कुविख्यात कलावंतीणीचा न्याय करणे
अध्याय ३३
कुविख्यात कलावंतीणीचा न्याय करणे
दृष्टांत ११—प्रकटीकरण १७:१–१८
विषय: मोठी बाबेल एका किरमिजी रंगाच्या श्वापदावर आरूढ आहे; हे श्वापद तिला उलटून टाकते व तिला उद्ध्वस्त करते
पूर्णतेचा काळ: १९१९ पासून ते मोठ्या संकटापर्यंत
१. सात देवदूतांपैकी एकजण योहानाला काय प्रकटवितो?
यहोवाचा नीतीमान क्रोध संपूर्णपणे—सगळ्या सात वाट्यामधील—ओतला गेला पाहिजे! सातव्या दूताने प्राचीन बाबेल वसले होते तेथे आपली वाटी ओतली तेव्हा ते मोठ्या बाबेलीवर पीडा ओतण्याचे लाक्षणिक चिन्ह होते; कारण सर्व घटना हर्मगिदोन या शेवटल्या लढाईकडे वेगाने धाव घेत आहेत. (प्रकटीकरण १६:१, १२, १६) आता बहुधा तोच देवदूत, यहोवा आपले नीतीमान न्याय का व कसे प्रगट करतो हे योहानाला सांगतो. योहान पुढे जे बघतो त्यामुळे तो आश्चर्याने भारावून जातो: “नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणालाः ‘इकडे ये, म्हणजे अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरुपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले.’”—प्रकटीकरण १७:१, २.
२. हे कसे कळते की, ‘मोठी कलावंतीण’ ही (अ) प्राचीन रोम नाही? (ब) मोठी व्यापारी व्यवस्था नाही? (क) धर्मव्यवस्था आहे?
२ ‘मोठी कलावंतीण’! ही एवढी धक्कादायक संज्ञा का? ती कोण आहे? काही जणांनी ही लाक्षणिक वेश्या प्राचीन रोम आहे असे म्हटले. पण रोम तर एक राजकीय साम्राज्य होते. ही वेश्या जगातील राजांबरोबर जारकर्म करते व यात ओघाओघाने रोमचे साम्राज्य देखील आलेच. तसेच, तिच्या नाशानंतर “पृथ्वीवरील राज्यांनी” तिच्याबद्दल दुःख करीत असल्याचे दाखवले आहे. या कारणामुळे, ती राजकीय साम्राज्य होऊ शकत नाही. (प्रकटीकरण १८:९, १०) याचप्रमाणे तिजबद्दल जगाच्या व्यापाऱ्यांना दुःख वाटत असल्यामुळे ती मोठ्या व्यापारी व्यवस्थेला देखील सूचित होऊ शकत नाही. (प्रकटीकरण १८:१५, १६) तथापि, आम्हाला असे वाचायला मिळते की, “सर्व राष्ट्रे [तिच्या] चेटकाने ठकविली गेली.” (प्रकटीकरण १८:२३) याद्वारे हे स्पष्ट होते की ती मोठी कलावंतीण जगव्याप्त धर्मव्यवस्था असली पाहिजे.
३. (अ) मोठी कलावंतीण ही केवळ रोमन कॅथलिक चर्च किंवा सर्व ख्रिस्ती धर्मजगत नसून त्यापेक्षा अधिक का असली पाहिजे? (ब) पूर्वदेशीय धर्म तसेच ख्रिस्ती धर्मजगताच्या विविध पंथांमध्ये कोणती बाबेलोनी तत्त्वे दिसून येतात? (क) ख्रिस्ती धर्मजगताच्या बहुतेक तत्त्वप्रणाली, समारंभ व प्रथा याबद्दल रोमन कॅथलिक कार्डिनल जॉन हेन्री न्यूमन यांनी काय कबूल केले? (तळटीप पहा.)
३ पण कोणती धर्मव्यवस्था? काहींनी प्रतिपादिले तसे ती रोमन कॅथलिक चर्च आहे का? किंवा ती संपूर्ण ख्रिस्ती धर्मजगत आहे का? नाही, तिने जर सर्व राष्ट्रांना ठकवायचे आहे तर ती यापेक्षा मोठी असली पाहिजे. खरे पाहता, ती खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य आहे. बाबेलच्या गूढ गोष्टींशी असलेला तिचा मुळारंभ हा तिची बहुतेक बाबेलोनी तत्त्वे व प्रथा या सर्व जगभरातील धर्मात सर्वसाधारणपणे आढळून येतात त्याद्वारे दिसतो. उदाहरणार्थ, मानवी जीवाचे अमरत्व, नरकाग्नीच्या यातना आणि देवांचे त्रैक्य या गोष्टी पूर्वेकडील धर्म तसेच ख्रिस्ती धर्मजगतातील पंथात आढळतात. साधारण ४,००० वर्षांपेक्षा अधिक काळाआधी प्राचीन बाबेल शहरात खोट्या धर्माने जे वर्चस्व पसरवले, त्याचे रुपांतर मोठी बाबेल असे योग्यपणे म्हणता येते त्या प्रचंड आधुनिक राक्षसात झाले. * तरीपण तिचे, ‘मोठी कलावंतीण’ या तिरस्करणीय भाषेत का वर्णन दिले आहे?
४. (अ) प्राचीन इस्राएलाने कोणत्या मार्गांनी जारकर्म आचरले? (ब) मोठ्या बाबेलने कोणत्या अभूतपूर्व मार्गाने जारकर्म आचरले?
४ बाबेलोन (किंवा बाबेल, म्हणजे “गोंधळ”) आपल्या थोरवीच्या कळसाला नबुखद्नेस्सराच्या काळी पोहंचले. ते एक धर्म-राजकीय राज्य होते व त्यात हजारपेक्षा अधिक मंदिरे व देवड्या होत्या. त्याच्या याजकवर्गाने मोठा अधिकार गाजवला. बाबेल एक जागतिक साम्राज्याच्या रुपात अस्तित्वहीन होऊन आता बराच काळ लोटला असला तरी, मोठी धर्मबाबेल अद्याप जिवंत आहे आणि ती आपल्या प्राचीन नमुन्याप्रमाणे अद्याप वर्चस्व गाजविते आणि राजकीय घडामोडींना वळण देते. पण धर्माने राजकारणात लुडबूड करावी हे देवाला पसंत आहे का? प्राचीन काळी इस्राएलाने खोट्या उपासनेशी आपला संबंध राखला आणि मग, यहोवावर भाव ठेवण्याऐवजी त्याने राष्ट्रांसोबत सख्य संपादले तेव्हा त्याने वेश्यागिरी केल्याचे इब्री शास्त्रवचनात म्हणण्यात आले आहे. (यिर्मया ३:६, ८, ९; यहेज्केल १६:२८-३०) मोठी बाबेल देखील जारकर्म आचरते. पृथ्वीच्या राज्यकर्त्या अधिपतींवर आपला ताबा व जम बसवता यावा यासाठी तिने आपल्या परीने होता होईल ते सर्व केले आहे.—१ तीमथ्य ४:१.
