शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल याबद्दल अनेक भविष्यवाण्या बायबलमधल्या यहेज्केलच्या पुस्तकात दिल्या आहेत. आपल्यासाठी त्यांचा काय अर्थ होतो हे या प्रकाशनात सांगितलं आहे.
नियमन मंडळाकडून पत्र
आमची मनापासून हीच इच्छा आहे, की या पुस्तकामुळे तुम्हाला यहोवाची शुद्ध उपासना करायला मदत व्हावी, कारण ती मिळण्याचा हक्क त्यालाच आहे.
या पुस्तकाची काही खास वैशिष्ट्यं
चौकटी आणि समयरेषा यांमुळे तुम्हाला दिलेली माहिती आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल.
अध्याय १
“तू फक्त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर”
एदेन बागेत विद्रोहाची सुरुवात करून सैतानाने विश्वावर राज्य करण्याच्या यहोवा देवाच्या अधिकारावर प्रश्न तर उभा केलाच, पण त्यासोबतच शुद्ध उपासनेवर हल्लाही केला.
अध्याय २
देवाने त्यांची अर्पणं स्वीकारली
देवाच्या विश्वासू सेवकांनी केलेल्या उपासनेवरून दिसून आलं, की शुद्ध उपासनेसाठी कोणत्या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
भाग १
“आकाश उघडलं”
अध्याय ३
“मला देवाकडून दृष्टान्त मिळू लागले”
पहिला दृष्टान्त पाहून यहेज्केल खूप चकित होता. देवाच्या विश्वासू सेवकांना त्यातून खूप काही शिकायला मिळतं.
अध्याय ४
‘चार तोंडं असलेले जिवंत प्राणी’ कशाला सूचित करतात?
यहोवाने यहेज्केलला न दिसणाऱ्या खऱ्या गोष्टींबद्दलचे दृष्टान्त दाखवले. त्यामुळे आज आपण ते समजू शकतो.
अध्याय ५
“लोक किती वाईट आणि घृणास्पद कामं करत आहेत ते बघ”
यहेज्केलला दृष्टान्तात मंदिरात होणाऱ्या गोष्टी दाखवल्या जातात. त्याला चार धक्कादायक दृश्यं दिसतात. त्यावरून राष्ट्राची उपासना किती भ्रष्ट झाली आहे ते दिसून येतं.
अध्याय ६
“तुमचा अंत जवळ आलाय”
यहोवा यरुशलेमला शिक्षा कशी करेल याबद्दलची भविष्यवाणी यहेज्केलने अभिनयाच्या स्वरूपात करून दाखवली.
अध्याय ७
राष्ट्रांना “कळून येईल की मी यहोवा आहे”
ज्या राष्ट्रांनी यहोवाच्या नावाची बदनामी केली त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागले. इस्राएली लोकांनी त्या राष्ट्रांसोबत जे संबंध ठेवले त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो?
अध्याय ८
“मी एक मेंढपाळ नेमीन”
देवाने यहेज्केलला मसीहाबद्दल भविष्यवाण्या लिहिण्याची प्रेरणा दिली. भविष्यात येणारा यहोवाच्या लोकांचा हा राजा आणि मेंढपाळ शुद्ध उपासना पुन्हा कायमसाठी सुरू करेल.
अध्याय ९
“मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन”
बाबेलच्या बंदिवासात असलेल्या विश्वासू यहुद्यांना दिलेल्या भविष्यवाण्या आज आपल्यासाठीही महत्त्वाच्या आहेत का?
अध्याय १०
“तुम्ही परत जिवंत व्हाल”
यहेज्केल दृष्टान्तात खडखडीत वाळून गेलेल्या हाडांनी भरलेलं एक खोरं पाहतो. या दृष्टान्ताचा काय अर्थ होतो?
अध्याय ११
‘मी तुला पहारेकरी म्हणून नेमलंय’
पहारेकऱ्याची भूमिका आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्याला कोणत्या गोष्टीबद्दल इशारा द्यायचा आहे?
अध्याय १४
“हाच मंदिराचा कायदा आहे”
यहेज्केलने पाहिलेल्या मंदिराच्या दृष्टान्तातून बंदिवासातल्या यहुद्यांनी कोणते व्यावहारिक धडे घेतले असतील? या दृष्टान्तातून आज आपल्याला शुद्ध उपासनेबद्दल काय शिकायला मिळतं?
CHAPTER १५
“मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन”
यहेज्केल आणि प्रकटीकरण या पुस्तकांमध्ये दिलेल्या वेश्यांच्या वर्णनावरून आपण काय शिकू शकतो?
