यशया ६०:१-२२
६० “हे स्त्री, ऊठ!+ आपला प्रकाश झळकू दे, कारण तुझा प्रकाश आला आहे.
यहोवाच्या वैभवाचं तेज तुझ्यावर चमकत आहे.+
२ बघ, पृथ्वी अंधाराने झाकली जाईल,आणि राष्ट्रं दाट काळोखात बुडतील;पण तुझ्यावर मात्र यहोवाचा प्रकाश पडेल,त्याच्या वैभवाचं तेज तुझ्यावर चमकेल.
३ राष्ट्रं तुझ्या प्रकाशाकडे,+ आणि राजे+ तुझ्या वैभवशाली तेजाकडे* येतील.+
४ आपली नजर वर करून सगळीकडे पाहा!
ते सर्व एकत्र जमून तुझ्याकडे येत आहेत;तुझी मुलं दूरच्या ठिकाणांहून येत आहेत,+आणि तुझ्या मुलींना कडेवर बसवून आणलं जात आहे.+
५ तू हे पाहशील तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळकेल,+तुझ्या काळजाची धडधड वाढेल आणि तुझं मन आनंदाने भरून जाईल.
कारण समुद्रातलं धन तुझ्याकडे लोटलं जाईल;राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे चालून येईल.+
६ मिद्यान आणि एफामधल्या+ उंटांच्या झुंडी तुझा देश भरून टाकतील.
आणि शबामधले सगळे लोक सोनं आणि ऊद* घेऊन तुझ्याकडे येतील.
ते सर्व आनंदाने यहोवाची स्तुती गातील.+
७ केदारच्या+ सगळ्या कळपांना एकत्र जमवून तुझ्याकडे आणलं जाईल.
नबायोथचे+ एडके तुझी सेवा करतील.
मी माझ्या वेदीवर बलिदान म्हणून त्यांचा स्वीकार करीन,+आणि माझ्या वैभवशाली मंदिराची शोभा वाढवीन.+
८ ढगांसारखे उडत येणारे हे कोण आहेत?
कबुतरांसारखं आपल्या कबुतरखान्यात येणारे हे कोण आहेत?
९ द्वीपं माझी आशा धरतील.+
तुझ्या मुलांना त्यांच्या सोन्या-चांदीसह लांबून आणण्यात,+तार्शीशची जहाजं सगळ्यात पुढे आहेत.
तुझा देव यहोवा, इस्राएलचा पवित्र देव याच्या नावाच्या गौरवासाठी ते येत आहेत.
कारण तो तुला वैभवशाली करेल.+
१० विदेशी लोक तुझ्या शहराच्या भिंती बांधतील,आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील.+
मी रागाच्या भरात जरी तुला शिक्षा केली होती,तरी आता मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझ्यावर दया करीन.+
११ तुझ्या शहराचे दरवाजे कायम उघडे ठेवले जातील;+दिवसा किंवा रात्रीही ते बंद केले जाणार नाहीत.
राष्ट्रांची धनसंपत्ती तुझ्याकडे आणण्यासाठी हे होईल.
आणि असं करण्यात त्यांचे राजे पुढे असतील.+
१२ कारण जे राष्ट्र किंवा जे राज्य तुझी सेवा करणार नाही त्याचा नाश होईल;अशा सर्व राष्ट्रांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं जाईल.+
१३ माझ्या मंदिराचं सौंदर्य वाढवण्यासाठी,लबानोनचं वैभव तुझ्याकडे येईल;+गंधसरूची, भद्रदारूची आणि सुरूची झाडं मिळून तुझ्याकडे येतील.+
आणि माझी पाय ठेवायची जागा मी गौरवशाली करीन.+
१४ ज्यांनी तुझ्यावर जुलूम केले त्यांची मुलं तुझ्यापुढे येऊन नमतील;तुझा अपमान करणारे सगळे तुझ्या पायांवर आपलं डोकं टेकवतील.
ते तुला यहोवाची नगरी, इस्राएलच्या पवित्र देवाची सीयोन असं म्हणतील.+
१५ तू टाकून दिलेली होतीस आणि तुझा द्वेष केला जायचा,तुझ्यातून कोणीही ये-जा करत नव्हतं.+
पण आता मी तुला सर्वकाळचं भूषण असं करीन,आणि तुझ्यामुळे सर्व पिढ्यांना आनंद होईल.+
१६ तू राष्ट्रांचं दूध पिशील;+ राजांचे स्तन चोखशील.+
आणि तुला समजून येईल, की मी यहोवा, तुझा तारणकर्ता आहे;याकोबचा शक्तिशाली देव तुझा सोडवणारा आहे.+
१७ मी तांब्याच्या जागी सोनं आणि लोखंडाच्या जागी चांदी आणीन;मी लाकडाच्या जागी तांबं आणि दगडाच्या जागी लोखंड आणीन.
मी शांतीला तुझ्यावर देखरेख करायला नेमीन,आणि नीतिमत्त्वाला तुला काम नेमून देणारा करीन.+
१८ यापुढे तुझ्या देशात हिंसा होणार नाही,तुझ्या सीमांच्या आत नाश किंवा विध्वंस यांचं नावही ऐकू येणार नाही.+
तू तुझ्या शहरांच्या भिंतींना ‘तारण’+ आणि दरवाजांना ‘स्तुती’ असं म्हणशील.
१९ इथून पुढे दिवसा प्रकाशासाठी तुला सूर्याची,आणि रात्री प्रकाशासाठी चंद्राची गरज पडणार नाही.
कारण यहोवा स्वतः तुझा सर्वकाळचा प्रकाश होईल,+तुझा देव तुझं सौंदर्य होईल.+
२० यापुढे तुझा सूर्य कधीही मावळणार नाही,किंवा तुझ्या चंद्राचा प्रकाश कधीही कमी होणार नाही.
कारण यहोवा स्वतः तुझा सर्वकाळचा प्रकाश होईल,+आणि शोक करायचे तुझे दिवस संपलेले असतील.+
२१ तुझे सर्व लोक नीतिमान असतील;ते सर्वकाळासाठी देशाचा ताबा घेतील.
ते माझ्या हातची कार्यं;+माझ्या गौरवासाठी मी लावलेली रोपं आहेत.+
२२ जो सगळ्यात लहान, तो हजार होईल,आणि जो सगळ्यात छोटा, तो शक्तिशाली राष्ट्र बनेल.
मी यहोवा, योग्य वेळी हे लगेच घडवून आणीन.”