५. (अ) धर्मपुढाऱ्यांना कोणत्या प्रकाशझोतात असणे आवडते? (ब) जागतिक प्रमुखपद मिळविण्याची लालसा धरणे हे येशू ख्रिस्ताच्या वचनांच्या थेट विरोधात का आहे?
५ आज, धार्मिक पुढारी सहसा मोठमोठ्या सरकारी पदासाठी मोहीमा लढवतात आणि काही देशात ते सरकारामध्ये सहभाग घेतात व मंत्रिमंडळात जागाही राखतात. दोन प्रसिद्ध प्रॉटेस्टंट पाळक १९८८ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले. मोठ्या बाबेलच्या अधिकाऱ्यांना प्रकाशझोतात राहणे खूप आवडते; त्यांची प्रसिद्ध राजकीय मुत्सद्यांशी मैत्रीपूर्ण बोलणी करीत असल्याची छायाचित्रे ही वर्तमानपत्रातून जाहीरपणे झळकतात. याउलट, येशू तर राजकारणापासून दूर पळाला व त्याने आपल्या अनुयायांबद्दल म्हटले: “जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.”—योहान ६:१५; १७:१६; मत्तय ४:८-१०; तसेच याकोब ४:४ पहा.
आधुनिक काळची ‘वेश्यागिरी’
६, ७. (अ) हिटलरचा नात्सी पक्ष जर्मनीत कसा सत्तेवर आला? (ब) व्हॅटिकनने नात्सी जर्मनीसोबत केलेल्या समेटामुळे हिटलरला जग स्वामित्वाच्या प्राप्तीसाठी पुढे सरसावण्यात कशी मदत झाली?
६ मोठ्या कलावंतीणीने राजकारणात लुडबूड केल्यामुळे मानवजातीवर अगणित दुःखे आणली गेली. उदाहरणार्थ, जर्मनीत हिटलरचे सत्तेवर येणे विचारात घ्या—ही अशी भयानक वस्तुस्थिती आहे, जिला कोणीही इतिहासाच्या पानांतून ओरबडून नष्ट करण्याची इच्छा करील. मे १९२४ मध्ये नात्सी पक्षाच्या जर्मनीच्या लोकसभेत ३२ जागा होत्या. मे १९२८ पर्यंत त्या १२ जागांपर्यंत कमी झाल्या. तथापि, १९३० मध्ये जगाला मोठ्या मंदीने वेढले गेले. यावेळी पुन्हा सतेज झाल्याप्रमाणे नात्सींनी आपली बळकटी केली आणि जुलै १९३२ च्या जर्मन निवडणूकीत ६०८ पैकी २३० जागा पटकावल्या. लवकरच फ्रांझ व्हॉन पापेन हा भूतपूर्व मंत्री आणि चर्चचा उच्चपदस्थ नात्सींच्या मदतीला धावला. इतिहासकारांच्या मते, नवे पवित्र रोमी साम्राज्य निर्माण करावे अशी दृष्टी व्हॉन पापेनने राखली होती. त्याचे पूर्वीचे पद अल्पकालीन ठरले होते यामुळे नात्सीद्वारे आपणाला पुन्हा सत्ता मिळू शकेल अशी त्याने आशा धरली. जानेवारी १९३३ पर्यंत त्याने औद्योगिक जहागिरदारांकडून हिटलरला पाठबळ मिळवून दिले, तसेच कावेबाज मसलतीने हिटलर जानेवारी ३०, १९३३ ला जर्मनीचा मंत्री बनू शकेल अशी खात्री केली. त्याला स्वतःला उपमंत्रीपद मिळाले व हिटलरने जर्मनीतील कॅथलिक विभागाचे पाठबळ मिळवण्यासाठी याचा वापर केला. हिटलर सत्तेवर आल्यावर त्याने दोन महिन्यातच लोकसभा भंग केली, हजारो विरोधी नेत्यांना राजकीय बंद्यांच्या छावणीत पाठवले आणि यहूद्यांचा छळ करण्याची मोहीम उघडपणे सुरु केली.
७ नात्सीच्या वाढत्या सत्तेतील व्हॅटिकनची आस्था ही जुलै २०, १९३३ रोजी दिसली, जेव्हा कार्डिनल पॅसेली (जे नंतर पोप पायस बारावे झाले) यांनी रोममध्ये व्हॅटिकन आणि नात्सी जर्मनी यांच्यामध्ये समेटावर स्वाक्षरी केली. व्हॉन पापेनने हिटलरचा प्रतिनिधी म्हणून स्वाक्षरी दिली, तेव्हा तेथे पॅसेली यांनी व्हॉन पापेनला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ पायस ही चर्चची सन्माननीय पदवी जाहीर केली. * याबद्दलचे लिखाण तिबोर कोवेस हा लेखक श्रेष्ठ टोपीतील सैतान (इंग्रजी) या पुस्तकात करतो व म्हणतो: “घडलेला समेट हा हिटलरसाठी मोठा विजयच होता. यामुळे त्याला बाहेरील जगापासून पहिला नैतिक दुजोरा मिळू शकला व तो देखील उच्च स्तराकडून.” या समेटाने, व्हॅटिकनला जर्मनीच्या कॅथलिक सेंटर पार्टीला दिलेले आपले पाठबळ काढून घ्यायला लावले, यामुळे हिटलरच्या ‘सार्वत्रिक राज्याच्या’ एकमात्र पक्षाला व्हॅटिकनने मंजूरी दिली. * पुढे त्याच्या १४ व्या कलमात असे म्हटले गेले: “आर्चबिशप, बिशप आणि इतरांच्या नेमणूका ह्या सत्तेने ठरविलेल्या प्रांताधिकाऱ्याद्वारे, सर्वसाधारण राजकीय मतांच्या बाबतीत कुठलीही शंकास्पद गोष्ट राहिली नाही याची खात्री झाल्यावरच केल्या जातील.” मग, १९३३ च्या अंताला (हे वर्ष पोप पायस बारावे यांनी “पवित्र वर्ष” म्हणून घोषित केले होते.) हिटलरने जागतिक स्वामित्वासाठी घेतलेल्या धावेस व्हॅटिकनचा आधार एक प्रमुख बाब बनली.
