अध्याय एकोणीस
यहोवाच्या जवळ राहा
१, २. आज आपल्याला सुरक्षा कुठे मिळू शकते?
कल्पना करा, तुम्ही घराबाहेर आहात आणि आकाश काळंकुट्ट झालं आहे, अचानक विजा चमकू लागतात, ढग गडगडू लागतात, वादळ आणि जोराचा पाऊस सुरू होतो. तुम्ही पावसापासून वाचण्यासाठी जागा शोधता, शेवटी जेव्हा एक सुरक्षित जागा सापडते तेव्हा तुम्हाला किती हायसं वाटतं!
२ आपणदेखील आज काहीशा अशाच परिस्थितीत जगत आहोत. जगातली परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. अशा वेळी, तुमच्या मनात प्रश्न येईल ‘मला सुरक्षा कुठे मिळेल?’ बायबलमध्ये स्तोत्रकर्त्याने असं लिहिलं: “परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.” (स्तोत्र ९१:२) खरंच, आज यहोवा आपल्या समस्यांमध्ये आपल्याला साहाय्य करतो आणि भविष्यासाठीसुद्धा त्याने आपल्याला एक सुंदर आशा दिली आहे.
३. आपण यहोवाला आपला आश्रय कसा बनवू शकतो?
३ यहोवा आपल्याला कशा प्रकारे सुरक्षा देतो? कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी तो आपली मदत करू शकतो. शिवाय, जे आपलं नुकसान करू पाहतात त्यांच्यापेक्षा तो कित्येक पटीने शक्तिशाली आहे. आज जरी आपल्यासोबत काही वाईट घडलं, तरी यहोवा भविष्यात ते नुकसान नक्की भरून काढेल. बायबलमध्ये आपल्याला असं प्रोत्साहन देण्यात आलं आहे: “देवाच्या प्रेमात टिकून राहा.” (यहूदा २१) त्यामुळे या कठीण काळात यहोवाची मदत मिळावी म्हणून आपण नेहमी त्याच्या जवळ राहण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो?
देवाच्या प्रेमाला प्रतिसाद द्या
४, ५. यहोवाने आपल्यावरचं प्रेम कशा प्रकारे व्यक्त केलं आहे?
४ यहोवाच्या जवळ राहण्यासाठी, तो आपल्यावर किती प्रेम करतो योहान ३:१६) या बलिदानामुळेच आपल्याला भविष्यासाठी एक सुंदर आशा मिळाली आहे.
याची जाणीव असणं गरजेचं आहे. त्याने आपल्यासाठी कायकाय केलं आहे त्याबद्दल विचार करा. त्याने ही सुंदर पृथ्वी, निरनिराळी झाडं आणि पशू-पक्षी आपल्यासाठी निर्माण केले आहेत. त्याने आपल्याला खाण्यासाठी रुचकर अन्न आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी दिलं आहे. त्याचं नाव आणि उत्तम गुण आपल्याला माहीत व्हावेत म्हणून त्याने आपल्याला बायबल दिलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे त्याने आपला प्रिय पुत्र, येशू याला आपल्यासाठी त्याचं जीवन अर्पण करण्याकरता या पृथ्वीवर पाठवलं. (५ यहोवाने आपल्यासाठी मसीहाचं राज्य स्थापन केलं आहे. हे एक स्वर्गीय सरकार आहे जे लवकरच सर्व दुःखांचा अंत करेल. हे राज्य या पृथ्वीला नंदनवन बनवेल जिथे सर्व आनंदाने आणि शांतीने राहतील. (स्तोत्र ३७:२९) आजही आपण सुखी जीवन कसं जगू शकतो हे आपल्याला शिकवून यहोवाने आपल्यावर प्रेम असल्याचं दाखवलं आहे. आपण यहोवाला प्रार्थना करावी असं तो आपल्याला प्रोत्साहन देतो आणि आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. यहोवाने आपल्या प्रत्येकावर असलेलं त्याचं प्रेम स्पष्टपणे व्यक्त केलं आहे.
६. आपण यहोवाच्या प्रेमाला कसा प्रतिसाद देऊ शकतो?
