स्तोत्रं १०५:१-४५

  • यहोवाने आपल्या लोकांसाठी केलेली विश्‍वासूपणाची कार्यं

    • देव आपला करार लक्षात ठेवतो (८-१०)

    • “माझ्या अभिषिक्‍त जनांना हात लावू नका” (१५)

    • गुलाम म्हणून विकलेल्या योसेफचा देवाने वापर केला (१७-२२)

    • इजिप्तमध्ये देवाचे चमत्कार (२३-३६)

    • इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडतात (३७-३९)

    • अब्राहामला दिलेल्या वचनाची देव आठवण करतो (४२)

१०५  यहोवाचे आभार माना,+ त्याचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करा,राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांना त्याच्या कार्यांबद्दल सांगा!+  २  त्याच्यासाठी गीत गा, त्याच्या स्तुतीसाठी गीत गा,*त्याच्या सर्व अद्‌भुत कार्यांवर मनन करा.*+  ३  त्याच्या पवित्र नावाचा अभिमानाने गौरव करा.+ यहोवाचा शोध घेणाऱ्‍यांचं मन हर्षित होवो.+  ४  यहोवाचा आणि त्याच्या सामर्थ्याचा शोध घ्या.+ आपले डोळे सतत त्याच्याकडे लावा.  ५  त्याने केलेली अद्‌भुत कार्यं आठवा,त्याचे चमत्कार आणि त्याने जाहीर केलेले न्याय-निर्णय आठवा.+  ६  त्याचा सेवक अब्राहाम याच्या वंशजांनो,+याकोबच्या मुलांनो, त्याच्या निवडलेल्या लोकांनो, तुम्ही ते आठवा.+  ७  तो आपला देव यहोवा आहे.+ त्याचे न्याय-निर्णय संपूर्ण पृथ्वीसाठी आहेत.*+  ८  त्याचा करार तो सर्वकाळ आठवणीत ठेवतो,+त्याने दिलेलं अभिवचन* तो हजारो पिढ्यांपर्यंत लक्षात ठेवतो.+  ९  त्याने अब्राहामसोबत केलेला करार+आणि शपथ घेऊन इसहाकला दिलेलं वचन तो लक्षात ठेवतो.+ १०  त्याने ती शपथ, याकोबसाठी एक नियम म्हणूनआणि इस्राएलसाठी कायमचा करार म्हणून स्थापन केली. ११  तो म्हणाला होता, “मी तुम्हाला कनान देश देईन,+वारसा म्हणून मी तो तुम्हाला देईन.”+ १२  त्या वेळी त्यांची संख्या कमी होती,+हो, ते संख्येने अगदीच कमी होते आणि विदेशी म्हणून त्या देशात राहत होते.+ १३  ते एका राज्यातून दुसऱ्‍या राज्यात,एका राष्ट्रातून दुसऱ्‍या राष्ट्रात भटकत राहिले.+ १४  त्याने कोणत्याही माणसाला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही,+उलट त्यांच्यासाठी त्याने राजांना फटकारलं.+ १५  तो म्हणाला, “माझ्या अभिषिक्‍त जनांना हात लावू नका,माझ्या संदेष्ट्यांना कसलाही त्रास देऊ नका.”+ १६  त्याने देशात दुष्काळ आणला;+त्याने त्यांचा अन्‍नपुरवठा थांबवला.* १७  त्याने त्यांच्यापुढे एका माणसाला, योसेफला पाठवलं;त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं.+ १८  त्याच्या पायात बेड्या घालण्यात आल्या;*+त्याच्या गळ्यात लोखंडी साखळ्या घालण्यात आल्या. १९  यहोवाचे शब्द खरे ठरेपर्यंत,+त्याच्या वचनांनी त्याला शुद्ध केलं. २०  राजाने त्याची सुटका करायला माणसं पाठवली,+लोकांच्या शासकाने त्याला मुक्‍त केलं. २१  त्याने त्याला आपल्या घराण्याचा मालकआणि आपल्या सगळ्या संपत्तीवर अधिकारी म्हणून नेमलं.+ २२  त्याने त्याला आपल्या अधिकाऱ्‍यांशी मनाप्रमाणे वागण्याचा;आणि आपल्या वडीलजनांना बुद्धी शिकवण्याचा अधिकार दिला.