८, ९. (अ) नात्सी जुलमी सत्तेला व्हॅटिकन, कॅथलिक चर्च तसेच पाळकांनी एकंदर कसा प्रतिसाद दर्शवला? (ब) जर्मन कॅथलिक बिशपांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या आरंभाला कोणते विधान केले? (क) धर्म-राजकारण संबंधाचा काय परिणाम घडला?
८ थोडेसे पाळक व जोगिणी यांनी हिटलरच्या रानटी कृत्याला विरोध दर्शवला आणि याबद्दल त्याचा त्रास ओढवून घेतला तरी व्हॅटिकन, कॅथलिक चर्च आणि त्याच्या पाळकांचे सैन्य यांनी नात्सी राजवटीला, जगभर कम्युनिस्ट मतप्रणाली पसरु नये यासाठी तटबंदी म्हणून एकतर आपला क्रियाशील किंवा मूक पाठिंबा देऊ केला. व्हॅटिकनच्या सुंदर सिंहासनावर बसून पोप पायस बारावे यांनी यहूद्यांचा नाश व यहोवाच्या साक्षीदारांवरील क्रूर छळ चालू दिला आणि इतरांनी कसलीही टिका न करता तो चालू ठेवण्याची अनुमती दिली. पोप जॉन पॉल दुसरे यांनी मे १९८७ मध्ये जर्मनीला भेट दिली तेव्हा एका प्रामाणिक याजकाने घेतलेल्या नात्सींविरुद्ध भूमिकेबद्दल प्रशंसोद्गार काढले ते उपरोधिक वाटतात. हिटलरच्या भीतीदायक कारकीर्दीत इतर हजारो जर्मन पाळक काय करीत होते? या मुद्याबद्दल सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरु झाले तेव्हा जर्मन कॅथलिक बिशपांनी जे निवेदन काढले ते यावर प्रकाश पाडते. त्यातील काही भाग असा वाचण्यात येतो: “आता या निर्णायक घटकेला आपल्या नेत्याच्या आज्ञेला मानून आपले कर्तव्य बजावण्याचे आणि आपल्या सर्वस्वाचे अर्पण करण्याची तयारी राखण्याचे आम्ही आव्हान करतो. आम्ही विश्वासू जनांना ही कळकळीची प्रार्थना करावयास अपील करतो की, ईश्वरी आशीर्वादाने या लढ्याला यश मिळो.”
९ कॅथलिकांचे असे हे व्यवहारचातुर्य, स्वतःला सामर्थ्य व लाभ मिळावा यासाठी गेल्या ४,००० वर्षांपासून धर्माने राजकारणी सत्तेसोबत प्रेमयाचना करण्यामध्ये ज्या पद्धतीची वेश्यागिरी दाखवली आहे ती प्रकटविते. अशा या धर्म-राजकारण संबंधाने युद्धे, छळवणूक आणि मानवी दैन्यावस्था ही मोठ्या प्रमाणात रुजू होण्यास वाव दिला. यास्तव, यहोवाचा या मोठ्या कलावंतीणीवर असलेला न्यायदंड लवकरच येणार आहे याबद्दल मानवजातीला किती आनंद वाटावा! तो लवकरच पूर्ण होवो!
मोठ्या जलांवर बसलेली
१०. मोठी बाबेल ज्याकडे संरक्षण म्हणून पाहते ते “अनेक जलप्रवाह” काय आहे आणि त्याचे काय होत आहे?
१० प्राचीन बाबेल मोठ्या जलांवर बसली होती. फरात महानदी व इतर विविध कालवे हे ते जल होते. हे जल तिला संरक्षक होते तसेच ते, एका रात्रीत आटेपर्यंत तिला संपत्ती मिळवून देण्याचे व्यापारी उगम होते. (यिर्मया ५०:३८; ५१:९, १२, १३) मोठी बाबेल देखील ‘अनेक जलप्रवाहांकडे’ संरक्षक व स्वतःला समृद्ध करण्याचा उगम म्हणून पाहते. हे लाक्षणिक जल, “लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे” म्हणजे ज्यावर तिने आपले प्राबल्य राखले व ज्यांच्याकडून तिने आपला आर्थिक आधार मिळवला ते लाखो, हजारो मानव आहेत. पण हे जल आता आटत आहे किंवा आपला आधार काढून घेत आहे.—प्रकटीकरण १७:१५; पडताळा स्तोत्र १८:४; यशया ८:७.
११. (अ) प्राचीन बाबेलने ‘सर्व पृथ्वीस [कसे] मस्त बनवले’? (ब) मोठ्या बाबेलने ‘सर्व पृथ्वीस [कसे] मस्त बनवले’?
११ प्राचीन बाबेलला “परमेश्वराच्या [यहोवा, NW] हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला” असल्याचे म्हटले आहे. (यिर्मया ५१:७) प्राचीन बाबेलने जवळील राष्ट्रांवर लष्करीदृष्ट्या विजय मिळवला आणि प्यालेल्या मनुष्याप्रमाणे दुर्बळ बनवले तेव्हा त्याने त्यांना यहोवाच्या क्रोधाचे प्राशन करावयास लावले. या बाबतीत तो, यहोवाचे एक उपकरण असा होता. मोठ्या बाबेलने देखील विजय मिळवून स्वतःचे एक जगसाम्राज्य प्रस्थापित केले आहे. पण ती काही देवाचे उपकरण नाही. उलट, तिने तर ज्यांच्यासोबत धार्मिक जारकर्म आचरले त्या ‘पृथ्वीवरील राजांची’ सेवा केली आहे. आपल्या लबाड तत्त्वांचा वापर करून आणि पकडीत ठेवणाऱ्या प्रथांचा वापर करून “पृथ्वीवर राहणारे जन” यांना झिंगलेल्या लोकांसारखे “मस्त” करून त्यांच्या सत्ताधिशांना समाधानी व संतुष्ट बनवले.
१२. (अ) मोठ्या बाबेलचा एक घटक जपानमध्ये दुसऱ्या जागतिक महायुद्धात अधिक रक्तपात घडविण्यास कसा जबाबदार ठरला? (ब) जपानमध्ये मोठ्या बाबेलीस आधार देणारे ‘जलप्रवाह’ कसे आटले आणि याचा काय परिणाम दिसला?
