व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २४

आमच्या जगव्याप्त कार्याचा खर्च कसा भागवला जातो?

आमच्या जगव्याप्त कार्याचा खर्च कसा भागवला जातो?

नेपाळ

टोगो

ब्रिटन

आमची संघटना दर वर्षी बायबलच्या व बायबलवर आधारित इतर प्रकाशनांच्या लाखो प्रतींचे प्रकाशन करते व त्यांचे विनामूल्य वितरण करते. तसेच, आम्ही राज्य सभागृहांचे व शाखा कार्यालयांचे बांधकाम करतो व ते सुस्थितीत ठेवतो. याशिवाय, आम्ही हजारो बेथेल सदस्यांचा व मिशनऱ्यांचा खर्च भागवतो आणि विपत्तीच्या काळात मदतकार्य पुरवतो. तेव्हा तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न येईल की, ‘हा एवढा सगळा खर्च कसा भागवला जातो?’

आम्ही दशांश घेत नाही किंवा वर्गण्या गोळा करत नाही. आमच्या राज्य प्रचार कार्याचा खर्च अमाप असला, तरी आम्ही केव्हाही कोणाकडे पैशांची मागणी करत नाही. सुमारे एक शतकापूर्वी इंग्रजीतील टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या दुसऱ्या अंकात असे म्हटले होते, की यहोवा आमच्या कामाला पाठिंबा देईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आमच्यावर “कधीच इतरांपुढे हात पसरण्याची किंवा लोकांकडे मदत मागण्याची वेळ येणार नाही!” आणि हे शब्द तंतोतंत खरे ठरले आहेत.—मत्तय १०:८.

आमचे कार्य ऐच्छिक दानांवर चालते. अनेक लोक आम्ही करत असलेल्या बायबल-आधारित शैक्षणिक कार्याची कदर करतात व यासाठी अनुदान देतात. यहोवाचे साक्षीदार सबंध पृथ्वीवर देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी स्वखुषीने आपला वेळ, श्रम, पैसा आणि इतर साधने देतात. (१ इतिहास २९:९) आमच्या राज्य सभागृहांमध्ये, संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये ठेवलेल्या दानपेट्यांत कोणीही स्वेच्छेने दान टाकू शकतो. आम्हाला मिळणारे बरेचसे दान हे अशा लोकांकडून येते जे फारसे श्रीमंत नाहीत. हे लोक येशूने विशेष उल्लेख केलेल्या त्या गरीब विधवेसारखे आहेत जिने मंदिराच्या भांडारात दोन टोल्या टाकल्या होत्या. (लूक २१:१-४) तर मग, प्रत्येक जण “आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणे” दान करण्यासाठी नियमितपणे काही रक्कम “जमा करून” ठेवू शकतो.—१ करिंथकर १६:२; २ करिंथकर ९:७.

जे लोक “आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान” करून राज्याशी संबंधित कार्याला हातभार लावू इच्छितात अशांच्या मनाला यहोवा प्रेरणा देत राहील अशी खातरी आम्ही बाळगतो.—नीतिसूत्रे ३:९.

  • आमची संघटना इतर धार्मिक संघटनांपेक्षा वेगळी कशी आहे?

  • ऐच्छिक दानांचा उपयोग कशासाठी केला जातो?