मीखा ७:१-२०

  • इस्राएलची वाईट नैतिक स्थिती (१-६)

    • माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू ()

  • “मी धीराने वाट पाहीन” ()

  • देवाच्या लोकांचा विजय (८-१३)

  • मीखा प्रार्थनेत देवाची स्तुती करतो (१४-२०)

    • यहोवाचं उत्तर  (१५-१७)

    • यहोवासारखा देव कोण आहे (१८)

 अरेरे, माझी किती वाईट स्थिती आहे! मी अशा माणसासारखा आहे,ज्याला उन्हाळ्यातली फळं गोळा केल्यावरआणि कापणीनंतर उरलेली द्राक्षं वेचल्यावर,द्राक्षाचा एकही गुच्छ खायला मिळाला नाही;पहिल्या बहरातलं अंजीर खायची इच्छा असून, मला एकही अंजीर मिळालं नाही.  २  पृथ्वीवरून एकनिष्ठ माणूस नाहीसा झाला आहे;माणसांमध्ये एकही जण प्रामाणिक नाही.+ ते सर्व रक्‍तपात करायला टपलेले असतात.+ प्रत्येक जण जाळं टाकून आपल्याच भावाची शिकार करतो.  ३  त्यांचे हात वाईट कामं करण्यात तरबेज आहेत;+अधिकारी मागण्या करतो,न्यायाधीश मोबदला मागतो,+प्रतिष्ठित माणूस आपल्या इच्छा सांगतो,+ते सर्व मिळून कट रचतात.  ४  त्यांच्यातला सगळ्यात चांगला माणूस काट्यांसारखा आहे,तर सगळ्यात सरळ माणूस, काटेरी कुंपणाहून वाईट आहे. त्यांच्या पहारेकऱ्‍यांचा दिवस आणि तुमचा न्याय करण्याचा दिवस येईल.+ तेव्हा ते घाबरतील.+  ५  आपल्या सोबत्यावर विश्‍वास ठेवू नकोस आणि जवळच्या मित्रावर भरवसा ठेवू नकोस.+ आपल्या बायकोजवळही मनातलं बोलू नकोस.  ६  कारण मुलगा आपल्या वडिलांना तुच्छ समजतो,मुलगी आपल्या आईचा विरोध करते;+आणि सून आपल्या सासूचा विरोध करते;+माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू आहेत.+  ७  पण मी तर यहोवाकडे डोळे लावीन.+ माझं तारण करणाऱ्‍या देवाची मी धीराने वाट पाहीन.*+ माझा देव माझं ऐकेल.+  ८  माझ्या शत्रूने* माझ्यावर आलेलं संकट पाहून खूश होऊ नये. कारण मी पडलो असलो, तरी पुन्हा उठीन;मी अंधारात राहत असलो, तरी यहोवा माझा प्रकाश होईल.  ९  मी यहोवाविरुद्ध पाप केलं आहे.+ म्हणून जोपर्यंत तो माझा खटला चालवून माझा न्याय करत नाही,तोपर्यंत मी त्याचा क्रोध सहन करीन. तो मला बाहेर प्रकाशात आणेल;मी त्याचा न्यायीपणा पाहीन. १०  जी माझी वैरीण आहे, तीसुद्धा हे पाहील,“तुझा देव यहोवा कुठे आहे?”+ असं जी मला म्हणते, ती लज्जित होईल. माझ्या डोळ्यांदेखत हे घडेल. आता तिला रस्त्यावरच्या चिखलासारखं तुडवलं जाईल. ११  तुझ्या भिंती बांधण्याचा तो दिवस असेल;त्या दिवशी सीमा वाढवली जाईल. १२  त्या दिवशी ते तुझ्याकडे येतील. ते थेट अश्‍शूरहून आणि इजिप्तच्या शहरांतून येतील,इजिप्तपासून फरात नदीपर्यंत;एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत आणि एका पर्वतापासून दुसऱ्‍या पर्वतापर्यंत राहणारे लोक तुझ्याकडे येतील.+ १३  देश आपल्या रहिवाशांमुळेआणि त्यांनी केलेल्या कामांमुळे* उजाड होईल. १४  तू आपल्या काठीने तुझ्या लोकांचं, तुझ्या वारशाच्या कळपाचं पालन कर,+तो जंगलात, फळांच्या बागेत एकटा राहत होता. त्यांनी पूर्वीच्या दिवसांसारखं बाशानमध्ये आणि गिलादमध्ये चरावं.+ १५  “तुम्ही इजिप्तच्या देशातून बाहेर आला होता, त्या दिवसांप्रमाणेच,मी त्याला अद्‌भुत गोष्टी दाखवीन.+ १६  राष्ट्रांतले लोक त्या गोष्टी पाहतील आणि खूप शक्‍तिशाली असूनही ते लज्जित होतील.+ ते आपल्या तोंडावर हात ठेवतील;त्यांचे कान बहिरे होतील. १७  ते सापांसारखे धूळ चाटतील;+जमिनीवर सरपटणाऱ्‍या प्राण्यांसारखे ते आपल्या सुरक्षित ठिकाणांतून थरथर कापत येतील. ते भीतभीत देवाकडे, यहोवाकडे येतील,आणि ते त्याचं भय मानतील.”+ १८  तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+ तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+ १९  तू आम्हाला पुन्हा दया दाखवशील;+ तू आमचे अपराध पायाखाली तुडवशील.* तू आमची सर्व पापं खोल समुद्रात टाकून देशील.+ २०  तू पूर्वीच्या काळात आमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे+याकोबशी विश्‍वासूपणे वागशील,आणि अब्राहामला एकनिष्ठ प्रेम दाखवशील.

तळटीपा

किंवा “देवासाठी मी वाट पाहण्याची वृत्ती दाखवीन.”
हिब्रू भाषेत, शत्रू हा शब्द स्त्रीलिंगी आहे.
शब्दशः “त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे.”
किंवा “अपराधांवर मात करशील.”