१२ जपानी शिंतो याचे एक लक्षवेधी उदाहरण आहे. याच्या तत्त्वप्रणालीने शिक्षित झालेल्या जपानी सैनिकाला आपल्या सम्राटासाठी—शिंतो देवासाठी स्वतःच्या जीवनाचे बलिदान करणे हा सर्वांत मोठा बहुमान वाटत असे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात सुमारे १५,००,००० जपानी सैनिक ठार झाले; मानवाच्या दृष्टीने तर शरणागती पत्करणे म्हणजे अपमानच होता. पण जपानचा पराजय झाल्यामुळे हिरोहितो या सम्राटाला आपणातील ईश्वरीयत्व असण्याचा दावा नाकारणे भाग पडले. याचा परिणाम, मोठ्या बाबेलच्या शिंतो घटकास आधार देणारे ‘जलप्रवाह’ बहुत प्रमाणात आटण्यात घडले; पण हे सर्व शिंतो धर्माने पॅसिफिक युद्ध क्षेत्रात रक्ताचे पाट वाहिल्यानंतर घडले ही मोठी दुःखद गोष्ट आहे! अशाप्रकारे शिंतोच्या दुर्बळ होत चाललेल्या प्रभावाने १,७७,००० जपानी लोकांना, ज्यापैकीचे बहुतेक पूर्वी शिंतो व बुद्ध होते त्यांना आता सार्वभौम प्रभू यहोवा याचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले सेवक बनण्यासाठी मार्ग मोकळा झाला.
कलावंतीण श्वापदावर आरूढ होते
१३. देवदूत योहानाला आत्म्याने संचारलेला असा रानात घेऊन जातो तेव्हा योहान कोणते आश्चर्यकारक दृश्य बघतो?
१३ ती मोठी कलावंतीण आणि तिचे भवितव्य याबद्दल भविष्यवाद आणखी काय सांगतो? आता योहान स्पष्टीकरण करतो त्याप्रमाणे जोरदार दृश्य सामोरे येते: “मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने [देवदूताने] मला रानात नेले; तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.”—प्रकटीकरण १७:३.
१४. योहानाला रानात नेण्यात आले हे का योग्य आहे?
१४ योहानाला रानात का नेण्यात येते? प्राचीन बाबेलविरुद्ध आधी जी नाशाची घोषणा करण्यात आली होती तिजबद्दल “समुद्रालगतच्या रानाविषयीची देववाणी” असे वर्णन देण्यात आले होते. (यशया २१:१, ९) याद्वारे योग्य इशारा मिळाला की, जरी जलाचे संरक्षण असले तरी प्राचीन बाबेल ही निर्जीव व ओसाड अशी बनेल. या कारणामुळेच योहानाला देखील त्याच्या दृष्टांतात रानात नेले जाऊन तेथे मोठ्या बाबेलचे काय घडते ते पहावयास मिळावे हे योग्यच आहे. हिला देखील ओसाड व निर्जन झालेच पहिजे. (प्रकटीकरण १८:१९, २२, २३) योहान पुढे जे बघतो त्याचे त्याला खूप आश्चर्य वाटते. ही मोठी कलावंतीण एकटी नाही! ती तर एका विक्राळ श्वापदावर आरूढ झालेली आहे!
१५. प्रकटीकरण १३:१ व प्रकटीकरण १७:३ मधील श्वापदांमध्ये कोणकोणते फरक आहेत?
१५ या श्वापदाला सात डोकी व दहा शिंगे आहेत. हे, पूर्वी योहानाने सात डोकी व दहा शिंगे असणारे जे श्वापद पाहिले होते ते तर नाही ना? (प्रकटीकरण १३:१) नाही, त्यात काही फरक आहेत. हे श्वापद दिसायला किरमिजी रंगाचे आहे आणि पूर्वीच्या श्वापदाला होते त्यासारखे याला मुकुट नाहीत. या श्वापदाला नुसती सात देवनिंदात्मक डोकी असण्यापेक्षा ते ‘देवनिंदात्मक नावांनी भरलेले’ आहे. तथापि, हे श्वापद व पूर्वीचे श्वापद यात काहीतरी संबंध असलाच पाहिजे. त्यांच्यातील साम्यता ही देखील योगायोगाची आहे.
१६. किरमिजी रंगाच्या श्वापदाची कोणती ओळख मिळते आणि त्याचा कथित उद्देश काय असल्याचे म्हटले जाते?
१६ मग हे नवे किरमिजी रंगाचे श्वापद काय आहे? ते, कोकऱ्यासारखी दोन शिंगे असणाऱ्या अँग्लो-अमेरिकन श्वापदाच्या आर्जवामुळे श्वापदाची बनविण्यात आलेली मूर्ती असावी. ती मूर्ती बनविल्यानंतर त्या दोन शिंगाच्या श्वापदाला त्या श्वापदाच्या मूर्तीमध्ये प्राण घालण्याची मुभा देण्यात आली होती. (प्रकटीकरण १३:१४, १५) योहान आता एक जिवंत, श्वासवान मूर्ती बघतो. ती दोन शिंगाच्या श्वापदाने १९२० मध्ये जिवंत केलेली लिग ऑफ नेशन्सला चित्रित करते. अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन यांनी या लिग ऑफ नेशन्सबद्दल असा दृष्टांत घोषित केला की, तो “सर्व लोकांना न्याय देणारा व युद्धाची दहशत कायमची काढून टाकणारा मंच असेल.” दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा या संस्थेचे पुनरुज्जीवन होऊन तो संयुक्त राष्ट्रसंघ बनला तेव्हा तिची कायदेशीर सनद “आंतरराष्ट्रीय शांती व निर्भयता राखणे” ही होती.
१७. (अ) लाक्षणिक किरमिजी रंगाचे श्वापद कोणत्या अर्थाने देवनिंदात्मक नावांनी भरलेले आहे? (ब) किरमिजी रंगाच्या श्वापदावर कोण आरूढ झालेले आहे? (क) बाबेलच्या धर्माने आधीपासूनच लिग ऑफ नेशन्स व तिचा वारस यांजशी स्वतःचे संबंध कसे जुळविले आहेत?