+ २३  मग इस्राएल इजिप्तला आला;+हामच्या देशात याकोब विदेशी म्हणून राहिला. २४  देवाने आपल्या लोकांना खूप फलदायी केलं;+त्यांच्या शत्रूंपेक्षा त्याने त्यांना शक्‍तिशाली केलं.+ २५  त्याने शत्रूंची मनं बदलू दिली;त्यांना आपल्या लोकांचा द्वेष करू दिला आणि आपल्या सेवकांविरुद्ध कटकारस्थानं करू दिली.+ २६  त्याने आपला सेवक मोशे याला पाठवलं+आणि आपण ऩिवडलेल्या अहरोनलाही पाठवलं.+ २७  त्यांनी लोकांसमोर* त्याची चिन्हं दाखवली;हामच्या देशात त्यांनी त्याचे चमत्कार दाखवले.+ २८  त्याने अंधार पाठवला तेव्हा देशात काळोख झाला;+त्यांनी* त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलं नाही. २९  त्याने त्यांच्या पाण्याचं रक्‍त केलंआणि त्यातले मासे मारून टाकले.+ ३०  त्यांचा देश बेडकांनी भरून गेला,+राजाच्या महालातही बेडकं शिरली. ३१  त्याने गोमाश्‍यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिलाआणि त्यांच्या सगळ्या प्रदेशांत चिलटं पाठवली.+ ३२  त्याने त्यांच्यावर पावसाऐवजी गारा पाडल्याआणि त्यांच्या देशात विजा* पाठवल्या.+ ३३  त्याने त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडं नष्ट केलीआणि त्यांच्या प्रदेशातल्या झाडांचा नाश केला. ३४  टोळांनी हल्ला करावा असा त्याने आदेश दिला,तेव्हा असंख्य टोळ आले.+ ३५  त्यांनी देशातली सगळी झाडंझुडपंआणि जमिनीचं पीक फस्त केलं. ३६  मग त्यांच्या देशातल्या प्रत्येक प्रथम जन्मलेल्या,त्यांच्या पुरुषत्वाच्या पहिल्या फळाला त्याने मारून टाकलं.+ ३७  त्याने आपल्या लोकांना सोनंचांदी घेऊन बाहेर आणलं;+त्याच्या वंशांपैकी कोणीही अडखळलं नाही. ३८  ते गेले तेव्हा इजिप्तच्या लोकांना आनंद झाला,कारण त्यांना इस्राएली लोकांची* दहशत बसली होती.+ ३९  त्याने ढगाचा पडदा पसरवून आपल्या लोकांचं संरक्षण केलं+आणि त्याने रात्री आगीने त्यांना उजेड दिला.+ ४०  त्यांनी मागणी केली तेव्हा त्याने लावे* आणले;+आकाशातल्या भाकरीने तो त्यांना तृप्त करत राहिला.+ ४१  त्याने खडक फोडला तेव्हा पाणी बाहेर आलं;+वाळवंटात नदीसारखं पाणी वाहू लागलं.+ ४२  कारण त्याने आपला सेवक, अब्राहाम याला दिलेलं पवित्र वचन आठवणीत ठेवलं.+ ४३  त्यामुळे त्याने आपल्या लोकांना जयजयकार करत बाहेर आणलं,+त्याने आपल्या निवडलेल्या लोकांना जल्लोष करत बाहेर आणलं. ४४  त्याने त्यांना राष्ट्रांचे प्रदेश दिले;+इतरांच्या कष्टाचं फळ त्यांना वारसा म्हणून मिळालं.+ ४५  त्याच्या लोकांनी त्याचे आदेश आणि कायदे पाळावेत,+म्हणून त्याने असं केलं. याहची स्तुती करा!*

तळटीपा

किंवा कदाचित, “कार्यांबद्दल बोला.”
किंवा “संगीत रचा.”
किंवा “पृथ्वीवर लागू होतात.”
शब्दशः “त्याने आज्ञा दिलेला शब्द.”
शब्दशः “भाकरींची प्रत्येक सळई मोडली.” हे कदाचित भाकरी अडकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या सळयांना सूचित करत असावं.
शब्दशः “पीडित केलं.”
हे इजिप्तच्या लोकांना सूचित करतं.
हे कदाचित मोशे आणि अहरोन यांना सूचित करत असावं.
किंवा “अग्निज्वाला.”
शब्दशः “त्यांची.”
एक लहानसा १८ सें.मी. (७ इंच) लांबीचा गुबगुबीत पक्षी, ज्याचं मांस खूप चविष्ट असतं.
किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.