अभ्यास १२
प्रेम व सहानुभूती
१ थेस्सलनीकाकर २:७, ८
सारांश: प्रामाणिकपणे बोला. तुम्हाला श्रोत्यांची काळजी आहे हे तुमच्या बोलण्यातून त्यांना दिसू द्या.
हे कसं कराल:
-
श्रोत्यांचा विचार करा. श्रोत्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे लक्षात ठेवून आपला भाग तयार करा. त्यांना कसं वाटत असेल याची कल्पना करा.
-
योग्य शब्दांची निवड करा. श्रोत्यांना तजेला, सांत्वन देण्याचा आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करा. असे शब्द टाळा ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. तसंच ज्यांचा यहोवावर विश्वास नाही किंवा जे लोक मनापासून त्यांच्या धर्माचं पालन करतात अशा लोकांबद्दल अनादराने बोलू नका.
-
त्यांच्यात आवड असल्याचं दाखवा. प्रेमळ आवाजात व योग्य हावभावांवरून लोकांना दाखवून द्या, की तुम्हाला त्यांची काळजी आहे. तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे आहेत याबद्दलही विचार करा. स्मितहास्य करा.