१७ हे लाक्षणिक श्वापद “देवनिंदात्मक नावांनी” कोणत्या अर्थाने भरलेले आहे? ते या अर्थाने की, या बहुराष्ट्रीय मूर्तीची निर्मिती मानवाकडून असून तिची प्रस्थापना देवाच्या राज्याचा पर्याय म्हणून आणि देवाचे राज्य केवळ जे तडीस नेणार आहे तेच हेही पूर्ण करील असा याचा दावा आहे. (दानीएल २:४४; मत्तय १२:१८, २१) योहानाच्या या दृष्टांतामधील वैशिष्ट्य हे की, ही मोठी बाबेल या किरमिजी रंगाच्या श्वापदावर आरूढ होऊन बसली आहे. या भविष्यवादाच्या सत्यतेला अनुलक्षून खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील बाबेली धर्माने स्वतःचा संबंध लिग ऑफ नेशन्स व तिचा वारस यासोबत दाखवला आहे. अगदी आरंभालाच म्हणजे डिसेंबर १८, १९१८ ला सध्या नॅशनल कौन्सिल ऑफ द चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन अमेरिका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाने एक असा ठराव संमत केला, ज्यापैकी काही भाग असा म्हणतो: “ही लिग नुसतीच राजकीय कार्यकारिणी नाही; तर ती देवाच्या राज्याचे पृथ्वीवरील राजकीय वक्तव्य आहे. . . . चर्च याला आपल्या सदिच्छांचा आत्मा देऊ शकते व याशिवाय या लिग ऑफ नेशन्सला टिकाव धरता येणार नाही. . . . लिग ऑफ नेशन्सचे मूळ शुभवर्तमानात आहे. शुभवर्तमानाप्रमाणेच याचाही उद्देश ‘पृथ्वीवर शांती व लोकांप्रीत्यर्थ सदिच्छा’ हा आहे.”
१८. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी लिग ऑफ नेशन्सला आपले पाठबळ कसे जाहीर केले?
१८ सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल या वृत्तपत्राने जानेवारी २, १९१९ ला पहिल्या पानावर “विल्सनच्या लिग ऑफ नेशन्सला उंचावण्याचे पोपचे अपील” असे शीर्षक दिले. ऑक्टोबर १६, १९१९ ला विविध पंथांच्या १४,४५० पाळकांच्या स्वाक्षरीने केलेली याचना अमेरिकेच्या वरिष्ठ कायदेमंडळास देऊन त्या गटाने “लिग ऑफ नेशन्सच्या करारास अनुलक्षून पॅरिसच्या शांती तहाला मंजूरी द्यावी” असे मंडळाला आर्जविले. अमेरिकेच्या वरिष्ठ कायदेमंडळाने जरी या तहाला मंजूरी देण्याचे नाकारले, तरी ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक लिगसाठी पाठिंबा नित्याने देत राहिले. आणि लिगच्या समारंभाचे उद्घाटन कसे झाले? स्वित्झर्लंडहून नोव्हेंबर १५, १९२० ला आलेले एक वृत्त असे वाचण्यात येते: “लिग ऑफ नेशन्सचे पहिले अधिवेशन सकाळी अकरा वाजता जिनेव्हा येथील सर्व चर्चच्या घंटांचा नाद करून सुरु करण्यात आले.”
१९. किरमिजी रंगाच्या श्वापदाने आपली उपस्थिती दाखवल्यावर, योहान वर्गाने कोणती हालचाल केली?
१९ येणाऱ्या मशीही राज्याची उत्सुकतेने वाट पाहात असलेल्या योहान वर्गाने किरमिजी रंगाच्या श्वापदाला नमस्कार करण्यात ख्रिस्ती धर्मजगतासोबत सहभागिता घेतली का? मुळीच नाही! सीडर पॉईंट, ओहायो येथे रविवार, सप्टेंबर ७, १९१९ रोजी झालेल्या यहोवाच्या लोकांच्या अधिवेशनात “संत्रस्त मानवजातीसाठी आशा” हे जाहीर भाषण झाले. पुढील दिवशी सन्डस्की येथील एक वृत्तपत्र, स्टार-जर्नल याने वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांना ७,००० लोकांच्या जमावापुढे भाषण करताना असे म्हटल्याचे उद्धृत केले की, “लिगविरुद्ध प्रभूची असंतुष्टता नक्कीच प्रकट होईल . . . कारण देवाचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या कॅथलिक व प्रॉटेस्टंट पाळकांनी देवाच्या योजनांचा त्याग केला असून लिग ऑफ नेशन्सला आपला पाठिंबा दिला व तिला ख्रिस्ताच्या राज्याचे पृथ्वीवरील वक्तव्य असल्याचे गौरवाने म्हटले आहे.”
२०. पाळकांनी लिग ऑफ नेशन्सची “देवाच्या राज्याचे पृथ्वीवरील राजकीय वक्तव्य” अशी स्तुती करणे हे देवनिंदात्मक का होते?
२० लिग ऑफ नेशन्सला जे भयाण अपयश आले त्याने तरी निदान पाळकांना हा संकेत द्यावयाचा होता की, अशा प्रकारातील मानवनिर्मित संघटना देवाच्या राज्याचा पृथ्वीवरील भाग असू शकत नाही असा दावा करणे हेच मुळात किती निंद्य आहे! लिगचे जे झाले त्या प्रचंड उलाढालीमध्ये जणू देवच सामील होता असे ते भासवते. परंतु देवाबद्दल बघता, “त्याची कृति परिपूर्ण आहे.” यहोवा, क्षुल्लक कारणासाठी भांडणाऱ्या व बहुतांशी नास्तिक असणाऱ्या राजकारणी लोकांद्वारे नव्हे, तर ख्रिस्ताच्या वर्चस्वाधीन असलेल्या त्याच्या स्वर्गीय राज्याद्वारेच शांती आणणार आहे आणि स्वर्गाप्रमाणेच पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण करणार आहे.—अनुवाद ३२:४; मत्तय ६:१०.
२१. मोठी कलावंतीण लिगचा वारस, संयुक्त राष्ट्रसंघ यालाही पाठबळ देते व कौतुक करते हे कशावरुन दिसते?
२१ आता लिगचा वारस संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल काय? याच्या अगदी आरंभापासूनच मोठी कलावंतीण याच्या पाठीवर बसली असल्याचे, त्याच्याशी सहवास राखून असल्याचे आणि त्याला दिशा मार्गदर्शित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ, याच्या २० व्या वार्षिकदिनी, जून १९६५ मध्ये रोमन कॅथलिक चर्च, पूर्वीय कर्मठ चर्च यांच्यासोबत प्रॉटेस्टंट, यहूदी, हिंदू, बौद्ध आणि मुस्लीम—जे साधारण पृथ्वीच्या दोनशे कोटींचे प्रतिनिधीत्व करणारे—संयुक्त राष्ट्रसंघाची स्तुती तसेच आपला आधार दाखवण्यासाठी सॅन फ्रॅन्सिस्को येथे जमले होते. ऑक्टोबर १९६५ ला पोप पॉल सहावे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला भेट देऊन त्याचे वर्णन “आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सर्वात मोठी संस्था” असे केले व पुढे म्हटले: “शांती व सामंजस्य या करता शेवटली आशा म्हणून पृथ्वीच्या लोकांना संयुक्त राष्ट्रसंघाकडे वळावे लागेल.” आणखी एक धर्मगुरु, पोप जॉन पॉल दुसरे यांनी ऑक्टोबर १९७९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल बोलताना म्हटले: “मी आशा करतो की, संयुक्त राष्ट्रसंघ शांती व न्याय याची सर्वोच्च संघटना म्हणून राहील.” या भाषणात पोपनी येशू ख्रिस्त किंवा देवाच्या राज्याचा उल्लेख केला नाही, हे लक्षणीय आहे. त्यांनी सप्टेंबर १९८७ मध्ये अमेरिकेला भेट दिल्यावर न्यूयॉर्क टाईम्सने असे कळवले: “‘नव्या जागतिक ऐक्याच्या’ . . . वाढीस संयुक्त राष्ट्रसंघाने जी विधायक भूमिका घेतली आहे तिजबद्दल पोप जॉन पॉल बऱ्याच वेळपर्यंत बोलत राहिले.”
