यशया ४६:१-१३
४६ बेल दैवत नमलं आहे,+ नबो झुकला आहे.
त्यांच्या मूर्ती प्राण्यांवर, ओझी वाहणाऱ्या प्राण्यांवर लादण्यात आल्या आहेत;+त्या जड ओझ्यांप्रमाणे, थकलेल्या प्राण्यांवर लादण्यात आल्या आहेत.
२ बेल आणि नबो दोघंही झुकले आहेत, ते वाकले आहेत;ते ती ओझी* सोडवू शकत नाहीत,जणू ते स्वतः बंदिवासात जात आहेत.
३ “हे याकोबच्या घराण्या, माझं ऐक!
इस्राएलच्या घराण्यातल्या उरलेल्या लोकांनो, मी काय म्हणतो ते ऐका!+
तुम्ही गर्भात होता, तेव्हापासून मी तुम्हाला सांभाळून नेलं;तुमचा जन्म झाला, तेव्हापासून मी तुमची काळजी घेतली.+
४ तुम्ही म्हातारे होईपर्यंत मी तसाच राहीन;+तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हाला सांभाळून नेईन.
मी आतापर्यंत केलं, तसंच पुढेही तुम्हाला सांभाळून नेईन,तुमची काळजी वाहीन आणि तुमची सुटका करीन.+
५ तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल?
कोणाशी माझी बरोबरी कराल? मला कोणासारखं समजाल,+म्हणजे तो माझ्यासारखा ठरेल?+
६ असे काही लोक आहेत, जे आपल्या बटव्यांतून सोनं उधळतात;ते तराजूवर चांदी तोलून देतात.
ते धातूकाम करणाऱ्याला कामावर ठेवतात,आणि तो त्यापासून देवाची मूर्ती बनवतो.+
मग ते तिच्या पाया पडतात; तिची पूजाअर्चा करतात.+
७ ते त्या मूर्तीला आपल्या खांद्यावर उचलून घेतात;+तिला नेऊन ते तिच्या जागी ठेवतात आणि ती तिथे तशीच राहते.
ती आपल्या जागेवरून हलत नाही.+
ते तिचा धावा करतात, पण ती काही उत्तर देत नाही;ती कोणालाही संकटातून वाचवू शकत नाही.+
८ हे अपराध्यांनो, या गोष्टी लक्षात ठेवा.
त्यांकडे मन लावा, हिंमत हारू नका.
९ फार पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींची आठवण करा,आणि हे समजून घ्या, की मीच देव आहे; मला सोडून दुसरा कोणीही नाही.
मीच देव आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.+
१० मी सुरुवातीलाच, शेवट काय असेल हे सांगतो,आणि ज्या गोष्टी अजून घडल्याही नाहीत, त्यांविषयी मी फार आधीच सांगतो.+
मी म्हणतो, ‘मी जे ठरवलंय ते* नक्की पूर्ण होईल,+आणि माझ्या इच्छेप्रमाणे मी करीन.’+
११ मी पूर्वेकडून एका शिकारी पक्ष्याला बोलावतोय,+मी जे ठरवलंय ते* पूर्ण करण्यासाठी मी दूरच्या देशातून एका माणसाला बोलावतोय.+
मी हे बोललोय आणि ते पूर्णही करीन.
मी हे ठरवलंय आणि ते घडवूनही आणीन.+
१२ हे अडेल मनाच्या लोकांनो, माझं ऐका,नीतिमत्त्वापासून दूर गेलेल्या लोकांनो, माझं ऐका.
१३ माझं नीतिमत्त्व दाखवायची वेळ फार दूर नाही,ती अगदी जवळ आली आहे;माझ्याकडून मिळणाऱ्या तारणाला उशीर होणार नाही.+
मी सीयोनचं तारण करीन, आणि इस्राएलला माझं वैभव देईन.”+
तळटीपा
^ म्हणजे, प्राण्यांवर लादलेल्या मूर्ती.
^ किंवा “माझा उद्देश; माझी योजना.”
^ किंवा “माझा उद्देश; माझी योजना.”