परिशिष्ट
बहिष्कृत व्यक्तीशी कसे वागावे
काही गोष्टींमुळे आपल्याला दुःख होते. पण याहीपेक्षा अधिक दुःख आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला त्याने केलेल्या पापाबद्दल पश्चात्ताप न केल्यामुळे मंडळीतून बहिष्कृत केले जाते. याबाबतीत बायबलच्या मार्गदर्शनाला आपण जो प्रतिसाद देऊ त्यावरून देवाबद्दल आणि त्याच्या व्यवस्थेबद्दल आपल्याला किती प्रेम व निष्ठा आहे हे दिसून येईल. * याविषयावरील काही प्रश्नांवर विचार करा.
बहिष्कृत व्यक्तीशी आपण कसे वागावे? बायबलमध्ये म्हटले आहे: “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसहि बसू नये.” (१ करिंथकर ५:११) ‘ख्रिस्ताच्या शिक्षणाला जो चिकटून राहत नाही’ त्याच्याविषयी बायबलमध्ये असे सांगितलेले आहे, की त्याला “घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारु नका; कारण जो त्याचे स्वागत करितो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.” (२ योहान ९-११) बहिष्कृत व्यक्तीशी आपण आध्यात्मिक गोष्टीविषयी बोलणार नाही किंवा तिच्याबरोबर सहवास ठेवणार नाही. टेहळणी बुरूज (इंग्रजी) सप्टेंबर १५, १९८१, पृष्ठ २५ यावर असे म्हटले आहे: “साधे ‘नमस्ते’ म्हणणे, बहिष्कृत व्यक्तीसोबत संभाषण सुरू करणारे व कदाचित मैत्रीचे पहिले पाऊल ठरू शकते. मग, बहिष्कृत व्यक्तीबरोबर आपल्याला मैत्री करावीशी वाटेल का?”
बहिष्कृत व्यक्तीला इतकी कडक वागणूक देणे खरोखरच गरजेचे आहे का? होय. याची अनेक कारणे आहेत. एक कारण हे आहे, की तुमच्या अशा वागण्यावरून तुम्ही दाखवता की तुम्ही देव आणि त्याच्या वचनाशी एकनिष्ठ आहात. आपल्याला सोपे असते फक्त तेव्हाच नव्हे तर कठीण असते तेव्हाही आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो. यहोवावर आपण प्रेम करतो म्हणून आपण त्याच्या सर्व आज्ञा पाळतो. तो न्यायी व प्रेमळ आहे आणि यशया ४८:१७; १ योहान ५:३) दुसरे कारण हे आहे, की अपश्चात्तापी व्यक्तीबरोबरचे सर्व संबंध तोडून आपण स्वतःला व मंडळीतल्या इतरांनाही आध्यात्मिक व नैतिक भ्रष्टतेपासून सुरक्षित ठेवत असतो आणि मंडळीचे चांगले नाव टिकवून ठेवतो. (१ करिंथकर ५:६, ७) तिसरे कारण, बायबल तत्त्वांच्या बाबतीत आपल्या या कडक भूमिकेमुळे बहिष्कृत व्यक्तीलाही फायदा होऊ शकतो. न्यायिक समितीने घेतलेला निर्णय आपण मान्य करतो तेव्हा, त्याला मदत करण्याकरता वडील जन करत असलेल्या प्रयत्नांना आतापर्यंत प्रतिसाद न देणाऱ्या पातक्याच्या मनावर कदाचित आपण प्रभाव पाडू शकतो. आपल्या प्रिय जनांबरोबरची मौल्यवान संगती गमावल्यामुळे बहिष्कृत व्यक्ती कदाचित “शुद्धीवर” येईल; तिने केलेल्या पापाचे गांभीर्य तिला कळेल आणि यहोवाकडे पुन्हा येण्यास ती पावले उचलेल.—लूक १५:१७.