गूढार्थक नाव
२२. (अ) मोठ्या कलावंतीणीने स्वतःला वाहून नेण्यासाठी कसल्या प्रकारच्या श्वापदाची निवड केली आहे? (ब) योहान त्या लाक्षणिक कलावंतीणीचे, मोठ्या बाबेलचे कसे वर्णन देतो?
२२ मोठ्या कलावंतीणीने स्वतःला वाहून नेण्याचे साधन म्हणून जे श्वापद निवडले आहे ते किती भयंकर आहे याची योहानाला लवकरच माहिती होणार. तरीपण प्रथमतः त्याचे लक्ष मोठ्या बाबेलकडे वेधले जाते. ती तर अलंकारांनी विभूषित आहे, पण ती केवढी किळसवाणी वाटते! “ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती, आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता; तिच्या कपाळावर ‘मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,’ हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षींच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली.”—प्रकटीकरण १७:४-६अ.
२३. मोठ्या बाबेलचे पूर्ण नाव काय आहे आणि त्याची कोणती अर्थसूचकता आहे?
२३ प्राचीन रोममध्ये प्रथा होती त्यानुसार ह्या कलावंतीणीची ओळख तिच्या कपाळावर लिहिलेल्या नावामुळे मिळते. * ते मोठे नाव आहे: “मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई.” हे नाव “गूढ अर्थाचे” म्हणजे काहीतरी रहस्य दडलेले असे आहे. पण देवाच्या नियुक्त वेळी हे रहस्य उलगडले जाईल. खरे म्हणजे, देवदूत योहानाला इतकी माहिती देतो की, आज यहोवाचे लोक त्या वर्णनात्मक नावाची पूर्ण अर्थसूचकता जाणू शकतात. मोठी बाबेल म्हणजे सर्व खोटा धर्म असल्याची आपल्याला कल्पना आहे. ती ‘कलावंतिणीची आई’ आहे याचा अर्थ, जगातील सर्व वैयक्तिक खोटे धर्म, ज्यात ख्रिस्ती धर्मजगतातील पुष्कळ पंथही आहेत ते सर्व, तिच्या मुलीसारखे आहेत व हेही आपल्या आईचे अनुकरण करून आध्यात्मिक व्यभिचार करतात. तसेच ती “अमंगळपणाची” देखील आई आहे, म्हणजे तिने मूर्तीपूजा, भूतविद्या, नशीब सांगणे, फलज्योतिष, हस्तरेषा शास्त्र, मानवी बलिदान, मंदिरातील वेश्यागिरी, खोट्या देवांच्या प्रतिष्ठेसाठी दारुबाजी आणि इतर नीच हालचालींना जन्मास घातले आहे.
२४. मोठी बाबेल “जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली” आणि “सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये ह्यांनी शृंगारलेली” होती हे का योग्य होते?
२४ मोठ्या बाबेलने “जांभळी व किरमिजी वस्त्रे” राजेशाही रंगाची वस्त्रे, घातली आहेत व तिने “सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये” यांनी स्वतःला विभूषित केले आहे. ते केवढे योग्य आहे! या जगाच्या धर्मांच्या दिमाखी इमारती, विरळ पुतळे व चित्रे, बहुमूल्य मूर्त्या आणि इतर धार्मिक लवाजमा, याचप्रमाणे प्रचंड प्रमाणातील मिळकत व संपत्ती केवढी जमविली आहे हे लक्ष देऊन पहा. व्हॅटिकन, अमेरिकेतील सुवार्तिक केंद्रातील दूरदर्शन साम्राज्यात किंवा परदेशीय बुद्धाची देवालये, पूर्व देशातील देवळे आणि इतरत्र मोठ्या बाबेलने अमाप संपत्ती मिळवली व कित्येक वेळा अफाट संपत्ती देखील गमावली.
२५. (अ) ‘अमंगळ पदार्थांनी भरलेला सोन्याचा प्याला’ यात असणाऱ्या गोष्टींद्वारे काय सूचित होते? (ब) ती लाक्षणिक कलावंतीण कोणत्या अर्थाने मस्त झालेली आहे?
२५ आता या कलावंतीणीच्या हातात काय आहे त्याकडे लक्ष द्या. योहानाने ते बघून आपला श्वास रोखून धरला असेल—तो सोन्याचा प्याला होता, पण आतून “अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या मळाने भरलेला” होता! या प्याल्यात तिच्या “जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस” आहे व तो तिने सर्व राष्ट्रांना पाजून त्यांना गुंग केले. (प्रकटीकरण १४:८; १७:४) तो बाहेरून तर खूप किंमतीचा दिसतो, पण आतून मात्र अमंगळ व घाणेरड्या गोष्टींनी भरलेला आहे. (पडताळा मत्तय २३:२५, २६.) मोठ्या कलावंतीणीने सर्व राष्ट्रांना ज्याद्वारे फुसलाविले व आपल्या अधीन ठेवले ते तिचे सर्व घाणेरडे आचार आणि लबाड्या यांनी तो भरला आहे. यात आणखी भर म्हणजे, ती कलावंतीणच स्वतः देवाच्या सेवकांच्या रक्ताने मस्त झालेली, झिंगलेली आहे असे योहान पाहतो! वस्तुतः आपण नंतर असे वाचतो की, “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.” (प्रकटीकरण १८:२४) केवढा मोठा हा रक्तदोष!
२६. मोठ्या बाबेलकडून रक्तदोष घडला आहे याचा कोणता पुरावा आहे?
