पाठ १९
विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे?
येशूने आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी आपल्या चार शिष्यांसोबत—पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांच्यासोबत एकांतात संभाषण केले. शेवटल्या दिवसांत होणाऱ्या आपल्या उपस्थितीचे चिन्ह भाकीत करत असताना त्याने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला: “ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा कोण?” (मत्तय २४:३, ४५; मार्क १३:३, ४) येशू त्याच्या शिष्यांना या गोष्टीची हमी देत होता की त्यांचा धनी या नात्याने तो एका दासाची नेमणूक करेल जो शेवटल्या दिवसांत त्याच्या अनुयायांना निरंतर आध्यात्मिक अन्न पुरवत राहील. हा दास कोण असणार होता?
तो येशूच्या अभिषिक्त अनुयायांनी बनलेला एक छोटा गट आहे. हा “दास” म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ. तो यहोवाच्या उपासकांना समयोचित आध्यात्मिक अन्न पुरवतो. “योग्य वेळी शिधासामुग्री” मिळवण्यासाठी आपण या विश्वासू दासावर विसंबून राहतो.—लूक १२:४२.
तो देवाच्या घराचा कारभार पाहतो. (१ तीमथ्य ३:१५) येशूने या दासाला, यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाचा कारभार सांभाळण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीत, संघटनेच्या मालमत्तेचा सांभाळ करणे, प्रचाराचे कार्य मार्गदर्शित करणे आणि मंडळ्यांद्वारे आपल्याला शिक्षण देणे या गोष्टी समाविष्ट आहेत. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ते पुरवण्यासाठी “विश्वासू व बुद्धिमान” दास क्षेत्रात उपयोग केल्या जाणाऱ्या प्रकाशनांद्वारे, तसेच सभांद्वारे व संमेलनांद्वारे आपल्याला आध्यात्मिक अन्न पुरवत आहे.
हा दास बायबलमधील सत्याला जडून राहतो आणि सुवार्ता सांगण्याचे कार्य आवेशाने करतो, त्याअर्थी तो विश्वासू आहे. तसेच पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या संपत्तीची हा दास बुद्धिमानीने देखरेख करतो. (प्रेषितांची कृत्ये १०:४२) आज यहोवा नवीन लोकांना सत्याकडे आकर्षित करत आहे आणि आध्यात्मिक अन्न पुरवण्यास दासाला मदत करत आहे. असे करण्याद्वारे यहोवा देव दासाचे कार्य आशीर्वादित करतो.—यशया ६०:२२; ६५:१३.
-
येशूने त्याच्या अनुयायांना आध्यात्मिक अन्न पुरवण्यास कोणाला नेमले होते?
-
कोणत्या अर्थाने हा दास विश्वासू आणि बुद्धिमान आहे?