नीतिवचनं १९:१-२९

  • सखोल समज राग शांत करते (११)

  • भांडखोर बायको गळणाऱ्‍या छतासारखी (१३)

  • सुज्ञ बायको यहोवाकडून मिळते (१४)

  • आशा आहे तोपर्यंत मुलाला शिस्त लाव (१८)

  • बुद्धिमान होण्यासाठी सल्ला ऐकणं (२०)

१९  खोटं बोलणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा+गरीब असणं आणि खरेपणाने चालणं बरं.+  २  माणसाने अज्ञानी असणं ही चांगली गोष्ट नाही,+आणि जो अविचारीपणे वागतो* तो पाप करतो.  ३  माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याला चुकीच्या मार्गाने नेतोआणि त्याचं मन यहोवावर संतापतं.  ४  संपत्ती आली की माणसाला बरेच मित्र मिळतात,पण गरिबाचा एकुलता एक मित्रही त्याला सोडून देतो.+  ५  खोट्या साक्षीदाराला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही,+आणि जो क्षणाक्षणाला खोटं बोलतो तो सुटणार नाही.+  ६  प्रतिष्ठित* माणसाची मर्जी मिळवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात;भेटवस्तू देणाऱ्‍या माणसाचा प्रत्येक जण मित्र असतो.  ७  गरीब माणसाचे सगळे भाऊ त्याचा द्वेष करतात,+मग त्याचे मित्र त्याचा किती तिरस्कार करतील!+ तो विनवण्या करत त्यांच्यामागे जातो, पण कोणीच त्याला उत्तर देत नाही.  ८  जो समज मिळवतो, तो स्वतःवर* प्रेम करतो.+ जो समंजसपणाला मौल्यवान लेखतो, त्याला यश मिळेल.+  ९  खोट्या साक्षीदाराला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही,आणि जो क्षणाक्षणाला खोटं बोलतो त्याचा नाश होईल.+ १०  ऐशआरामात राहणं मूर्खाला शोभत नाही,मग सेवकाला अधिकाऱ्‍यांवर सत्ता चालवणं कसं शोभेल?+ ११  सखोल समज माणसाचा राग शांत करते,+अपराधाकडे* दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा गौरव होईल.+ १२  राजाचा राग सिंहाच्या* डरकाळीसारखा असतो,+पण त्याची कृपा गवतावरच्या दवबिंदूंसारखी असते. १३  मूर्ख मुलगा आपल्या बापावर संकट आणतो,+आणि भांडखोर* बायको सतत गळणाऱ्‍या छतासारखी असते.+ १४  घर आणि संपत्ती वाडवडिलांकडून वारशाने मिळते,पण सुज्ञ बायको यहोवाकडून मिळते.+ १५  आळशीपणामुळे गाढ झोप लागते;सुस्त माणूस उपाशी राहील.+ १६  जो देवाची आज्ञा पाळतो, तो आपला जीव वाचवेल,+पण जो बेपर्वाईने वागतो तो मरेल.+ १७  जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो;+त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.*+ १८  आशा आहे तोपर्यंत आपल्या मुलाला शिस्त लाव,+आणि त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरू नकोस.*+ १९  तापट स्वभावाच्या माणसाला दंड भोगावा लागेल;जर तू एकदा त्याला वाचवलंस, तर तुला पुन्हापुन्हा तसं करावं लागेल.+ २०  भविष्यात बुद्धिमान होण्यासाठी,+सल्ला ऐक आणि शिक्षण* स्वीकार.+ २१  माणसाच्या मनात बऱ्‍याच योजना असतात,पण शेवटी यहोवाचीच इच्छा* पूर्ण होईल.+ २२  दुसऱ्‍यांवर प्रेम करणाऱ्‍या माणसाला चांगलं म्हटलं जातं;+खोटं बोलण्यापेक्षा गरीब असलेलं बरं. २३  यहोवाची भीती जीवनाकडे नेते;+जो ती बाळगतो त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही, त्याला चांगली विश्रांती मिळेल.+ २४  आळशी माणूस मेजवानीच्या ताटात हात तर घालतो,पण तो तोंडाजवळ नेण्याचाही त्रास तो घेत नाही.+ २५  थट्टा करणाऱ्‍याला मार दे,+ म्हणजे अनुभव नसलेल्याला शहाणपण येईल,+आणि समजूतदार माणसाला ताडन दे, म्हणजे त्याचं ज्ञान वाढेल.+ २६  जो मुलगा आपल्या वडिलांशी वाईट वागतो आणि आपल्या आईला हाकलून देतो,तो लाज वाटण्याचं आणि अपमानित होण्याचं कारण ठरतो.+ २७  माझ्या मुला, जर तू ताडनाकडे दुर्लक्ष केलंस,तर तू ज्ञानाच्या मार्गापासून भरकटशील. २८  बिनकामाचा साक्षीदार न्यायाची थट्टा करतो,+आणि दुष्ट लोक वाईट गोष्टी अन्‍नाप्रमाणे गिळून टाकतात.+ २९  थट्टा करणाऱ्‍यांसाठी शिक्षा+आणि मूर्खांच्या पाठीसाठी फटके ठेवलेले आहेत.+

तळटीपा

शब्दशः “घाईघाईने पावलं टाकतो.”
किंवा “उदार.”
किंवा “आपल्या जिवावर.”
किंवा “चुकीकडे.”
किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहाच्या.”
किंवा “कटकटी.”
किंवा “प्रतिफळ देईल.”
किंवा “मृत्यूची इच्छा बाळगू नकोस.”
नीत १:२ इथली तळटीप पाहा.
किंवा “संकल्प.”