२६ खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याने शतकानुशतके रक्ताचे पाट वाहिलेले आहेत. उदाहरणार्थ, मध्ययुगीन काळात जपानमध्ये क्योटोच्या देवळांचे रुपांतर किल्ल्यात झाले आणि भिक्षुक लढवय्यांनी “बुद्धाच्या पवित्र नामात” एकमेकांविरुद्ध लढाई करून सर्व रस्ते रक्तांनी न्हाऊ घातले. या २० व्या शतकात, ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्यांनी आपापल्या राष्ट्रांच्या सैन्यासोबत वाटचाल केली आणि यांनी एकमेकांना ठार केले आणि साधारण दहा कोटींपर्यंत बळी पाडले. ऑक्टोबर १९८७ मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष, निक्सन यांनी म्हटले: “हे २० वे शतक इतिहासातील अत्यंत रक्तपाती शतक आहे. हे शतक सुरु होण्याआधीच्या सर्व शतकांत झालेल्या युद्धात जितके बळी पडले त्यापेक्षाही जास्त या शतकाच्या युद्धात ठार झाले आहेत.” यात भाग घेतल्यामुळे देव जगाच्या धर्मांचा प्रतिकूल न्याय करणार, कारण यहोवाला “निर्दोष रक्त पाडणारे हात” यांचा वीट वाटतो. (नीतीसूत्रे ६:१६, १७) आधी, योहानाने वेदीकडून ही ओरड ऐकली होती: “हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?” (प्रकटीकरण ६:१०) या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा मोठी बाबेल, कलावंतीणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हिच्याकडून जाब घेतला जाईल.
[तळटीपा]
^ धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताच्या पुष्कळ तत्त्वप्रणाली, समारंभ आणि प्रथा यांचा ख्रिस्तेत्तर उगम दर्शविण्यासाठी १९ व्या शतकातील रोमन कॅथलिक कार्डिनल जॉन हेन्री न्यूमन यांनी आपल्या ख्रिस्ती मतप्रणालीची वाढ यावरील निबंध (इंग्रजी) यात असे लिहिले: “मंदिरांचा वापर व ती विशिष्ट संतांना समर्पित केलेली आणि ती काही प्रसंगी झाडांच्या फांद्यांनी सुशोभित केलेली; धूप, दिवे आणि मेणबत्त्या; आजारापासून बरे झाल्यावर नवसाची अर्पणे करणे; पवित्र पाणी; आश्रयस्थान; पवित्र दिवस व सण; पंचांगांचा वापर, मिरवणूका, शेतांवर आशीर्वाद; धर्मोपदेशकांची पवित्र अधिकार वस्त्रे, धर्मगुरुंची विशिष्ट केशभूषा, लग्नाची अंगठी, पूर्वेकडे वळणे, नंतरच्या काळी आलेल्या मूर्त्या, चर्चची गीते, [‘हे प्रभू, मजवर दया कर’ हे गीत] या सर्व गोष्टी मूर्तीपूजक उगमाच्या असून त्यांचे पवित्रीकरण करून चर्चने त्यांना आपणामध्ये घेतल्या आहेत.” “सर्वसमर्थ प्रभू” यहोवा, अशा मूर्तीपूजेला पवित्र मानण्याऐवजी ख्रिस्ती लोकांना आज्ञा देतो की, “त्याच्यामधून निघा व वेगळे व्हा, . . . जे अशुद्ध त्याला शिवू नका.”—२ करिंथकर ६:१४-१८.
^ विल्यम एल. श्रायर यांचे संपूर्ण जर्मन राष्ट्राचा उदय व पतन (इंग्रजी) हा ऐतिहासिक ग्रंथ म्हणतो की, व्हॉन पापेन हा “जर्मनीत हिटलरच्या सत्तेवर येण्याला इतर कोणाही व्यक्तीपेक्षा अधिक जबाबदार ठरला.” जानेवारी १९३३ मध्ये पूर्वीचे जर्मन चान्सलर व्हॉन शेल्चीयर व्हॉन पापेनबद्दल म्हणाले: “तो अशा प्रकारातील विश्वासघातकी ठरला की, ज्यापुढे यहूदा इस्कर्योत हा संत असल्याचे भासतो.”
^ मे १४, १९२९ रोजी कॉलेज ऑफ माँड्रेगोन येथे भाषण करताना पोप पायस अकरावे यांनी असे म्हटले की, आत्म्यांचे भले होत असले तर स्वतः दियाबलाशी देखील बोलणी करण्याची त्यांची तयारी राहील.
^ रोमी लेखक सिनेका याने मार्गभ्रष्ट धर्मोपदेशिकेला जे शब्द म्हटले (व जे स्वेटेने अवतरीत केले आहे) ते पडताळा: “तू वाईट आचार आचरल्या जाणाऱ्या घरात जाऊन उभी राहिलीस; तुझ्या कपाळावरुनच तुझे नाव कळते; तू आपल्या नीच कमाईने पैसा मिळवलास.”—कन्ट्रोव्ह. पहिला खंड, २.
[अभ्यासाचे प्रश्न]
[२३७ पानांवरील चौकट]
चर्चील ‘वेश्यागिरी’ उघड करतात
विन्स्टन चर्चील एकत्र होत असलेले वादळ (इंग्रजी, १९४८), या पुस्तकात कळवतात की, हिटलरने फ्रांझ व्हॉन पापेन याला जर्मनचा प्रतिनिधी बनवून व्हिएन्ना येथे “ऑस्ट्रीयन राजकारणात असलेल्या प्रमुख व्यक्तींना जिंकावे वा त्यांना नीच करावे म्हणून पाठवले.” व्हॉन पापेनबद्दल व्हिएन्ना येथील अमेरिकन प्रतिनिधी असे म्हटल्याचे चर्चील सांगतात: “अत्यंत खंबीरतेने व अत्यंत उपहासात्मक पद्धतीने . . . पापेनने मला सांगितले की, . . . एक चांगला कॅथलिक या नात्याने असलेल्या त्याच्या ख्यातिचा वापर तो कार्डिनल इनीटेझरप्रमाणे ऑस्ट्रीयांवर चांगले प्रभूत्व मिळवण्यात करणार.”
ऑस्ट्रीयाने शरणागती पत्करल्यावर आणि हिटलरचे वादळी घोडदळ व्हिएन्नामध्ये दाखल झाल्यावर, कॅथलिक कार्डिनल इनीटेझरने आज्ञा दिली की, सर्व ऑस्ट्रीयन चर्चेसनी स्वस्तिक झेंडे फडकावेत, घंटानाद करावा आणि ॲडॉल्फ हिटलरच्या जन्मदिवशी त्याच्यासाठी प्रार्थना करावी.