अध्याय १६
“त्यांच्या कपाळावर खूण कर”
यहेज्केलच्या काळात नाशापासून वाचण्यासाठी विश्वासू लोकांवर ज्या प्रकारे खूण करण्यात आली, ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
अध्याय १८
“माझा क्रोध भयंकर भडकेल”
गोगच्या हल्ल्यामुळे यहोवाचा राग भडकतो. त्यामुळे तो आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलतो.
अध्याय १९
“जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल”
यहेज्केलने मंदिरातून नदी वाहत असल्याचा जो दृष्टान्त पाहिला, तो पूर्ण झाला आहे आणि पुढे मोठ्या प्रमाणावर पूर्ण होणार आहे, असं आपण का म्हणू शकतो?
अध्याय २०
‘वारसा म्हणून देशाच्या जमिनीची वाटणी करा’
एका दृष्टान्तात, देव यहेज्केलला आणि बंदिवानांना वचन दिलेल्या देशाची इस्राएलच्या वंशांमध्ये वाटणी करायला सांगतो.
अध्याय २१
“त्या शहराचं नाव ‘यहोवा तिथे आहे’ असं असेल”
यहेज्केलने शहराबद्दलचा आणि त्याच्या अर्थपूर्ण नावाबद्दलचा जो दृष्टान्त पाहिला, त्यातून आपण कोणते धडे शिकू शकतो?
अध्याय २२
“देवाची उपासना कर”
फक्त यहोवाचीच उपासना करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करण्यासाठी हे प्रकाशन तयार करण्यात आलं आहे.
नवीन समज—सारांश
यहेज्केल पुस्तकातल्या काही भविष्यवाण्यांबद्दल आपली समज का बदलण्यात आली?
चौकट १क
उपासना म्हणजे काय?
उपासना म्हणजे नेमकं काय? यहेज्केलच्या पुस्तकात त्यावर भर कसा दिला आहे? शुद्ध उपासनेत काय सामील आहेत?
चौकट १ख
यहेज्केल पुस्तकाची झलक
या पुस्तकाची विभागणी घटनांच्या क्रमानुसार आणि विषयानुसार केली जाऊ शकते.
चौकट २क
यहेज्केलच्या भविष्यवाण्या समजून घेणं
यहेज्केलच्या पुस्तकात दृष्टान्त, उदाहरणं, गोष्टी आणि नाट्यस्वरूप दिले आहे. यातल्या बऱ्याचशा देवप्रेरित भविष्यवाण्या पुढे घडणाऱ्या घटनांबद्दल होत्या.
चौकट २ख
यहेज्केल—त्याचं जीवन आणि त्याचा काळ
यहेज्केलच्या काळात इतर संदेष्टेही देवाने दिलेलं काम करत होते. त्याच्या काळात अनेक खास घटना घडल्या.
चौकट ३क
बॅबिलोनियापर्यंतचा लांबचा प्रवास
यहुद्यांना कदाचित कोणत्या मार्गाने बाबेलला नेण्यात आलं असावं?
चौकट ४क
“त्या जिवंत प्राण्यांकडे मी पाहत होतो”
प्राचीन अश्शूर आणि बॅबिलोनियामध्ये असलेले भव्य पुतळे हे यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेल्या जिवंत प्राण्यांपासून कसे वेगळे होते?
चौकट ५क
“मनुष्याच्या मुला, तू हे बघतोस ना?”
यहेज्केलला मंदिरात आणि अंगणात चार घृणास्पद गोष्टी दिसतात.
चौकट ६क
“आपल्या डोक्यावरचे केस आणि दाढी कापून टाक”
यरुशलेममध्ये लवकरच काय घडेल हे यहेज्केल यहोवाच्या मदतीने अभिनयाच्या रूपात करून दाखवतो.
चौकट ७ख
यहेज्केलच्या पुस्तकातले काही खास शब्द
भविष्यवाणीच्या या पुस्तकात काही विशिष्ट शब्द वारंवार आले आहेत.
चौकट ८क
मसीहाबद्दलची भविष्यवाणी—देवदाराचं मोठं झाड
यहेज्केलच्या १७ व्या अध्यायात सांगितलेल्या कोड्याचा काय अर्थ होतो?
चौकट ८ख
मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या
भविष्यात येणारा देवाच्या लोकांचा राजा भरवशालायक असेल अशा भविष्यवाण्या यहेज्केल करतो.
चौकट ९क
यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करतो—प्राचीन काळात
यहोवा यहेज्केलद्वारे बंदिवासात असलेल्या यहुद्यांना सुटकेबद्दलची आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलची पाच अभिवचनं देतो.
चौकट ९ख
१९१९ हेच वर्ष का?
देवाच्या लोकांची मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून १९१९ मध्येच सुटका झाली असं का म्हणता येईल?