त्याचे सर्व नियम आपल्याच भल्याकरता आहेत हे आपल्याला माहीत आहे. (आपल्या एखाद्या नातेवाईकाला बहिष्कृत करण्यात आले असेल तर? अशा वेळी, कौटुंबिक सदस्यांची खरी परीक्षा असेल. यहोवाच्या नीतिनियमांशी आपण प्रेमळपणे विश्वासू राहू का? बहिष्कृत केलेल्या आपल्या नातेवाईकाशी आपण कसे वागले पाहिजे? येथे आपण प्रत्येक लहान-सहान परिस्थितींची चर्चा करू शकत नसलो तरी आपण निदान दोन मुख्य परिस्थितींवर विचार करूया.
कधीकधी, बहिष्कृत व्यक्ती कुटुंबातील इतरांसोबत एकाच घरात राहत असेल. बहिष्कृत झाल्यामुळे तिचे कौटुंबिक बंधन संपुष्टात येत नाही. घरातील कौटुंबिक कार्ये व व्यवहार ही चालूच राहतात. तरीपण, आपल्या वागणुकीद्वारे या बहिष्कृत व्यक्तीने मुद्दामहून, ख्रिस्ती विश्वासात टिकून राहिलेल्या तिच्या कौटुंबिक सदस्यांबरोबरचा तिचा आध्यात्मिक नातेसंबंध तोडलेला असतो. यास्तव, कुटुंबातील इतर सदस्य तिच्याबरोबर, देवाच्या उपासनेच्या बाबतीत असलेल्या कोणत्याही कार्यांत तिला सहभागी करत नाहीत. जसे की, कौटुंबिक उपासनेच्या वेळी बहिष्कृत व्यक्ती त्या उपासनेत भाग घेऊ शकत नाही. परंतु, बहिष्कृत करण्यात आलेली व्यक्ती अल्पवयीन असेल तर तिला प्रशिक्षण व शिस्त लावण्याची जबाबदारी *—नीतिसूत्रे ६:२०-२२; २९:१७.
अजूनही पालकांचीच आहे. यास्तव, प्रेमळ पालक कदाचित आपल्या मुलाबरोबर बायबल अभ्यासाची व्यवस्था करतील.इतर बाबतीत कदाचित, बहिष्कृत नातेवाईक एकाच घरात राहत नसेल. एखाद्या विशिष्ट कौटुंबिक गोष्टीबद्दल त्या व्यक्तीशी क्वचित प्रसंगी संपर्क साधावा लागत असला तरी तिच्याबरोबरचा कोणताही संपर्क कमीच ठेवावा. घरात राहत नसलेल्या बहिष्कृत नातेवाईकासोबत संपर्क ठेवण्यासाठी एकनिष्ठ ख्रिस्ती कौटुंबिक सदस्य कारणे शोधत नाहीत. तर, यहोवाशी आणि त्याच्या संघटनेशी एकनिष्ठ असल्यामुळे ते बहिष्कृत करण्याविषयी बायबलमध्ये असलेल्या व्यवस्थेला पाठिंबा देतात. त्यांच्या या एकनिष्ठ वागणुकीमुळे पाप करणाऱ्या व्यक्तीचे भले होते व मिळालेल्या शिक्षेमुळे तिचा फायदा होऊ शकतो. *—इब्री लोकांस १२:११.
^ परि. 1 बहिष्कृत करण्याविषयी असलेली बायबलमधील तत्त्वे, स्वतःला मंडळीपासून विभक्त करणाऱ्यांनाही तितकीच लागू होतात.
^ परि. 2 बहिष्कृत करण्यात आलेले अल्पवयीन मूल एकाच घरात राहत असल्यास त्यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००१, पृष्ठे १६-१७ आणि ऑगस्ट १, १९८९, पृष्ठ २२ पाहा.
^ परि. 1 बहिष्कृत नातेवाईकांशी कसे वागायचे याबाबतीत अधिक माहितीकरता असलेल्या बायबल आधारित सल्ल्यासाठी, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९८८, पृष्ठे २१-२६ आणि टेहळणी बुरूज (इंग्रजी), सप्टेंबर १५, १९८१, पृष्ठे २६-३१ पाहा.