देव आम्हास त्याचे उद्देश कळवतो
भाग ४
देव आम्हास त्याचे उद्देश कळवतो
१, २. देव प्रामाणिकतेने विचारणाऱ्यांना उत्तर देतो हे आम्हाला कसे माहीत आहे?
प्रेमळ देव त्याला शोधणाऱ्या प्रामाणिक जनांना नक्कीच त्याचे उद्देश प्रकट करतो. त्याने दु:खाला परवानगी का दिली अशी विचारपूस करणाऱ्या मानवांना तो याचे उत्तर पुरवितो.
२ पवित्र शास्त्र म्हणते: “तू त्याच्या भजनी [“शोध करु,” न्यू.व.] लागशील, तर तो तुला प्राप्त होईल.” “रहस्ये प्रकट करणारा देव स्वर्गात आहे.” “प्रभु परमेश्वर [यहोवा न्यू.व.] आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.”—१ इतिहास २८:९; दानीएल २:२८; आमोस ३:७.
ही उत्तरे कोठे आहेत?
३. देव दु:खाला परवानगी का देतो याचे कारण आम्हाला कोठे मिळू शकेल?
३ देवाने दु:खाला परवानगी का दिली व तो याबद्दल काय करणार आहे ह्या प्रश्नांची उत्तरे आमच्या लाभासाठी त्याने प्रेरित केलेल्या अहवालात मिळतात. तो अहवाल म्हणजे पवित्र शास्त्र, त्याचे वचन होय. “प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.”—२ तीमथ्य ३:१६, १७.
४, ५. पवित्र शास्त्र एक अतुलनीय पुस्तक कशामुळे आहे?
४ पवित्र शास्त्र हे खरोखरच एक अतुलनीय पुस्तक आहे. यामध्ये मानवी इतिहासाची अगदी अचूक माहिती आहे व मानवांच्या उत्पत्तिच्या आधीच्याही गोष्टी लिखित आहेत. ते अद्ययावत आहे, कारण त्यातील भविष्यवाणी आमच्या काळातील घटनांसोबत व आमच्या नजीकच्या भविष्याबरोबर देखील जुळतात.
५ इतर कोणत्याही पुस्तकाला त्याच्या ऐतिहासिक अचूकतेसाठी अशी अधिकारपत्रे नाहीत. उदाहरणार्थ, अव्वल दर्जाच्या प्राचीन लेखकांची थोडीच हस्तलिखिते आज अस्तित्वात आहेत. पण पवित्र शास्त्राची काही अर्धवट तर काही पूर्ण हस्तलिखिते अस्तित्वात आहेत: ६,००० इब्री शास्त्र वचने (“जुना करार”ची ३९ पुस्तके) व १३,००० ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने (“नवा करार”ची २७ पुस्तके).
६. आजचे पवित्र शास्त्र देवाने प्रेरित केले होते तसेच आहे याची आम्हाला खात्री कशी मिळते?
६ पवित्र शास्त्राला प्रेरित केलेल्या सर्वसमर्थ देवाने, मूळग्रंथाची अखंडता ह्या हस्तलिखित प्रतींमध्ये टिकून राहावी याकडे लक्ष दिले आहे. यामुळे आमचे पवित्र शास्त्र मूळ प्रेरित लिखाणासोबत समांतर आहे. दुसरे, त्याची कृतज्ञता करण्याची आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की ख्रिस्ती ग्रीक शास्त्र वचनांच्या काही हस्तलिखित प्रती मूळ लिखाणाच्या अगदी शंभर वर्षांमधील आहेत. प्राचीन प्रापंचिक लेखकांच्या अद्याप असलेल्या काही हस्तलिखित प्रती मूळ लेखकांपासून कित्येक शतकामधील तारखात क्वचितच येतात.
देवाची देणगी
७. पवित्र शास्त्राचे वितरण किती विस्तृत आहे?
७ पवित्र शास्त्र हे इतिहासातील मोठ्या प्रमाणावर वितरण केलेले पुस्तक आहे. काही तीन अब्ज प्रती छापलेल्या आहेत. इतर कोणत्याही पुस्तकांची संख्या याच्या जवळची नाही. पवित्र शास्त्र व त्याच्या काही भागांचा २,००० भाषांत अनुवाद केला आहे. यास्तव, आमच्या ग्रहावरील ९८ टक्के जनसंख्येला पवित्र शास्त्र सुलभरित्या मिळू शकते असे अनुमान काढले आहे.
८-१०. पवित्र शास्त्र परिक्षण करण्याजोगे आहे याचे कोणती कारणे आहेत?
८ निश्चितच, जे पुस्तक देवाकडून असल्याचा दावा करत आहे व ज्याच्या अस्सलपणाचा बाह्य व अन्तर्गत पुरावा मिळतो, त्याचे आम्ही परिक्षण करणे योग्य ठरेल. * ते जीवनाच्या उद्देशाची माहिती देते, जागतिक परिस्थितीचा अर्थ सांगते, व भविष्यात आमच्यासाठी काय राखून ठेवले आहे ते सांगते. अन्य कोणतेच पुस्तक ते देत नाही.
९ होय, पवित्र शास्त्र मानवजातीबरोबर देवाचे दळणवळण करण्याचे एक साधन आहे. ४० मनुष्यांना त्याचे लिखाण करण्यासाठी त्याने त्याची कार्यकारी शक्ति, किंवा पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केले. यास्तव, देव आमच्या बरोबर त्याचे वचन पवित्र शास्त्र याद्वारे बोलतो. प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर, देवाचे असे स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे.”—१ थेस्सलनीकाकर २:१३.
१० अमेरिकेचे १६वे अध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी बायबलविषयी “मानवजातीला देवाने दिलेले सर्वात उत्तम बक्षीस असे म्हटले.” पुढे ते म्हणतात: “चुकीच्या गोष्टीला त्यात कोणता चांगला पर्याय आहे ते आम्ही जाणून घेतले नाही.” तर मग, ही उत्कृष्ट देणगी दु:खाला सुरवात कशी झाली, देवाने त्याला अनुमती का दिली, व तो काय करणार आहे याबद्दल आम्हाला काय सांगते?
[तळटीपा]
^ परि. 8 पवित्र शास्त्राच्या अस्सलपणाच्या आणखी पुराव्यासाठी द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? हे वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने १९८९ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक पहा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चित्रं]
देवाने प्रेरित केलेले, पवित्र शास्र मानवजातीबरोबर त्याचे दळणवळण करण्याचे एक साधन आहे