६ आपण यहोवाच्या प्रेमाला प्रतिसाद कसा देऊ शकतो? त्याने आपल्यासाठी जे काही केलं त्यासाठी त्याचे उपकार मानून आपण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देऊ शकतो. दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेक लोकांना उपकारांची जाणीव नसते. येशू जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हादेखील अशीच परिस्थिती होती. एकदा जेव्हा येशूने कोड झालेल्या दहा लोकांना बरं केलं तेव्हा त्यातल्या फक्त एकानेच त्याचे आभार मानले. (लूक १७:१२-१७) आपणही त्या माणसासारखं असायला हवं ज्याने येशूचे आभार मानले. आपण नेहमी यहोवाचे आभार मानले पाहिजेत.
७. आपण यहोवावर कशा प्रकारे प्रेम केलं पाहिजे?
७ आपणदेखील यहोवावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. येशूने मत्तय २२:३७ वाचा.) याचा काय अर्थ होतो?
आपल्या शिष्यांना सांगितलं की त्यांनी यहोवावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रेम केलं पाहिजे. (८, ९. आपलं यहोवावर प्रेम आहे हे आपण त्याला कसं दाखवू शकतो?
८ ‘मी यहोवावर प्रेम करतो’ असं म्हणणं पुरेसं आहे का? मुळीच नाही. जर आपण पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने यहोवावर प्रेम करत असू, तर ते प्रेम आपल्या कार्यातून दिसायला हवं. (मत्तय ७:१६-२०) बायबलमध्ये अशी स्पष्ट शिकवण आहे की जर आपलं देवावर प्रेम असेल तर आपण त्याच्या आज्ञा पाळू. पण असं करणं कठीण आहे का? नाही, कारण यहोवाच्या “आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३ वाचा.
९ आपण यहोवाच्या आज्ञा पाळल्या तर आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो. (यशया ४८:१७, १८) पण आपल्याला यहोवाच्या जवळ राहायला कोणत्या गोष्टी मदत करतील? चला आपण पुढे पाहू.
यहोवाच्या आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करा
१०. तुम्ही नेहमी यहोवाबद्दल शिकत का राहिलं पाहिजे?
१० यहोवासोबत तुमची मैत्री कशी झाली? बायबलच्या अभ्यासामुळे तुम्ही यहोवाला जवळून जाणू शकलात आणि त्याच्यासोबत मैत्री करू शकलात. ही मैत्री जणू थंडीत पेटवलेल्या शेकोटीच्या आगीसारखी आहे जी तुम्हाला सतत जळत ठेवावी लागते. पण जसं आग जळत राहण्यासाठी त्यात सतत लाकडं टाकण्याची गरज असते, तसंच यहोवासोबत तुमची मैत्री घनिष्ठ होण्यासाठी तुम्ही नेहमी त्याच्याबद्दल शिकत राहण्याची गरज आहे.—नीतिसूत्रे २:१-५.
११. बायबलमधल्या शिकवणींचा तुमच्यावर काय प्रभाव होईल?
११ जेव्हा तुम्ही नियमितपणे बायबलचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी शिकायला मिळतील ज्या तुमच्या हृदयाला स्पर्श करतील. येशू जेव्हा आपल्या दोन शिष्यांना बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अर्थ समजावून सांगत होता तेव्हा त्यांना कसं वाटलं? ते म्हणाले: “रस्त्याने चालताना जेव्हा तो आपल्याशी बोलत होता आणि शास्त्रवचनांचा पूर्ण उलगडा लूक २४:३२.
करून सांगत होता, तेव्हा आपलं हृदय आनंदाने उचंबळत नव्हतं का?”—१२, १३. (क) देवावरच्या आपल्या प्रेमाबद्दल आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? (ख) देवावरचं आपलं प्रेम आपण कसं टिकवून ठेवू शकतो?
१२ शास्त्रवचनांचा अर्थ समजल्यामुळे जसा त्या शिष्यांना आनंद झाला तसाच आनंद तुम्हाला बायबलमधली तत्त्वं समजल्यावर झाला असेल. यामुळे तुम्ही यहोवाला ओळखू लागला आणि त्याच्यावर प्रेम करू लागला. तेव्हा, त्याच्यावरचं हे प्रेम कधीही कमी होणार नाही याची काळजी घ्या.—मत्तय २४:१२.
