यशया ११:१-१६

  • इशायची फांदी नीतीने शासन करेल (१-१०)

    • लांडगा आणि कोकरू एकत्र राहतील ()

    • संपूर्ण पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल ()

  • उरलेल्या लोकांना पुन्हा आणलं जातं (११-१६)

११  इशायच्या+ बुंध्यातून एक छोटी फांदी+ उगवेल,आणि त्याच्या मुळांतून फुटलेला अंकुर+ फळ देईल.  २  यहोवाची पवित्र शक्‍ती* त्याच्यावर राहील.+ त्यामुळे तो बुद्धिमान+ आणि समंजस असेल,तो उत्तम सल्ला देईल आणि शक्‍तिशाली असेल,+त्याच्याकडे भरपूर ज्ञान असून त्याला यहोवाबद्दल खूप आदर असेल.  ३  यहोवाचं भय बाळगण्यात तो आनंद मानेल.+ डोळ्यांना दिसेल तेवढ्यावरूनच तो न्याय करणार नाही,किंवा कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो कानउघाडणी करणार नाही.+  ४  तो गरिबांना खरा न्याय देईल,*आणि नम्र लोकांच्या भल्यासाठी तो इतरांचं योग्य ताडन करेल. तो पृथ्वीला आपल्या मुखाच्या छडीने मारेल,+आणि आपल्या फुंकरेने दुष्ट लोकांचा नाश करेल.+  ५  नीतिमत्त्व त्याचा कमरबंद,आणि विश्‍वासूपणा त्याच्या कमरेचा पट्टा असेल.+  ६  लांडगा कोकरासोबत शांतीने राहील,+आणि चित्ता बकरीच्या पिल्लाजवळ झोपेल. वासरू, सिंह आणि धष्टपुष्ट प्राणी सगळे एकत्र राहतील;*+आणि एक लहान मूल त्यांना वाट दाखवेल.  ७  गाय व अस्वल एकत्र चरतील,आणि त्यांची पिल्लं एकत्र झोपतील. सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल.+  ८  दूध पिणारं बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल,आणि दूध तुटलेलं मूल विषारी सापाच्या बिळात हात घालेल.  ९  माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते कोणालाही त्रास देणार नाहीत,+किंवा कोणतंही नुकसान करणार नाहीत.+ कारण जसा समुद्र पाण्याने भरलेला आहे,तशी संपूर्ण पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल.+ १०  त्या दिवशी, राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून इशायचं मूळ+ झेंड्यासारखं उभं राहील.+ राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे येतील,*+आणि त्याचं निवासस्थान वैभवशाली होईल. ११  त्या दिवशी, यहोवा आपल्या उरलेल्या लोकांना परत आणण्यासाठी दुसऱ्‍यांदा हात पुढे करेल. तो अश्‍शूर,+ इजिप्त,+ पथ्रोस,+ कूश,+ एलाम,+ शिनार,* हमाथ इथून; तसंच, समुद्राच्या बेटांवरून आपल्या उरलेल्या लोकांना परत आणण्यासाठी हात पुढे करेल.+ १२  तो राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून झेंडा उभारेल आणि इस्राएलच्या विखुरलेल्या लोकांना गोळा करेल.+ तो पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतून यहूदाच्या पांगलेल्या लोकांना एकत्र करेल.+ १३  एफ्राईमची ईर्ष्या नाहीशी होईल,+आणि यहूदाच्या शत्रूंचा नाश होईल. एफ्राईम यहूदाबद्दल ईर्ष्या बाळगणार नाही,आणि एफ्राईमबद्दल यहूदाच्याही मनात शत्रुत्व राहणार नाही.+ १४  ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या उतारांवर* झडप घालतील;एकत्र मिळून ते पूर्वेकडच्या लोकांना लुटतील. ते अदोमवर+ आणि मवाबवर आपला हात उचलतील,*+आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.+ १५  यहोवा इजिप्तच्या समुद्राची खाडी* दुभागेल,*+आणि महानदीवर* आपला हात उगारेल.+ तो आपल्या उष्ण श्‍वासाने* तिचे सात फाटे कोरडे करेल,*आणि लोक पायांतले जोडे न काढता पार जातील. १६  इस्राएल इजिप्तमधून बाहेर निघाला, तेव्हा त्याने त्याच्यासाठी जसा एक महामार्ग बनवला होता,+तसा महामार्ग तो आपल्या उरलेल्या लोकांना अश्‍शूरमधून निघण्यासाठी बनवेल.+

तळटीपा

किंवा “गरिबांचा नीतीने न्याय करेल.”
किंवा कदाचित, “वासरू आणि सिंह एकत्र चरतील.”
किंवा “त्याला शोधतील.”
म्हणजे, बॅबिलोनिया.
शब्दशः “खांद्यांवर.”
किंवा “अधिकार गाजवतील.”
शब्दशः “जीभ.”
किंवा कदाचित, “कोरडी करेल.”
म्हणजे, फरात नदी.
किंवा “पवित्र शक्‍तीने.”
किंवा कदाचित, “तिचे सात फाटे करेल.”