स्तोत्रं ४८:१-१४

  • सीयोन, महान राजाची नगरी

    • सबंध पृथ्वीचा आनंद ()

    • नगरीची आणि तिच्या बुरुजांची पाहणी करा (११-१३)

कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत. ४८  आमच्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर,यहोवा महान आणि सगळ्यात स्तुतिपात्र आहे.  २  उत्तरेच्या टोकावर सीयोन पर्वत,महान राजाची नगरी आहे.+ उंचावर वसलेली ती सुंदर नगरी, सबंध पृथ्वीचा आनंद आहे.+  ३  तिच्या मजबूत बुरुजांमध्ये,देवाने स्वतःला एक सुरक्षित आश्रय* म्हणून प्रकट केलंय.+  ४  कारण पाहा! राजे एकत्र जमले;*ते सोबत मिळून पुढे सरसावले.  ५  त्यांनी तिला पाहिलं, तेव्हा ते चकित झाले. ते भयभीत झाले आणि घाबरून पळून गेले.  ६  ते तिथे भीतीने थरथर कापू लागले,प्रसूतिवेदना होणाऱ्‍या स्त्रीसारखी त्यांची स्थिती झाली.  ७  पूर्वेकडच्या वाऱ्‍याने तू तार्शीशची जहाजं तोडतोस.  ८  पूर्वी ज्याबद्दल ऐकलं होतं, ते आता आम्ही,सैन्यांचा देव यहोवा याच्या नगरीत, आमच्या देवाच्या नगरीत आपल्या डोळ्यांनी पाहिलंय;देव सर्वकाळ या नगरीचं रक्षण करतो.+ (सेला )  ९  हे देवा, तुझ्या मंदिरामध्येआम्ही तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल विचार* करतो.+ १०  हे देवा, तुझ्या नावाप्रमाणेच तुझा महिमा पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत पोहोचलाय.+ तुझा उजवा हात नीतीने परिपूर्ण आहे.+ ११  सीयोन पर्वत+ आनंद करो! यहूदाची शहरं* तुझ्या न्याय-निर्णयांमुळे हर्ष करोत!+ १२  सीयोनभोवती फिरा; तिला फेरा घाला;तिचे बुरूज मोजा.+ १३  तिच्याभोवती असलेल्या भिंतींकडे* लक्ष द्या.+ तिच्या मजबूत बुरुजांची पाहणी करा. म्हणजे पुढच्या पिढ्यांना तुम्हाला या गोष्टी सांगता येतील. १४  कारण हा देव, आमचा सदासर्वकाळाचा देव आहे.+ तो शेवटपर्यंत* आम्हाला मार्ग दाखवेल.+

तळटीपा

किंवा “उंच आश्रयस्थान.”
किंवा “ठरवून भेटले.”
किंवा “मनन.”
शब्दशः “मुली.”
किंवा “तटबंदीकडे.”
किंवा कदाचित, “आम्ही मरेपर्यंत.”