१३ देवासोबत मैत्री झाल्यावर ती मैत्री टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. यासाठी तुम्ही सतत त्याच्याबद्दल आणि येशूबद्दल शिकत राहिलं पाहिजे. तसंच, तुम्ही जे शिकाल त्यावर मनन करून ते आपल्या जीवनात कसं लागू करता येईल यावर विचार केला पाहिजे. (योहान १७:३) जेव्हा तुम्ही बायबल वाचता आणि त्याचा अभ्यास करता तेव्हा स्वतःला विचारा: ‘यातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं? मी यहोवावर पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण मनाने का प्रेम केलं पाहिजे?’—१ तीमथ्य ४:१५.
१४. आपलं यहोवावरचं प्रेम टिकवून ठेवायला प्रार्थनेमुळे कशी मदत होते?
१४ तुम्ही आपल्या जवळच्या मित्रासोबत नेहमी बोलता, आणि त्यामुळे तुमची मैत्री आणखी मजबूत होते. त्याच प्रकारे, जेव्हा आपण प्रार्थनेत सतत यहोवाशी बोलतो, तेव्हा त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढत जातं. (१ थेस्सलनीकाकर ५:१७ वाचा.) प्रार्थना ही आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला दिलेली प्रेमळ देणगी आहे. आपण नेहमी त्याच्याबरोबर मनापासून बोललं पाहिजे. (स्तोत्र ६२:८) तोंडपाठ केलेल्या प्रार्थना न म्हणता आपल्या मनात जे आहे ते आपण त्याच्याशी प्रार्थनेत बोललं पाहिजे. आपण जर नेहमी बायबलचा अभ्यास केला आणि मनापासून प्रार्थना करत राहिलो, तर आपलं यहोवावरचं प्रेम कायम टिकून राहील.
यहोवाबद्दल इतरांना सांगा
१५, १६. तुमच्यासाठी प्रचारकार्य किती महत्त्वाचं आहे?
१५ यहोवाच्या जवळ राहण्यासाठी इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि हा आपल्यासाठी एक खास सन्मान आहे. (लूक १:७४, ७५) येशूने सर्व खऱ्या ख्रिश्चनांना दिलेली ही एक जबाबदारी आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने देवाच्या राज्याविषयी असलेल्या आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला पाहिजे. तुम्ही याची सुरुवात केली आहे का?—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
१६ प्रेषित पौलसाठी प्रचारकार्य खूप महत्त्वाचं होतं, त्याने प्रचारकार्याला आपली “संपत्ती” म्हटलं. (२ करिंथकर ४:७) यहोवा आणि त्याच्या संकल्पाबद्दल इतरांना सांगणं यापेक्षा महत्त्वाचं कोणतंच काम असू शकत नाही. हा यहोवाची सेवा करण्याचा एक मार्ग आहे आणि तुमच्या या सेवेची तो कदर करतो. (इब्री लोकांना ६:१०) प्रचार केल्याने, तुम्हाला आणि तुमचा संदेश ऐकणाऱ्यांनाही फायदा होतो. कारण, जेव्हा तुम्ही इतरांना यहोवाच्या जवळ येण्यास व सर्वकाळाचं जीवन मिळवण्यास मदत करता तेव्हा तुम्हीदेखील त्याच्या जवळ येता व सर्वकाळाचं जीवनही मिळवू शकता. (१ करिंथकर वाचा.) यापेक्षा जास्त समाधान देणारं आणखी कोणतं कार्य असू शकतं? १५:५८
१७. प्रचारकार्य करणं आज इतकं महत्त्वाचं का आहे?
१७ प्रचारकार्य करणं आज खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण “काळाची गरज ओळखून” हे काम केलं पाहिजे. (२ तीमथ्य ४:२) लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगणं आज खूप गरजेचं आहे. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” अंत येण्यास “विलंब” लागणार नाही. (सफन्या १:१४; हबक्कूक २:३) हो, लवकरच यहोवा सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करणार आहे. हा नाश येण्याआधी, लोकांना त्याबद्दल सावध करणं गरजेचं आहे म्हणजे तेदेखील यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेऊ शकतील.
१८. आपण इतर खऱ्या ख्रिश्चनांसोबत मिळून यहोवाची उपासना का केली पाहिजे?
