भाग ३
इजिप्तमधून सुटका ते इस्राएलच्या पहिल्या राजापर्यंत
मोशेनं इस्राएलांना इजिप्तमधल्या गुलामगिरीतून सोडवून सीनाय पर्वताकडे नेलं. तिथे देवानं त्यांना त्याचे नियम दिले. त्यानंतर मोशेनं, कनान देश हेरण्यासाठी १२ माणसं पाठवली. पण परतल्यावर, त्यातल्या १० जणांनी वाईट बातमी दिली. त्यांच्यामुळे, इजिप्तला परत जावं, असं लोकांना वाटलं. त्यांच्यातल्या विश्वासाच्या अभावामुळे, ४० वर्षं अरण्यात भटकायला लावून देवानं इस्राएलांना शिक्षा केली.
शेवटी, इस्राएलांना कनान देशात नेण्यात पुढाकार घेण्यासाठी यहोशवाला निवडलं गेलं. तो देश ताब्यात घ्यायला त्यांना मदत व्हावी, म्हणून यहोवानं चमत्कार केले. त्यानं जॉर्डन नदी वाहण्याची थांबवली, यरीहोचा तट पाडला आणि एक संपूर्ण दिवस सूर्याला थांबवून ठेवलं. सहा वर्षांनी कनानी लोकांपासून देश काबीज केला गेला.
यहोशवापासून सुरवात करुन, ३५६ वर्षं इस्राएलांवर शास्त्यांचा अंमल होता. त्यांच्यातल्या बाराक, गिदोन, इफ्ताह, शमशोन आणि शमुवेल यांच्यासह अनेकांबद्दल आपण शिकतो. तसंच राहाब, दबोरा, याएल, रूथ, नामी आणि दलीलासारख्या स्त्रियांबद्दलही वाचतो. तिसऱ्या भागात एकूण ३९६ वर्षांचा इतिहास आहे.
या विभागात
कथा ३६
सोन्याचं वासरू
कानातली सोन्याची कुंडलं वितळवून बनवलेल्या पुतळ्याची लोकांना उपासना का करायची आहे?
कथा ३८
बारा हेर
दहा हेर एक सांगत होते तर बाकीचे दोन हेर वेगळं काहीतरी! मग इस्राएली लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा होता?
कथा ३९
अहरोनाची काठी फुलांनी बहरते
एका रात्रीत निर्जीव लाकडाच्या काठीला फुलं आणि पिकलेली फळं कशी काय येऊ शकतात बरं?
कथा ४८
शहाणे गिबोनकर
ते यहोशवा आणि इस्राएली लोकांना फसवून वचन द्यायला लावतात, पण इस्राएली लोक दिलेलं वचन पाळतात का?
कथा ४९
सूर्य स्थिर होतो
देव यहोशवासाठी असं काहीतरी करतो जे त्याने आधी कधीच केलं नव्हतं आणि पुढेही कधी केलं नाही.
कथा ५२
गिदोन आणि त्याची ३०० माणसं
पाणी पिण्याच्या बाबतीत एक वेगळ्याच प्रकारची परीक्षा घेऊन देव या छोट्या सैन्यासाठी लढाऊ माणसं निवडतो.
कथा ५३
इफ्ताहाचा नवस
त्याने यहोवाला केलेल्या नवसाचा त्याच्यावरच नाही तर त्याच्या मुलीवरही परिणाम झाला.
कथा ५५
लहान मुलगा यहोवाची सेवा करतो
महायाजक एलीला एक वाईट बातमी सांगण्यासाठी यहोवा लहान शमुवेलचा वापर करतो