यहेज्केल १५:१-८
-
यरुशलेम ही काहीही कामाची नसलेली द्राक्षवेल (१-८)
१५ मग, यहोवाकडून मला पुन्हा एकदा संदेश मिळाला. तो मला म्हणाला:
२ “मनुष्याच्या मुला, द्राक्षवेलाच्या लाकडाची तुलना दुसऱ्या एखाद्या झाडाच्या लाकडाशी किंवा जंगलातल्या झाडाच्या फांदीशी केली जाऊ शकते का?
३ त्याच्यापासून बनलेला दांडा काही कामाचा असतो का? किंवा लोक भांडी अडकवण्यासाठी त्याच्यापासून खुंटी बनवतात का?
४ बघ! त्याचं लाकूड सरपण म्हणून आगीत जाळलं जातं. त्या आगीत त्याची दोन्ही टोकं जळून जातात आणि त्याचा मधला भागही भस्म होतो. त्यानंतर ते काही कामाचं राहतं का?
५ जळायच्या आधी जर त्याचा काही उपयोग नव्हता, तर मग आगीत जळून भस्म झाल्यावर त्याचा कितपत उपयोग होईल?”
६ “म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘मी जसं जंगलातल्या झाडांपैकी द्राक्षवेलाचं लाकूड सरपण म्हणून जाळायला दिलंय, तसं मी यरुशलेमच्या रहिवाशांच्या बाबतीत करीन.+
७ पाहा! मी त्यांच्या विरोधात आहे. ते एका आगीतून वाचलेत, पण आता दुसरी आग त्यांना भस्म करेल. मी त्यांचा विरोध करीन, तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.’”+
८ “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी सगळा देश उद्ध्वस्त करून टाकीन.+ कारण ते माझ्याशी अविश्वासूपणे वागलेत.’”+