स्तोत्रं ६:१-१०
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. हे गीत शमीनीथ* या सुरावर तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.
६ हे यहोवा, रागाच्या भरात माझं ताडन करू नकोस,क्रोधाने मला शिक्षा करू नकोस.+
२ हे यहोवा, माझ्यावर कृपा* कर, कारण मी दुर्बळ होत चाललोय.
हे यहोवा, मला बरं कर,+ कारण माझी हाडं खिळखिळी झाली आहेत.
३ मी* खरंच खूप अस्वस्थ झालोय.+
हे यहोवा, मला सांग, मी अजून किती वाट पाहू?+
४ हे यहोवा, परत ये आणि माझी* सुटका कर;+तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला वाचव.+
५ कारण मृत लोक तुझा उल्लेख* करत नाहीत;कबरेत* कोण तुझी स्तुती करेल?+
६ मी कण्हून कण्हून थकलोय;+रात्रभर माझा बिछाना अश्रूंनी ओलाचिंब होतो;माझ्या पलंगावर आसवांचा पूर येतो.+
७ शोकाने माझे डोळे थकले आहेत;+छळ करणाऱ्यांमुळे माझी दृष्टी अंधूक झाली आहे.
८ दुष्टपणे वागणाऱ्यांनो, तुम्ही सगळे माझ्यापासून दूर व्हा,कारण यहोवा माझ्या रडण्याचा आवाज नक्की ऐकेल.+
९ यहोवा माझी कृपेची याचना ऐकेल;+यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल.
१० माझे सर्व शत्रू लज्जित आणि भयभीत होतील;एकाएकी झालेल्या अपमानामुळे* ते माघार घेतील.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “दया.”
^ किंवा “माझा जीव.”
^ किंवा “माझ्या जिवाची.”
^ किंवा “तुझी आठवण.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “मानहानीमुळे.”