[२३८ पानांवरील चौकट]
या शीर्षकाखाली खालील मजकूर न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रात डिसेंबर ७, १९४१ रोजी पहिल्या आवृत्तीत प्रसिद्ध झाला:
जर्मन राष्ट्रासाठी ‘युद्ध प्रार्थना’
“फुल्दा येथे कॅथलिक बिशप आशीर्वाद व विजयाची याचना करतात . . . फुल्दा येथे जर्मन कॅथलिकांच्या मेळाव्यात जमलेल्या बिशपांनी एका खास ‘युद्ध प्रार्थनेची’ शिफारस केली, जी प्रत्येक ईश्वरी उपासनेच्या सुरवातीला व शेवटाला म्हणायची आहे. या प्रार्थनेत जर्मन सैन्याला विजय द्यावा आणि सर्व सैनिकांच्या जीवनाला व आरोग्याला संरक्षण द्यावे ही याचना ईश्वराला केलेली आहे. बिशपांनी कॅथलिक पाळकांना आणखी सूचना केली की, महिन्यातून निदान एकदा, खास रविवारी ‘जमिनीवर, समुद्रावर व आकाशात’ लढणाऱ्या जर्मन सैन्याकरता त्यांची आठवण म्हणून एक प्रवचन द्यावे.”
हा मजकूर या वृत्तपत्राच्या नंतरच्या आवृत्तीतून वगळण्यात आला. डिसेंबर ७, १९४१ रोजी नात्सी जर्मनी, जपान यांनी पर्ल बंदरातील अमेरिकी तांड्यावर हल्ला केला.
[२४४ पानांवरील चौकट]
‘देवनिंदात्मक नावे’
दोन शिंगे असलेल्या श्वापदाने पहिल्या जागतिक युद्धानंतर लिग ऑफ नेशन्सची प्रस्तुती केली तेव्हा लगेच पुष्कळ धार्मिक जारिणींनी या कृतीला आपला धार्मिक पाठिंबा जाहीर केला. यामुळे नवी शांती संस्था ‘देवनिंदात्मक नावांनी’ भरली गेली.
“लिग [ऑफ नेशन्सला] ख्रिस्ती धर्म आपल्या सदिच्छा व सबळ पाठिंबा देतो व याद्वारे कागदाच्या एकका तुकड्यावरील तहापासून त्याचे रुपांतर देवाच्या राज्याच्या साधनात करतो.”—ख्रिस्ती शतक (इंग्रजी) अमेरिका, जून १९, १९१९, पृष्ठ १५.
“लिग ऑफ नेशन्सची कल्पना ही देवाच्या राज्याने सदिच्छांचे नवे जग आणण्याच्या कल्पनेचा पुढे आंतरराष्ट्रीय नातेसंबंध सुधारण्याचा विस्तार आहे. . . . ख्रिस्ती लोक ‘तुझे राज्य येवो,’ अशी प्रार्थना करतात तेव्हा हाच तो विषय असतो.”—ख्रिस्ती शतक अमेरिका, सप्टेंबर २५, १९१९, पृष्ठ ७.
“लिग ऑफ नेशन्स ख्रिस्ताच्या रक्तात भिनलेला आहे.”—डॉ. फ्रँक क्रेन, प्रॉटेस्टंट पाळक, अमेरिका.
“[काँग्रिगेशनल चर्चेसचे] [नॅशनल] कौन्सिल [लिग ऑफ नेशन्सच्या] करारास आपली मान्यता देते, कारण ते येशू ख्रिस्ताच्या आत्म्याला राष्ट्रांच्या घडामोडीतील व्यावहारिक अवलंबनाला अधिक व्याप्त वाव मिळावा यासाठी राजकीय साधन म्हणून आज उपलब्ध आहे.”—द काँग्रिगेशनलिस्ट ॲण्ड ॲडव्हान्स, अमेरिका, नोव्हेंबर ६, १९१९, पृष्ठ ६४२.
“हा मेळावा सर्व मेथॉडिस्ट लोकांना देव जो पिता व देवाच्या पृथ्वीवरील मुलांद्वारे व्यक्त झालेल्या [लिग ऑफ नेशन्सच्या] धोरणाला उच्चपणे पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहे.”—द वेस्लेयन मेथॉडिस्ट चर्च, ब्रिटन.
“या करारामागील उत्कट इच्छा शक्यता आणि प्रस्ताव याबाबत आपण विचार करतो तेव्हा त्यात ख्रिस्त येशूच्या शिकवणींचा गाभा सामावलेला आहे असे आपल्याला दिसते: “देवाचे राज्य व त्याची धार्मिकता . . . हे यापेक्षा काही कमी नाही.”—कँटरबरीच्या आर्चबिशपांचे प्रवचन; हे त्यांनी जिनेव्हा येथे डिसेंबर ३, १९२२ रोजी लिग ऑफ नेशन्सच्या सभेच्या उद्घाटन प्रसंगी दिले होते.
“लिग ऑफ नेशन्स या संघटनेला या देशात इतर कोणत्याही मानवी मिशनरी संस्थेला जे हक्क आहेत तेच पवित्र हक्क आहेत, कारण ही संस्था, राष्ट्रांतील शांतीचा राजपुत्र या नात्याने असलेल्या ख्रिस्ताच्या राजवटीचे अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून सध्या उपलब्ध आहे.”—डॉ. गार्वी, काँग्रिगेशनलिस्ट उपाध्याय, ब्रिटन.
[२३६ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
जगव्याप्तपणे विश्वास ठेवल्या जाणाऱ्या खोट्या शिकवणींचा उगम बॅबिलॉनमधून आहे
बॅबिलॉन
त्रैक्य किंवा देवांचे त्रित्व
मानवी जीव मरणानंतर बचावतो
भूतविद्या —‘मृतांबरोबर’ बोलणे
उपासनेत मूर्त्यांचा वापर
दुरात्म्यांना घालवून देण्यासाठी मंत्राचा उपयोग
शक्तिमान याजकवर्गाचे शासन
[२३९ पानांवरील चित्रे]
प्राचीन बाबेल पुष्कळ जलांवर बसले होते
मोठी कलावंतीण देखील आज “अनेक जलप्रवाहांवर” बसलेली आहे
[२४१ पानांवरील चित्रे]
मोठी बाबेल एका भयंकर श्वापदावर आरूढ झालेली आहे
[२४२ पानांवरील चित्रे]
धार्मिक कलावंतीणीने पृथ्वीवरील राजांसोबत व्यभिचार आचरलेला आहे
[२४५ पानांवरील चित्रे]
ती स्त्री ‘पवित्र जनांच्या रक्ताने मस्त झालेली’ आहे