१८ यहोवाची इच्छा आहे की आपण इतर खऱ्या ख्रिश्चनांसोबत मिळून त्याची उपासना करावी. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या, आणि जशी काहींची रीत आहे, त्याप्रमाणे आपण आपले एकत्र येणे सोडू नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावे आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त करावे.” (इब्री लोकांना १०:२४, २५) आपण सर्व सभांना उपस्थित राहण्याचा पूरेपूर प्रयत्न केला पाहिजे. ख्रिस्ती सभा आपल्याला, एकमेकांना प्रोत्साहन देण्याची आणि एकमेकांचा विश्वास मजबूत करण्याची संधी देतात.
१९. आपल्या ख्रिस्ती बांधवांवर प्रेम करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
१९ तुम्ही जेव्हा सभांना उपस्थित राहाल, तेव्हा तुम्हाला असे मित्र मिळतील जे यहोवाची उपासना करण्यात तुमची मदत करतील. हे बांधव वेगवेगळ्या संस्कृतीचे व भाषेचे असले किंवा त्यांची जीवनातली परिस्थिती वेगवेगळी असली तरी तेदेखील यहोवाची सेवा करण्याचा तुमच्यासारखाच पूर्ण प्रयत्न करत आहेत. तेही तुमच्यासारखेच अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्याकडूनही चुका होतील. तेव्हा त्यांना क्षमा करा. (कलस्सैकर ३:१३ वाचा.) आपल्या ख्रिस्ती बहीण-भावांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याचा नेहमी प्रयत्न करा, कारण असं केल्यानेच तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकाल आणि यहोवाच्या आणखी जवळ येऊ शकाल.
हेच खरं जीवन आहे
२०, २१. “खरे जीवन” काय आहे?
२० आपल्यासोबत जवळचं नातं जोडणाऱ्या सर्वांना, सगळ्यात चांगलं जीवन मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. बायबलमध्ये आपल्याला शिकायला मिळतं की आपलं भविष्यातलं जीवन आपल्या आजच्या जीवनापेक्षा फार वेगळं असणार आहे.
२१ भविष्यात आपण फक्त ७० किंवा ८० वर्षांसाठी नाही, तर नेहमीसाठी जगू. या “सर्वकाळाच्या” जीवनात आपण एका सुंदर नंदनवनात राहू आणि आपल्याला परिपूर्ण आरोग्य, शांती आणि आनंद मिळेल. यालाच बायबलमध्ये “खरे जीवन” म्हटलं आहे. यहोवा आपल्याला खरं जीवन देण्याचं वचन देतो. पण आज आपण त्या जीवनाला “घट्ट धरून” ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.—१ तीमथ्य ६:१२, १९.
२२. (क) “खरे जीवन घट्ट धरून” ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? (ख) आपण स्वतःच्या बळावर खरं जीवन का मिळवू शकत नाही?
२२ “खरे जीवन घट्ट धरून” ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण “भले करत” राहिले पाहिजे आणि “चांगली कामे करण्याच्या बाबतीत श्रीमंत” असले पाहिजे. (१ तीमथ्य ६:१८) याचा अर्थ आपण जे बायबलमधून शिकतो ते आपल्या जीवनात लागू केलं पाहिजे. पण आपण कधीही स्वतःच्या बळावर खरं जीवन मिळवू शकत नाही. यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना “अपार कृपा” दाखवून हे जीवन देणगी म्हणून देतो. (रोमकर ५:१५) आपल्या स्वर्गीय पित्याला, त्याच्या विश्वासू सेवकांना हे जीवन देण्याची खरोखर इच्छा आहे.
२३. तुम्ही आजच योग्य निर्णय घेणं का गरजेचं आहे?
२३ आपण स्वतःला विचारू शकतो, ‘देवाला मान्य असलेल्या मार्गाने मी त्याची उपासना करत आहे का?’ तुम्ही काही बदल केले पाहिजे असं तुमच्या लक्षात आलं, तर ते लगेच करा. जेव्हा आपण यहोवावर अवलंबून राहतो आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करतो तेव्हा यहोवा आपला आश्रय
होतो. सैतानाच्या दुष्ट जगाच्या शेवटच्या दिवसांत, तो आपल्या विश्वासू लोकांना सुरक्षित ठेवेल. मग त्याने वचन दिल्याप्रमाणे तो आपल्याला नंदनवनात सार्वकालिक जीवन देईल. हो, तुम्ही आजच योग्य निर्णय घेतले तर तुम्हाला खरं जीवन नक्की मिळेल!