त्यांची नांगरलेली जमीन सपाट करतोस;पाऊस पाडून तू मातीला मऊ करतोस आणि तिने उपज द्यावा म्हणून तिला आशीर्वाद देतोस.+ ११  तू आपल्या आशीर्वादांनी वर्ष सजवलं आहेस;*तुझ्या सर्व मार्गांवर भरपूर चांगल्या गोष्टी ओसंडून वाहत आहेत.+ १२  रानातली कुरणं हिरव्यागार गवताने समृद्ध झाली आहेत,*+डोंगर आनंदाने झाकून गेले आहेत.+ १३  कुरणं कळपांनी भरून गेली आहेत,दऱ्‍याखोऱ्‍यांवर* धान्याचा गालीचा पसरला आहे.+ ते सर्व आनंदाने जल्लोष करत आहेत आणि गात आहेत.+

तळटीपा

शब्दशः “तो.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “ओसंडून वाहायला लावतोस.”
शब्दशः “मुकुट घातला आहेस.”
शब्दशः “झिरपत आहेत.”
किंवा “खालच्या मैदानांवर.”