चौकट ९घ
बंदिवासाबद्दलच्या आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलच्या भविष्यवाण्या
यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासात जातील आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल याबद्दलच्या भविष्यवाण्या पुढे ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्या.
चौकट ९च
‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ तो काळ
प्रेषित पेत्रने देवाच्या प्रेरणेने एका काळाबद्दल भविष्यवाणी केली, ज्याची सुरुवात येशू राजा बनला तेव्हापासून झाली आणि त्याच्या हजार वर्षांच्या शासनकाळाच्या शेवटपर्यंत तो चालणार होता.
चौकट १०क
शुद्ध उपासना—हळूहळू पुन्हा सुरू होते
आधीच्या काळातल्या कोणत्या घटनांमुळे आजच्या काळातल्या प्रचारकार्याची सुरुवात झाली?
चौकट १०ख
‘वाळून गेलेली हाडं’ आणि ‘दोन साक्षीदार’—यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?
या दोन भविष्यवाण्या आधुनिक काळात कशा पूर्ण झाल्या?
चौकट १०ग
’आपल्या पायांवर उभं राहायला’ यहोवा आपल्याला बळ देईल
कधीकधी आपण आपल्या जीवनातल्या चिंतांच्या आणि समस्यांच्या ओझ्याखाली इतके दबून जातो, की आपल्याला वाटतं ‘आता बस्स! मी आणखी सहन करू शकत नाही.’ पण अशा वेळी ‘सुकून गेलेल्या हाडांबद्दलच्या’ दृष्टान्तावर मनन केल्याने आपल्याला खूप बळ मिळू शकतं.
चौकट ११क
काही उल्लेखनीय पहारेकरी
या पहारेकऱ्यांनी विरोधाचा सामना केला, तरी ते विश्वासू राहिले. त्यांनी लोकांना सावध तर केलंच पण आनंदाचा संदेशही दिला.
चौकट १३क
दोन वेगळी मंदिरं आणि त्यांपासून मिळणारे धडे
यहेज्केलने पाहिलेलं मंदिर हे पौलने वर्णन केलेल्या मंदिरापासून वेगळं कसं आहे?
चौकट १४क
यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिरातून शिकण्यासारखे धडे
यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या मंदिरातून उपासनेच्या बाबतीत तुम्ही जे शिकलात त्यांतल्या कोणत्या गोष्टी तुम्ही लागू कराल?
चौकट १५क
वेश्या बनलेल्या दोन बहिणी
यहोवाने अहला आणि अहलीबा यांचं जे वर्णन केलं त्यावरून त्याला त्याच्या नावाचा चुकीचा वापर करणाऱ्यांबद्दल आणि शुद्ध उपासनेच्या विरोधात वागणाऱ्यांबद्द्ल कसं वाटतं, हे दिसून येतं.
चौकट १६ख
रडणं व शोक करणं, खूण करणं, चुराडा करणं—केव्हा आणि कसं होईल?
यहेज्केलच्या ९ व्या अध्यायातल्या दृष्टान्ताची समज मिळाल्यामुळे आपल्याला या जगाच्या व्यवस्थेचा अंताचा आत्मविश्वासाने सामना करता येईल.
चौकट १८क
येणाऱ्या मोठ्या युद्धाबद्दल यहोवा इशारा देतो
बायबलमध्ये एका शेवटच्या युद्धाबद्दल सांगितलं आहे. त्यात देवाचा विरोध करणाऱ्या सर्वांचा तो नाश करेल.
चौकट १९क
यहोवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांच्या नद्या
यहोवाच्या आशीर्वादांबद्दल सांगण्यासाठी बायबलच्या अनेक लेखकांनी सारखंच उदाहरण दिलं आहे.
चौकट १९ख
छोट्याशा प्रवाहाची पुढे खळखळणारी नदी बनते!
देवाच्या मंदिरातून निघणाऱ्या छोट्या प्रवाहाचा काय अर्थ होतो?
चौकट २०क
देशाच्या जमिनीची वाटणी
यहेज्केलला जमिनीच्या वाटणीचा जो दृष्टान्त दाखवण्यात आला, त्यामुळे बाबेलच्या बंदिवासातून परत येणाऱ्या लोकांना तर प्रोत्साहन तर मिळालंच, पण आजच्या काळातल्या देवाच्या लोकांनाही त्यामुळे प्रोत्साहन मिळतं.
चौकट २१क
“जमिनीतून काही भाग दान म्हणून वेगळा काढा”
देवाने वेगळ्या काढलेल्या जमिनीच्या या पट्ट्याचे पाच भाग कोणते आहेत? आणि ते कशासाठी आहेत?