व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची इच्छा आचरण्यात एकता

देवाची इच्छा आचरण्यात एकता

देवाची इच्छा आचरण्यात एकता

यामाहितीपत्रकात यहोवाच्या साक्षीदारांच्या सेवा, सभा व संघटनेविषयी दिलेल्या माहितीमुळे देवाची उपासना करण्यासाठी त्यांच्या निकट सहवासात राहण्याचा तुम्हा वाचकांना उत्तेजन मिळेल अशी आम्ही आशा करतो. साक्षीदारांविषयी स्वतः माहिती करून घेण्याकरता वैयक्‍तिकरित्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीचा सहवास राखण्यास व त्यांच्या संमेलनांना उपस्थित राहण्यास आम्ही आपणास निमंत्रण देतो. त्यामुळे सध्याच्या काळातील देवाच्या इच्छेविषयीची तुम्हाला समज होण्यास मदत होईल.—तीतास २:११-१४.

पवित्र शास्त्रातील सत्कर्मांच्या पातळीवर तुम्ही आपले जीवन आणू लागलात म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यात सहभागी होण्याचा विशेष हक्कही तुम्हाला लाभेल. बंधूच्या जागतिक संस्थेच्या सहवासाचा आनंद लुटण्याव्यतिरिक्‍त, या व्यवस्थेच्या अंतामधून बचावून जेथे शांती व धार्मिकता वसेल अशा नव्या व्यवस्थेत प्रवेश करण्याची प्रतीक्षा तुम्ही धरू शकाल.—२ पेत्र ३:१३.

[३०, ३१ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार जेथे देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत अशा २०० पेक्षा अधिक देश व बेटांपैकी १८ देशातील दृश्‍ये

नायजेरिया

ऑस्ट्रिया

ब्राझिल

जपान

कॅनडा

ग्वातेमाला

अर्जेंटिना

जर्मनी

ताईवान

फिनलंड

दक्षिण आफ्रिका

भारत

अमेरिका

फिजी

चिली

इटली

बोलेविया

फिलिपाइन्स